19 February 2019

News Flash

जे आले ते रमले.. : लेफ्टनंट कर्नल विल्यम लँबटन (१)

इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायर या परगण्यात १७५३ मध्ये जन्मलेला विल्यम लँबटन हा एका शेतकऱ्याचा मुलगा.

ब्रिटिशांनी आपले पाय भारतीय भूमीवर घट्ट रोवले तेव्हा त्यांना लगेचच महसुलाच्या वसुलीसाठी आणि लष्कराच्या हालचालींसाठी भारताच्या अंतर्गत भागाच्या तपशीलवार नकाशांची गरज भासू लागली. बंगाल जिंकताच या मुलखाचे सर्वेक्षण करण्याचे काम १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने जेम्स रेनेल या नाविक अधिकाऱ्यावर सोपवले. बंगालमधील सुंदरबनचे सर्वेक्षण करताना घनदाट जंगले, िहस्र प्राणी, दलदलीमुळे होणारे आजार यांना तोंड देत देत सात वर्षे या कामाला लागली.

ब्रिटिश जसजसे इतर भारतीय प्रदेश जिंकू लागले तसतशी त्या प्रदेशांच्या सर्वेक्षणाची आवश्यकता त्यांना भासू लागली. हे अत्यंत कठीण आणि मोठे काम ब्रिटिशांनी विल्यम लँबटन या कुशाग्र आणि असामान्य प्रतिभा असलेल्या माणसावर सोपवले. अत्यंत खडतर परिस्थितीत डोंगरदऱ्या, जंगलांमध्ये राहून, लोकांचा विरोध अनेकदा सहन करून भारतीय प्रदेशाचे सर्वेक्षण आणि भूमापन करणाऱ्या विल्यमचे कार्य अद्भुत आणि प्रशंसनीय आहे.

इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायर या परगण्यात १७५३ मध्ये जन्मलेला विल्यम लँबटन हा एका शेतकऱ्याचा मुलगा. घरची अत्यंत गरिबी, त्यामुळे पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत भारतात आल्यावर अनेक वर्षे ते इंग्लंडमध्ये आपल्या आईवडिलांना नियमित पैसे पाठवीत होते. एक सामान्य सैनिक म्हणून नोकरीस लागलेल्या विल्यमना ईस्ट इंडिया कंपनीत पुढे सव्‍‌र्हेयरची नोकरी योगायोगानेच मिळाली. १७९८साली विल्यम जहाजाने कलकत्ता ते मद्रास प्रवास करीत असताना गव्हर्नर जनरल वेलस्लीचा भाऊ कर्नल ऑर्थर वेलस्लीसुद्धा त्या जहाजावर होता. तो म्हैसूरच्या टिपू सुलतानशी होणाऱ्या लढाईत सहभागी होण्यासाठी जात होता. प्रवासात मत्री होऊन वेलस्ली, विल्यमच्या भौगोलिक आणि भूमितीच्या ज्ञानाने प्रभावीत होऊन त्याने विल्यमला आपल्यासोबत मोहिमेवर नेले. या लढाईच्या दरम्यान ब्रिटिश सन्य कूच करताना चुकीच्या दिशेने शत्रूच्या ऐन टप्प्यात येत होते. त्यावेळी विल्यमने आपल्या त्रिकोणमितीच्या साहाय्याने, ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ब्रिटिश सन्याला अचूक दिशा दाखवून टिपूवर विजय मिळवून दिला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on September 6, 2018 5:00 am

Web Title: lieutenant colonel william lambton article 1