14 December 2017

News Flash

रुडॉल्फ डिझेल

त्यांचा जन्म १८५८ मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे झाला.

मंगला गोखले | Updated: July 28, 2017 3:59 AM

रुडॉल्फ डिझेल

डिझेल या पेट्रोलियम इंधंनावर धावणाऱ्या इंजिनचे जनक म्हणून जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल हे ओळखले जातात. १९७८ सालचे ते ‘ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले.

त्यांचा जन्म १८५८ मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. परंतु, १८७० साली फ्रँको-प्रुसियन युद्धामुळे त्यांना फ्रान्स सोडून लंडनला जावे लागले. १८८० मध्ये उच्चतम श्रेणीत पदवी प्राप्त करून रुडॉल्फ डिझेल पॅरिसला परतले. तिथे त्यांनी म्युनिचमधल्या एका प्रोफेसरसोबत काम करून वातानुकूलित यंत्रणा व बर्फाच्या कारखान्याची रचना करण्याचे कार्य हाती घेतले. नंतर बíलन येथे नोकरी करत असताना एका नव्या पद्धतीच्या अंतज्र्वलन इंजिनाच्या कार्यपद्धतीबाबत एकस्व मिळविले.

१८९३ साली त्यांनी कॅर्नोट चक्रावर आधारित इंजिन तयार करायला घेतले. थर्मोडायनॅमिक्सचा सखोल अभ्यास केल्यामुळे, इंजिनाची आखणी व रचना करणे त्यांना सहजशक्य झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘एका नव्या तर्कशुद्ध इंजिनासंबंधीचे सिद्धांत व रचना’ हा शोधनिबंध लिहिला.  पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते.

१९०३ मध्ये त्यांनी डिझेल या पेट्रोलियम इंधनावर धावणाऱ्या इंजिनाचा शोध लावला होता. त्यांनी या इंजिनात पेट्रोल, केरोसिन, वनस्पतीजन्य तेले, इत्यादी इंधनांचा  प्रयोगदेखील करून बघितला होता. आणि त्या विविध प्रयोगांत निरनिराळ्या क्षमतेच्या इंजिनांची  निर्मिती होत गेली. १९१३ मध्ये त्यांनी ‘डिझेल इंजिनाची उत्पत्ती’ या विषयावर दुसरा शोधनिबंध प्रसिद्ध केला.

त्यानंतर अमेरिकेतील बर्मीस्टर ह्य़ा कंपनीने १९१२ मध्ये एक इतिहास घडविला. ‘सेलांडिया’ नावाची ७००० टनांची बोट त्यांनी डिझेल इंजिनवर चालवून दाखविली. कोपेनहेगन, लंडन, अ‍ॅन्टवर्न, जिनोवा व सिंगापूर असा यशस्वी प्रवास त्या बोटीने केला.

पहिली ८५ वष्रे डिझेलचे इंजिन हे विविध प्रकारे उपयोगात आणले जात होते. पण त्याबरोबरच त्यात सातत्याने सुधारणा होत होती. आज जगभर रेल्वे प्रवास, जहाजे, वाहतुकीसाठी वाहने, शेतीची साधने नि उपकरणे तसेच लष्करात डिझेलच्या इंजिनांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो आहे.

जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

नरेश मेहता – विचार

भारतीय साहित्याच्या ज्ञानपीठ या सर्वोच्च सन्मानाच्या समारंभात आभार प्रकट करताना नरेश मेहता म्हणाले, की मला थोडा संकोच वाटतो आहे. गेली अठ्ठावीस वर्षे अनेक मेधावी सर्जकांसाठी हा सन्मान समारंभ आयोजित होत आलेला आहे. या भारतीय भाषेतील तमाम तेजस्वी पुरुषांच्या रांगेत माझ्या उपस्थितीला काही अर्थ आहे की नाही हेही मला काही कळत नाही.

समाज आणि युग एखाद्या प्रतिभावंतांकडून कसली अपेक्षा ठेवते? देश आणि काळाच्या या संधिरेषेवर उभा असलेल्या या  द्रष्टा व्यक्तित्वाचं प्रयोजन काय? अशा अनेक जिज्ञासा आहेत आणि त्याची अंशत: उत्तरंदेखील धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, ज्ञान, विज्ञान यांद्वारे वेळोवेळी दिली गेली आहेत. पण सत्य हे आहे, की दुसऱ्या साऱ्या खंडित वैचारिकतेच्या पाश्र्वभूमीवर काव्यदृष्टी कदाचित पूर्ण तसेच अखंडतेच्या किती तरी निकट आहे.

समाजाची आणि युगाची सर्जकाकडून हीच अपेक्षा आहे, की त्या श्रेष्ठत्वाला तो किती जवळ आणतो; इतकं की ते सहज आणि विश्वसनीय वाटायला हवं. रामायण, महाभारतानंतर भक्तिकाव्याने तर या साऱ्या देवत्वाला घर अंगणातील क्रीडा आणि रास बनवलं. देवत्व इतकं साधारण होऊनही सादर होऊ शकतं याची कल्पना नव्हती. पण कबीरापासून तुलसीदासापर्यंत सगळ्यांनी हे उपकार समाजावर केलेले आहेत. भक्तिकाळात सूर-तुलशीने त्यालाच राम आणि कृष्णाच्या माध्यमातून अधिक मानवत्व प्रदान केलं. अयोध्या, वृंदावन ही साऱ्या परात्मतेची तीर्थ बनली. सारी धरती तीर्थरूप बनावी ही आकांक्षा सृष्टीच्या गतिचक्राचा आधार आहे. ही प्रक्रिया अहोरात्र सक्रिय आहे.  सर्जनाच्या सगळ्या प्रकारांच्या जाणिवेची मनुष्यात प्रतिष्ठापना करणे हे दायित्व आहे. धर्म, दर्शन, राजनीती आणि ज्ञान-विज्ञान कोणाजवळच असं संबोधन नाही. सुरुवातीपासून आजपर्यंत काव्य आपल्या या भूमिकेच्या बाबतीत जागृत आहे, की मनुष्याचं असंतुलित होणं हे केवळ समाजाच्या नव्हे तर सृष्टी आणि समष्टीसाठीही भयावह आहे.

काव्य हीच अशी सृजनात्मक सत्ता आहे, की जी त्याला केवळ शास्त्राच्या तावडीतून आणि शस्त्रांच्या तावडीतून मुक्त करीत नाही तर निर्भय बनवण्यासाठी धर्म आणि राजनीतीचा रागही ओढावून घेण्यासाठी तयार करते. त्याची वाणी हीच चैतन्य-वाणी आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on July 28, 2017 3:59 am

Web Title: marathi articles on rudolf diesel