05 December 2020

News Flash

जे आले ते रमले.. : मेडेलीन स्लेड ऊर्फ मीरा बहन (२)

साबरमती आश्रमात राहायला आल्यापासून मीरा बहननी आपले लंडनमधील कौटुंबिक पाश पूर्णपणे तोडले.

(संग्रहित छायाचित्र)

सुनीत पोतनीस

मेडेलीन स्लेड या ब्रिटिश महिला महात्मा गांधींच्या कार्यात सहभागी होण्यासाठी १९२५ साली भारतात आल्या. गांधीजींच्या या मानसकन्येचं नामांतर ‘मीरा बहन’ असं गांधीजींनीच केलं. साबरमती आश्रमात राहायला आल्यापासून मीरा बहननी आपले लंडनमधील कौटुंबिक पाश पूर्णपणे तोडले. साबरमती आश्रमातील इतर स्वयंसेवकांप्रमाणे मीरा बहननी आपला पेहेराव खादीची पांढरी साडी असा करून ब्रह्मचर्याची शपथ घेतली. रोज ठरावीक वेळ सूतकताई सुरू करून वर्षभरात िहदी भाषा आत्मसात केली.

गांधीजींबरोबर इतर स्वयंसेवकांसमवेत दौऱ्यावर जाऊ लागल्या. साबरमती आश्रमात मीरा बहनना मार्गदर्शन करण्याचे काम वल्लभभाई पटेल, महादेवभाई देसाई, स्वामी आनंद या त्यांच्या सहआश्रमीयांनी केलं. गांधीजींशी निगडित स्वातंत्र्य आंदोलनविषयक घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घटना मीरा बहन यांच्या आश्रमीय जीवनकाळात झाल्या. अनेक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या तशाच सहभागीही होत्या. १९३१ साली लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत त्यांचा सहभाग होता. मीरा बहननी इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन विन्स्टन चíचल, डेव्हिड जॉर्ज आणि रुझवेल्ट यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे भारताची बाजू मांडली. वर्धा येथील सेवाग्राम आश्रम स्थापन करण्यातही मीरा बहन यांची महत्त्वाची भूमिका होती. असहकार आंदोलनात ब्रिटिश सरकारने गांधीजींना अटक करून १९४२-४४ अशी दोन वर्षेपुणे येथील आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केलं होतं. त्यामध्ये इतर कार्यकर्त्यांबरोबर मीरा बहनही स्थानबद्ध होत्या. आगाखान पॅलेसमधून सुटका झाल्यावर त्यांनी हृषीकेशजवळ बापूग्राम हा आश्रम स्थापन केला. १९६० साली मीरा बहन भारतातला आपला मुक्काम संपवून ऑस्ट्रियात आपल्या आवडत्या संगीतकाराच्या, बेथोवेनच्या गावात व्हिएन्नात जाऊन राहिल्या. व्हिएन्नात १९८२ मध्ये त्यांचं निधन झालं. भारत सरकारने मीरा बहन यांच्या कार्याबद्दल १९८१ मध्ये ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांचा बहुमान केला. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी दिग्दíशत केलेल्या ‘गांधी’ या चित्रपटात मीरा बहनची भूमिका गेराल्डीन जेम्स या अभिनेत्रीने साकारली आहे.

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2018 1:38 am

Web Title: madeleine slade or mirabehn
Next Stories
1 कुतूहल : विवादित नोबेलिअम
2 मेडेलीन स्लेड (१)
3 शतकोत्तरी मेंडेलीविअम
Just Now!
X