भारतीय ज्ञानपीठाचा १९८१ चा साहित्य पुरस्कार श्रीमती अमृता प्रीतम यांना प्रदान करण्यात आला. त्यांचा काव्यसंग्रह ‘कागज ते कैनवास’- हा १९६५ ते १९७४ या कालावधीत प्रकाशित भारतीय भाषेतील सृजनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आशापूर्णादेवीनंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या या दुसऱ्या लेखिका.

भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर एके दिवशी अचानक एक अनोळखी माणूस अमृताजींना भेटायला आला. त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि हातात थोडीशी माती. तो इतकंच म्हणाला, ‘‘ही माती तुझा जन्म झाला त्या गुजराँवाला गावातून आणलीय’’ अमृताजीही त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

पंजाबी साहित्याच्या प्रगतीचा मापदंडच अमृताजींच्या साहित्याने निर्माण केला आहे. अशा या पंजाबी साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवयित्री, लेखिकेचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी पंजाबमधील गुजराँवाला या गावी झाला. सारं बालपण लाहोरजवळच्या या गावीच गेलं. कविता त्यांच्या घरातच होती. त्यांचे वडील कर्तारसिंह ‘पियुष’ या नावाने कविता लेखन करीत असत. ‘बालका साधू’ म्हणून विरक्त आयुष्य स्वीकारलेल्या वडिलांनी संस्कृत, ब्रज भाषेचे अध्ययन केले. ते ब्रज भाषेत कविता करीत होते. विरक्त वृत्तीचे असले तरी ते मोठे धर्मश्रद्ध, समाजमनाची जाण असलेले गृहस्थ होते.

अमृता दहा-अकरा वर्षांची असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. अमृताजी पोरक्या झाल्या. मन स्वप्नाळू बनत चाललं. अनेक वर्षे त्या स्वप्नामध्येच जगत राहिल्या. घरात बाबांशिवाय कोणीच नव्हतं. जगापासून या अल्लड मुलीला वाचवायचं म्हणून, तिच्या मित्र-मैत्रिणी, शेजारी कोणाशीही ओळख नको- या वडिलांच्या धारणेमुळे अमृताजींचं बालपण असं वेगळंच, कोंडलेलं गेलं. मग या एकटेपणात त्या कविता करू लागल्या; पण परंपरावादी शीख घराण्यातील धार्मिक वृत्तीच्या वडिलांना वाटायचं हिने फक्त धार्मिक कविताच लिहाव्यात. प्रत्येक गोष्टीत अशा प्रकारच्या अटीच अटी. अशा या निष्फळ प्रेमाच्या, दबलेल्या भावनांनी कल्पनेशी, स्वप्नांशी नातं जोडलं आणि यातूनच त्यांच्या अनेक कवितांची निर्मिती झाली.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

अश्वशक्ती परिमाण

आगगाडी इच्छितस्थळी किमान वेळात नेता यावी यासाठी रेल्वे इंजिनांची वाहनशक्ती वाढवण्यावर नेहमीच भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही शक्ती मोजणे कळीचे ठरते. यासाठी ‘अश्वशक्ती’ (हॉर्सपॉवर) ह्य़ा वापरात असलेल्या परिमाणाची माहिती थोडक्यात अशी आहे.

पाळीव घोडय़ाच्या शक्तीचा वापर शेकडो वष्रे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत मनुष्याने खुबीने करून आपला विकास साधला. त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोडय़ाच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले.

१८ व्या शतकाच्या शेवटी जेम्स वॅट (१७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९) या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या व्यावहारिक बाष्प इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.

वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात

२.४  ७ २स्र्  ७ १२  फूट अंतर पार करतो आणि त्यावरून घोडा १८० पाउंडस्-बल (८०० न्यूटन) या शक्तीने वजन ओढू शकतो. यावरून त्याने प्रतिमिनिट ३३,००० फूट-पाउंड्स असे कार्य करणे म्हणजे एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) असे प्रतिपादित केले. अर्थातच घोडय़ाची जात आणि वय या घटकांमुळे त्यात फरक पडू शकतो, आणि घोडा सर्वकाळ याच शक्तीने कार्य करू शकत नाही, हे अधोरेखित आहे. त्याचप्रमाणे यंत्राची अश्वशक्ती आदर्श, निर्धारित आणि प्रत्यक्षात वापरली जाणारी, अशी वेगवेगळी असते. अश्वशक्ती ही पिस्टनयुक्त इंजिन, बॉयलर, विद्युत मोटर, पाणचक्की (टर्बाइन) अशा यंत्रांपासून प्राप्त होणाऱ्या शक्तीचे मापन दर्शवते.

त्या संदर्भातील काही परिमाणे :

एक यांत्रिकी अश्वशक्ती =५५० फूट-पाउंड्स/सेकंद = ७४५.६९९८७ वॅटस्

एक मेट्रिक अश्वशक्ती = ७३५.४९६७५ वॅट्स (७५ किलोग्रॅम वजन एका सेकंदात एक मीटर ओढणे)

एक विद्युत अश्वशक्ती = ७४६ वॅटस्

१,००० वॅटस् = १ किलोवॅट = १.३४ अश्वशक्ती

भारतात वापरल्या जाणाऱ्या रेल्वे इंजिनांची कार्यशक्ती सातत्याने वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. तरी त्याबाबतची माहिती पुढील लेखात बघू या.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org