इतिहासपूर्व काळात सध्याच्या लंडन आणि आसपासच्या प्रदेशात ब्रिटोन नावाच्या आदिवासी जमातीची वस्ती होती. ‘इंग्लीस’ ही त्यांची भाषा. रोमन सेनानी ज्युलियस सिझर याने या प्रदेशावर दोन आक्रमणे केली ती ख्रिस्तपूर्व ५५ आणि ५४ मध्ये. सध्याच्या लंडनजवळच्या केन्ट येथे प्रथम त्याने आपले बस्तान बसविले. केंट, लंडन वगरे भागात रोमनांनी राज्य स्थापन करून त्याला नाव दिले ‘ब्रिटानिया’. रोमन अधिकाऱ्यांनी शेती आणि स्थापत्य शैलीत बऱ्याच सुधारणा केल्या. सीझरने टेम्स नदी ससन्य पार करण्यासाठी नदीपात्रातली पाणथळ, कमी प्रवाही जागा शोधून त्या ठिकाणी लाकूड आणि गवताचा तरंगता पूल तयार केला. या पुलावरून नदी पार  केल्यावर पलीकडे असलेल्या आदिवासी वस्तीत राहणारे लोक त्या ठिकाणाला ‘लन डीन’ म्हणत. ‘लन डीन’मध्ये सीझरने आपल्या लष्करासाठी वसाहत केली आणि लन डीनचे नाव रोमन पद्धतीने ‘लंडोनियम’ केले. रोमनसम्राटांचा या लंडोनियम वरचा अंमल इ.स.  ४३ ते ४१० या काळात होता. इ.स. ४३ मध्ये रोमन सम्राट क्लाडियस इथे आला. त्याने जुना तरंगता लंडोनियमकडे जाणारा पूल काढून टेम्सवर लाकडी पूल बनविला. त्याने बांधलेला हा पहिला लंडन ब्रिज. त्या पुलात अनेक स्थित्यंतरे होऊन सध्या उभा असलेला भरभक्कम लंडन ब्रिज विसाव्या शतकात बांधला गेला. रोमनांनी लंडोनियमची स्थापना आणि विकास केला, तो रोमन ब्रिटनमध्ये एक महत्त्वाचे व्यापारी ठाणे म्हणून.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

कैलासपती 

कैलासपती या नावावरूनच या झाडाचा आणि शिवशंकराचा काय बरं संबंध असावा, असा प्रश्न मनात येतो आणि त्याची सुंदर सुवासिक फुले गुलबट, प्रश्नाचे उत्तरही मिळते.  लाल किंवा किरमिजी पाकळ्या असलेल्या फुलाचे वेगळंपण पाहताक्षणीच मनात ठसते. साधारण १० -१२ सेंमीचा व्यास असलेल्या फुलांत;  सुटय़ा सहा मोठय़ा, मांसल आणि चकचकीत पाकळ्या असतात. या पाकळ्यांच्या आत केसरांचं मंडल आणि मधोमध स्त्रीकेसराची कुक्षी जणू शिविलगाप्रमाणे स्थिरावलेली दिसते. पण खरे वैशिष्टय़ आहे ते कुक्षीवर गडद रंगाच्या शेकडो पुंकेसरांनी मिळून धरलेल्या पांढरट छत्राचे! यामुळेच िपडीवर नागाने फणा धरलेला आहे की काय, असा भास होतो.

जाडजूड सरळसोट अशा काळपट तपकिरी रंगाच्या खोडाचे २३ मीटर उंच झाड आणि फुलं-फळं मात्र खालून दीड-दोन मीटरवर लगडलेली. कैलासपतीचे फूल येण्याचं ठिकाणही इतर सामान्य झाडांपेक्षा वेगळे असते. झाडाच्या बुंध्यावर खालच्या बाजूलाच जाड लांब वेडय़ावाकडय़ा दोरीसारख्या चिवट फाद्यांना ही फुले लागलेली असतात.

कैलासपतीचे फळही आपले लक्ष वेधून घेते, १५ ते २५ सेंटिमीटर  व्यासाचे, गोल, टणक, तपकिरी रंगाचे हे फळ एखाद्या तोफगोळ्याप्रमाणे भासते. यामुळेच या झाडाला इंग्रजीत ‘कॅननबॉल ट्री’ हे नाव पडले. त्याच्या आत लिबलिबीत पिवळा गर आणि बिया असतात. फुले सुगंधी असतात फळ मात्र दरुगधी असते. या फळाचा सर्दी-खोकला, पोटदुखीवर औषधासाठी उपयोग केला जातो.

पानाच्या रसामध्ये त्वचारोग बरा करण्याचे गुणधर्म असतात. हे झाड पानांशिवाय असे कधी दिसतच नाही. खरं तर वर्षांतून दोनवेळा पानगळ होते. पण निष्पर्ण झाल्यानंतर लगेच दोन तीन दिवसांनी पोपटी हिरव्या पानांनी झाड पूर्ण भरून जाते.

सर्व भारतभर दमट-उष्ण प्रदेशात सहजी आढळणारा कैलासपती नावावरूनही भारतीय असल्याचे वाटते. पण त्याचं ‘करूपिता गियानेन्सिस’ हे शास्त्रीय नाव हा वृक्ष मूळचा वेस्ट इंडिजमधल्या गियानातला आहे, हे दाखवते.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org