मिरची म्हणजे झणझणीत असं सर्वसाधारण समीकरण आपण मांडतो. पण मिरची-मिरचीमध्येही तिखटपणाच्या बाबतीत फरक असतो बरं का! भाज्यांसाठी किंवा भाजीसाठी वापरतो ती भोपळी किंवा सिमला मिरची अगदीच मिळमिळीत, आपण सहज ती पचनी पाडू शकतो. उलट काही मिरच्या अशा ज्वलज्जहाल असतात की, जिभेला त्यांचा नुसता स्पर्श व्हायची खोटी, ब्रह्मांड आठवतं!

मिरचीला तिखटपणा बहाल करतं ते त्यातलं कॅप्सायसिन नावाचं रसायन. त्याचं प्रमाण किती आहे, यावर त्या मिरचीचा तिखटपणा अवलंबून असतो. त्याचाच आधार घेत स्कोव्हिल या शास्त्रज्ञानं १९१२ मध्ये तिखटपणा मोजण्याची एक पद्धत शोधून काढत, त्याची तीव्रता सांगणाऱ्या एका मोजपट्टीची निर्मिती केली. तेच आता स्कोव्हिल स्केल या नावानं ओळखलं जातं.

spring season marathi news, spring season health tips marathi
Health Special: वसंत ऋतू आल्हाददायी, तरीही आरोग्यासाठी काळजीचा; असे का?
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

त्यासाठी त्यानं मानवी स्वयंसेवकांचाच वापर केला. कॅप्सायसिनच्या द्रावणात पाणी घालत त्यानं कॅप्सायसिनचं प्रमाण कमी कमी केलं आणि त्याची चव कशी लागते हे ते चाखणाऱ्यांकडून वदवून घेतलं. त्यानुसार तिखटाची चव कळते न कळते, अशी असताना एक मिलिलिटर द्रावणात कॅप्सायसिनचा जेमतेम एखादाच रेणू असल्याचं त्यानं अजमावलं. त्या परिस्थितीत तिखटाची मात्रा एक असल्याचं त्यानं सांगितलं. भोपळी मिरचीचा तिखटपणा तेवढा असतो. त्यानंतर मात्र या स्केलमध्ये भूमितीश्रेणीनं दहाच्या पटीत वाढ होत जाते.

तिखटपणा मोजण्याचं एक परिमाण जरी स्कोव्हिलनं विकसित केलं तरी ते वस्तुनिष्ठ नव्हतं. एखाद्याला तिखट अजिबात सहन होत नाही तर दुसरा जळजळीत मिरचीचा ठेचाही मजेत मटकावतो. म्हणून मग क्रोमॅटोग्राफी या रसायनांचे घटक वेगवेगळे करणाऱ्या, तंत्राचा अवलंब करून एका नव्या पद्धतीची रुजुवात केली गेली. मात्र त्यासाठी स्कोव्हिलच्या मोजपट्टीचाच वापर करण्यात आला.

आता तर रिचर्ड कॉम्प्टन या ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकानं अत्याधुनिक अशा नॅनो-टेक्नॉलॉजीची मदत घेत हे मोजमाप अचूकपणे करण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. तिचाच वापर करीत केलेल्या पाहणीत जगातली सर्वात झणझणीत असलेली मिरची सापडली आपल्याच आसाममध्ये. तोवर तो मान होता मेक्सिकोमधल्या हाबानेराकडे. तिची तीव्रता स्कोव्हिल स्केलमध्ये ८,५५,००० एवढी होती. पण ही आसामी मिरची तिच्याही पन्नास टक्के अधिक म्हणजे दहा लाखाहूनही जास्ती आहे. तिचं नाव? भूत जोलोकिया. तिच्या जवळ जाऊ नका, नाही तर झपाटून टाकेल तुम्हाला!

 – डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कुर्रतुलऐन हैदर : कथालेखन

कुर्रतुलऐन हैदर यांना कादंबरीलेखन अधिक आवडतं. पण त्याचं कथालेखनही दर्जेदार आहे. उर्दू कथेला त्यांनी एक नवी दृष्टी, नवी ओळख दिली. त्यांनी अनेक कथा लिहिल्या. पण त्यापैकी चार कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘सितारों से आगे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९४७ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘शीशेक घर’ (१९५४), ‘पतझडकी आवाज’ (१९५७) आणि ‘रोशनी की रफ्तार’ (१९८९) हे कथासंग्रह प्रकाशित झाले. यापैकी पतझडकी आवाज’चा मराठी अनुवाद ‘पानगळीची सळसळ’ या नावाने प्रकाशित झाला असून या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी हे प्रामुख्याने त्यांच्या कथांचे विषय आहेत. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल पण फाळणीच्या वेदनेची किनार त्याला होती. त्यामुळे सर्व स्तरांवर दोन्ही देशात दूरगामी, खोलवर असे परिणाम झाले. प्रत्येक धर्मियांच्या संवेदनांना, भावजीवनाला जबरदस्त धक्का बसला. मानसिक पतझड झाली. या साऱ्यांचं चित्रण ‘पतझडकी आवाज’ या संग्रहातील पोळणारी आठवण, हाउसिंग सोसायटी कलंदर इ. कथांमधून येते.

‘सितारों से आगे’ मधील कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील जनजीवनाच्या, विशेषत: समाजातील, तळागाळातील, कष्टाळू, सामान्य माणसांच्या जीवनाचंच केवळ चित्रण नाही तर त्यांच्या मानसिक आंदोलनाचंही चित्रण आहे. आपल्या अर्थशून्य जीवनाची जाणीव असलेल्या माणसांच्या या कथा आहेत. ठासून भरलेला उपरोध म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर या संग्रहातील ‘आह! ए दोस्त’ ही कथा वाचावी. ‘शीशे के घर’ या संग्रहात  सामान्य माणसाच्या जीवनावर स्वातंत्र्य चळवळ,  स्वातंत्र्य, फाळणी यामुळे झालेल्या परिणामांचं चित्रण आहे. लेखिका पत्रकार असल्याने, विविध क्षेत्रातील अनेकविध विषय त्यांच्या कथांमधून येतात. त्या काळातील चित्रपटसृष्टीविषयीचा सामाजिक दृष्टीकोन, चित्रपट कलावंतांकडे बघण्याचा तुच्छ दृष्टीकोन, इ. विषयीचं सहज, ओघवत्या शैलीतील कथन त्यांच्या ‘रोशनी की रफ्तार’ या कथासंग्रहात येथे. या कथासंग्रहातील ‘जिने बोलो तारा तारा’ ही कथा म्हणजे दुलारेचाचा या चित्रपटशौकीन व्यक्तीचं सुरेख, रेखीव शब्दचित्र आहे.  चारही कथासंग्रहातील कथांमधून त्यांचा माणसांबद्दलचा गाढ विश्वास, त्यांना समजून घेण्याची चिंतनशील वृत्ती, जाणवते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com