सांडपाणी वहनामध्ये भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग : सांडपाणी वाहून नेण्याच्या कामी भू-तंत्र वस्त्रांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. दोन्ही उघडय़ा तसेच बंदिस्त अशा दोन्ही प्रकारच्या गटारांमध्ये अशा वस्त्रांचा उपयोग होतो. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या उघडय़ा गटारामध्ये कापड अंथरून नंतर त्यावर खडी पसरली जाते. कापडामुळे खालील माती वर येऊन गटारे तुंबण्याचे प्रमाण कमी होते. काही वेळा पाण्याच्या निचऱ्यासाठी जमिनीखाली छिद्रे असलेले नळ बसविले जातात. या नळाभोवती भू-तंत्र वस्त्र गुंडाळण्यात येते. या वस्त्रांमुळे बाहेरील पाणी नळात जाऊ शकते, पण माती, वाळू व इतर कचरा नळामध्ये जाऊ शकत नाही आणि नळ तुंबत नाहीत.

जमिनीची धूप रोखण्यासाठी भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग : डोंगराच्या उतारावर तसेच घाटामध्ये जमिनीची धूप होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. यावर भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग हा एक उत्तम उपाय आहे. डोंगर व पर्वतांवरील वनस्पतींची मोठय़ा प्रमाणात तोड झाल्यामुळे जमीन धुपण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला आहे. वनस्पती व झाडे यांची लागवड हा धूप थांबविण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे. परंतु उतारावर जमिनीची जी धूप होत असते, त्यामुळे वनस्पती लावल्या तरी टिकू शकत नाहीत. अशा वेळी या उतारांवर भू-तंत्र वस्त्र पसरण्यात येते. या वस्त्रांमधील पोकळ्यांमधून वनस्पतीच्या बिया पेरल्या जातात. कापडामुळे जमिनीची धूप थांबते आणि वनस्पती जगू शकतात. या वनस्पती मोठय़ा झाल्यावर त्या जमिनीची धूप थांबवितात. अशा ठिकाणी वनस्पती मोठय़ा होईपर्यंतच भू-तंत्र वस्त्रांची आवश्यकता असते. म्हणून अशा वस्त्रांसाठी तागासारख्या नसर्गिक तंतूंचा वापर केला जातो. अशी वस्त्रे सुमारे २ ते ३ वष्रे टिकाव धरतात, परंतु तेवढय़ा कालावधीत वनस्पती मोठय़ा होतात आणि जमिनीची धूप थांबवितात. आपल्याकडे पावसात जिथे दरडी कोसळतात, माती वाहून रस्त्यावर किंवा लोहमार्गावर येते, अशा ठिकाणी या भू-तंत्र वस्त्रांचा वापर करायला हवा. जोराचा पाऊस पडल्यावर जिथे हजारो लोकांचा खोळंबा होतो, तिथे ही भू-तंत्र वस्त्रे प्राधान्याने वापरायला हवीत.

 चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

 

संस्थानांची बखर

दिवाण वेलू थम्पी

त्रावणकोर राजा धर्मराजा याच्या मृत्यूनंतर संस्थानाच्या राजेपदावर आलेला बलराम वर्मा हा एक दुर्बल राज्यकर्ता होता. त्याचा दलवा (दिवाण) वेलू थम्पी दलवा याने संधी साधून सर्व कारभार स्वत:च्या ताब्यात घेतला. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी आणि वेल थम्पीचे संबंध चांगले होते. १७९५ मध्ये कंपनी सरकारचे त्रावणकोरबरोबर झालेल्या संरक्षण सामंजस्य करारामध्ये पुढे या दिवाणाने कंपनीला अनुकूल असे अनेक बदल करून दिले; परंतु कंपनी सरकारने त्रावणकोरला टिपूबरोबरच्या युद्धात केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून अवाजवी मागण्या पुढे केल्यामुळे वेलूचे कंपनीबरोबर वैमनस्य झाले. पुढे हा संघर्ष वाढून वेलूने कोचीनच्या दिवाणाबरोबर संगनमत करून कोचिन येथील कंपनीच्या निवासी अधिकाऱ्याचे घर उद्ध्वस्त करून कंपनी सरकारचे सन्य आणि वेलूच्या सन्यांमध्ये लढाई झाली. प्रथम ही लढाई वेलूने जिंकली पण त्रावणकोर आणि कोचिनच्या राजाने कंपनी सरकारला मदत केल्यामुळे वेलूचा पराभव होऊन त्याने आत्महत्या केली. त्रावणकोर राज्यात त्या काळात जातपात, कुळाचार वगरे रूढींना महत्त्व होते. संस्थानाच्या वर्मा राज्यकर्त्यांनी स्वत:ला क्षत्रिय समाजात अंतर्भूत करून घेण्यासाठी सोळा वेळा ‘महादानम’ हा धार्मिक विधी पार पाडण्यास सुरुवात केली. ‘हिरण्यगर्भ’, ‘हिरण्यकामधेनू’, ‘हिरण्यस्वरता’ अशा विधींमध्ये हजारो ब्राह्मण पुरोहितांना अति मौल्यवान दान-देणग्यांमुळे राज्याच्या खजिन्यावर मोठा ताण पडू लागला. प्रत्येक विधीत हजारो ब्राह्मणांना प्रत्येकी एक कझांचं म्हणजे ७८ ग्राम सुवर्णदान आणि त्याशिवाय कापड, रोख पसे असे महागडे दान दिले जाई. अखेरीस १८४८ साली गव्‍‌र्ह. जनरल माकर्ि्वस ऑफ डलहौसीने या रूढीवर बंदी घालून त्रावणकोरची आíथक संकटातून सुटका केली.

 सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com