पहिल्या दोन अवस्थांतील अळ्या नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घेतात. या दोन अवस्थांना ‘चॉकी’ असे म्हणतात. चॉकीमधील अळ्या लाकडी ट्रेमध्ये ठेवतात. त्या ट्रेला ‘चॉकी ट्रे’ म्हणतात. चॉकीमधील अळ्यांना तुतीची अगदी कोवळी पाने बारीक कापून पुरवतात. तसेच अळ्या चॉकीमध्ये असताना ८० टक्के आद्र्रता खोलीमध्ये सतत ठेवतात.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या अवस्थेतील अळ्या विशिष्ट प्रकारचे स्टँड (पाच बाय अडीच फूट) बांधून त्यावर सोडतात. अशा अळ्यांना रोजच्या रोज ‘स्पेसिंग’ देतात. स्पेसिंग म्हणजे प्रत्येक अळीस वाढीसाठी तसेच खाद्य खाण्यासाठी पुरेशी जागा मिळेल, अशा प्रकारे स्टँडवरील अळ्यांच्या बेडचा आकार वाढवणे.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या अवस्थेतील अळ्यांना पूर्वी पाला पद्धतीने तुती पुरवली जात असे. या पद्धतीत तुतीची पाने काढून घातली जात असत. परंतु या पद्धतीत सुधारणा करून फांदी पद्धत विकसित झाली. या पद्धतीत तुतीच्या झाडाच्या फांद्याच छाटून बेडमध्ये ओळीने ठेवतात. बेडमधील अळ्या भराभर वरती चढतात आणि पाने खातात. फांदी पद्धतीमुळे स्टँडची स्वच्छता करणे, स्पेसिंग देणे ही कामे सोपी होतात. तसेच वेळेचीही बचत होते. पाचही अवस्थांमध्ये रोज तीन ते चार वेळा तुती पुरवतात. बेडमधील शिळी झालेली, सुकलेली पाने अळ्या खाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागते. कारण अशी पाने खाल्ल्यास अळ्यांना रोग होण्याची शक्यता असते. यासाठी रोज सकाळी बेडवर चुना मारतात. चुन्यामुळे बेडमधील शिळी तुती सुकून येते. तसेच चुना मारलेली पाने अळ्या खात नाहीत.
रेशीम अळ्या अतिशय नाजूक असतात. त्यांना रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेड, स्टँडचे र्निजतुकीकरण करतात. तसेच शेडमधील हवा सतत खेळती राहील याकडे लक्ष द्यावे लागते. शेडमधील तापमान २३-२४ अंश सेल्सियस आणि आद्र्रता ६०-६५ टक्के ठेवतात.
मुंग्या, पाली आणि उझी माशी हे रेशीम अळ्यांचे शत्रू आहेत. ते शेडमध्ये शिरणार नाहीत, यासाठी एंटवेल, नेट्स यांचा वापर करतात.
रोगांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिबंधक म्हणून संजीवनी, सुरक्षा, रेशीमज्योती अशा औषधांचा वापर करतात.

– मानसी भिर्डीकर (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ११ जुलै
१८४७> चरित्रकार, नाटककार कृष्णाजी आबाजी गुरुजी यांचा जन्म. त्यांनी लिहिलेले ‘बाळ गंगाधर टिळक’ यांचे चरित्र हे मराठीतील लो. टिळकांचे पहिले चरित्र. यानंतर ‘माधवाचार्य चरित्र’, ‘नाटय़कलेची उत्पत्ती’, ‘नाटकांची स्थित्यंतरे’ ही पुस्तके. ‘घागरगडचा सुभेदार’ हे नाटक लिहिले.
१८८९>ख्यातनाम कादंबरीकार, कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म.  ना. हं.ची पहिली कादंबरी ‘अजिंक्यतारा’. ‘लांछित चंद्रमा’, ‘राजपुतांचा भीष्म, ‘संधिकाल’ इ. कादंबऱ्या गाजल्या.
१९२१> कथा, कादंबरीकार, लेखक शंकरराव रामराव खरात यांचा जन्म.  ‘बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गावशीव’ आदी कथासंग्रह,  ‘पारधी, हातभट्टी, झोपडपट्टी या कादंबऱ्या, तसेच ‘आज इथं उद्या तिथं’ हे ललित लेखसंग्रह मराठीत मोलाचे मानले जातात. याशिवाय ‘दलित वाङ्मय प्रेरणा व प्रवृत्ती, डॉ. आंबेडकरांचे धर्मातर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात’ आदी पुस्तके आणि ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.
२००३>१९८० च्या दशकातील युवा पिढीला भुरळ घालणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांचे निधन. त्यांची ‘दुनियादारी’ ही गाजलेली कादंबरी.
– संजय वझरेकर

वॉर अँड पीस                                                     हृद्रोग : भाग ४
रुग्णालयीन उपचार – १) पूर्ण विश्रांती व सतत रुग्णावर लक्ष राहण्याकरिता हृद्रोगी माणसाने प्रवेशित होण्याची गरज असते. २) अर्जुनसालगंध, अर्जुनसालसिद्ध दूध किंवा क्षीरपाक यांची योजना वेळेवर, प्रमाणात केली जावी. ३) पोटात वायू धरणार नाही व त्याचबरोबर अन्नपचनही माफक व्हावे एवढीच हालचाल रुग्णाने करावी. ४) यत्किंचित हालचालीने त्रास होत असल्यास व मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास, नित्य तिळाच्या तेलाची पिचकारी घ्यावी. त्याने मलप्रवृत्ती साफ न झाल्यास निरुहबस्ती (एनिमा) घ्यावा. शक्यतो तीव्र शोधन घेऊ नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत मल, मूत्र, वायू यांचे वेग अडवू नयेत. त्याचे अनुलोमनाकरिता शक्यतो सर्व उपचार करावेत. ५) वमनाचा उपचार शक्यतो करू नये. ६) छातीत खूपच कफ साठलेला असल्यास रोगी बलवान असल्यास शेवटचा उपाय म्हणून मिठाच्या पाण्याचा उपयोग करावा. त्या अगोदर छातीला अतिशय हलक्या हाताने महानारायण तेलाने मसाज करावा.
श्रेयनामावली – घृत चिकित्सा हा आमच्या वडिलांपासून चालत आलेला आयुर्वेदिय विशेष उपचार आहे. सिद्धघृताने जे काम होते ते मोठमोठय़ा हिंमतवान औषधाने होत नाही, असा आमचा अनुभव आहे. अर्जुनधृत द्राक्षादि, त्रिफळा, महात्रफल, पंचगव्य, महातिक्तक, लाक्षादि, शतावरी, फलघृत अशी नानातऱ्हेची घृते आम्ही वारंवार वापरत असतो. यातील लाक्षादिघृत, अर्जुनघृत अनुक्रमे हृदयाच्या झडपा जुळून याव्या, लहान रक्तवाहिन्यांचा जोम वाढविण्याकरिता आम्हाला वैद्यकीय व्यवसायात विशेष यश देत असतात.
 फुफ्फुसातील हाडांच्या सांध्यावरील कर्करोगाची शस्त्रक्रिया धोकादायक असल्याने औषधांचा उपयोग होईल का म्हणून एक रुग्ण आमच्याकडे आला. गेली तीन वर्षे लाक्षादिघृताचे वापराने रुग्ण अजूनही उत्तम स्थितीत आहे.
महारोगात हातपायांची बोटे, कान, नाकाची हाडे गळू पाहतात. त्याकरिता लाक्षादिघृत्त दिल्यापासून लगेच फायदा होतो. हाडे गळणे, प्रक्रिया थांबते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..       लढा : अंक दुसरा-भाग १ (पुनश्च हरिओम)
तो भूखंड हिंदुजांच्या कचाटय़ातून सुटायला ८४-८५ साल उजाडले .  त्यानंतर दमछाकीमुळे मी त्या प्रकरणाकडे दुर्लक्षच केले. त्या काळात राणीच्या बागेत मराठे नावाची तरुण अधिकारी होती. तिला भेटून समुद्रकिनाऱ्यावर कोणती झाडे जगतील असे विचारायला गेलो. तर तिने नुसतीच झाडांची नावे सांगितली नाहीत तर ती झाडे घेऊन आली आणि महानगरपालिकेच्या माळ्यांकडून खड्डे खणून त्या भूखंडाच्या एक तृतियांश जागेत ती लावून मोकळी झाली. मी तिला म्हटले ‘केवढे तरी आभार तुझे’ तेव्हा मला म्हणाली ‘तुमच्या लढय़ाविषयी मी वाचले आहे.’नंतर ती क्वचितच भेटली. त्या काळात मी निर्धास्त असण्याचे आणखी एक कारण म्हणजे द. म. सुकथनकर आणि सदाशिव तिनईकर हे दोन मातब्बर अधिकारी मुंबई पालिकेचे आयुक्त होते. त्यांच्या कारकिर्दीत तो भूखंड सुरक्षित राहणार अशी खात्री वाटत असे. आता तिनईकर हयात नाहीत. हे दोघे बदलून गेल्यावर दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. नवे आयुक्त मोठे चतुर होते. पुढे त्यांनी भारताच्या पूवरेत्तर राज्यातल्या नागा लोकांचा प्रश्न सोडवण्यात मदत केली, असे हल्लीचा इतिहास सांगतो. पण यांना हिंदुजांनी  काहीतरी करून वश करून घेतले आणि या अधिकाऱ्याने कोठल्यातरी कायदेशीर तरतुदीचा पाठपुरावा करत तो भूखंड हिंदुजांना उद्यान करण्यासाठी आंदण दिला.
पूर्वीच्या करारात निदान काहीतरी आराखडा तरी होता. या करारात फक्त भूखंड-विकास एवढाच उल्लेख होता. हा करार करून हिंदुजा गप्प बसले आणि त्यावर काय करायचे याचे मनसुबे रचत असणार. करार अशा तऱ्हेने करण्यात आला होता की मला वाटते महानगरपालिकेच्या कोठल्याही वैधानिक समितीच्या परवानगीची जरूर नसणार. काही दिवसांनी त्यांची माणसे भूखंडावर फिरू लागली आणि मोजमाप करीत एकमेकांबरोबर कागदावर नोंदी करू लागली. तेव्हा माझ्या एका गुप्तहेराने तो भूखंड आता परत हिंदुजांना दिल्याची बातमी मला दिली. मी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांचे भांडे फुटले. तोवर हे आयुक्त बदलून गेले होते आणि शरद काळे  नावाचे नवीन आयुक्त आल्याचे कळले. मला परत दंड थोपटावे लागले.
एखाद्या शर्यतीच्या आधी घोडे कसे फुरफुरते तसा मी फुरफुरू लागलो. आधी या शरद काळे नावाच्या इसमाचा पूर्वेतिहास खणून काढला तेव्हा हे पुण्याच्या नूमवि शाळेचे मोठे स्कॉलर विद्यार्थी होते असे कळले. मग मी फोन करून त्यांच्याशी भेटीची वेळ ठरवली. त्याबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com