05 March 2021

News Flash

कतरिना कैफ

कतरिना कैफ या हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्रीचे नागरिकत्व ब्रिटिश आहे.

कतरिना कैफ या हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्रीचे नागरिकत्व ब्रिटिश आहे. १९८३ साली हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाचे वडील महम्मद कैफ हे एक ब्रिटिश व्यावसायिक, पण मूळचे काश्मिरी. तिची आई सुझान ही ब्रिटिश वकील आणि सामाजिक कार्यकर्ती. कतरिनाच्या लहानपणी तिचे आई-वडील विभक्त  झाले. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ. विभक्तीनंतर या आठही मुलांचे पालनपोषण आई सुझाननेच केले. कतरिनाची आई अनेक जागतिक सामाजिक संस्थांशी निगडित असल्यामुळे वरचेवर अनेक देशांमध्ये या कुटुंबाचे राहणे झाले. तिच्या जन्मानंतर हे कुटुंब तीन वर्षे चीनमध्ये, दोन वर्षे जपानमध्ये, दोन वर्षे फ्रान्स तर एक वर्ष स्वित्झर्लण्डमध्ये, कधी पोलंड तर कधी बेल्जियममध्ये, पुढे तीन वर्षे इंग्लंडमध्ये असे जगभर हिंडले. या काळात कतरिना तिच्या आईचे आडनाव ‘तुरकोट्टे’ असे लावीत असे.

कतरिना चौदा वर्षांची असताना तिने हवाईमध्ये एक सौंदर्यस्पर्धा जिंकली आणि त्यानंतर ती मॉडेलिंग करायला लागली. लंडनच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्स कंपनीसाठी मॉडेल म्हणून करार केल्यावर ती लंडनमध्येच स्थायिक झाली. पुढे तिला अनेक उत्पादनांसाठी मॉडेलिंगचे काम मिळाले. लंडनमध्ये एका फॅशन शोमध्ये काम करीत असताना भारतीय चित्रपट निर्माते कैजाद गुस्ताद यांच्या नजरेत ती भरली आणि त्यांनी तिला आपल्या ‘बूम’ या चित्रपटात एक भूमिका दिली. २००३ मध्ये पडद्यावर आलेला बूम बॉक्स ऑफिसवर साफ कोसळला. पण यातून कतरिनाला मॉडेलिंगची कामे मिळून भारतातली एक अग्रगण्य मॉडेल म्हणून तिचे नाव झाले. पण तिच्या अशुद्ध हिंदी उच्चारांमुळे चित्रपट निर्माते तिला काम द्यायला धजावत नव्हते. या काळात ती लावत असलेले ‘तुरकोट्टे’ हे आईचे आडनाव बदलून वडिलांचे कैफ हे आडनाव लावू लागली. आपले हिंदी उच्चार सुधारण्यासाठी तिने शिक्षक ठेवून ती सराव करू लागली.

कतरिनाला चित्रपटसृष्टीचे द्वार प्रथम खुले केले ते २००४ साली प्रदर्शित झालेला विनोदी आणि रोमॅँटिक तेलुगू चित्रपट ‘मल्लिस्वरी’ याने!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:05 am

Web Title: katrina kaif
Next Stories
1 व्हॅनॅडिअम
2 कुतूहल : बहुढंगी टिटॅनिअम
3 जे आले ते रमले.. भारतमित्र हॉर्निमन
Just Now!
X