News Flash

वैद्यक तंत्र वस्त्रे भाग ३

या प्रकारचे पदार्थ जखमा शिवण्यासाठी तसेच अवयव बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येतात.

शरीरातील रोपण घटक : यामध्ये कृत्रिम रक्तवाहिन्या, हृदयातील कृत्रिम झडपा, कृत्रिम मज्जातंतू, कृत्रिम त्वचा, डोळ्यातील संपर्क भिगे आणि कृत्रिम सांधे यांचा समावेश होतो.

रोपणक्षम साधने : या प्रकारचे पदार्थ जखमा शिवण्यासाठी तसेच अवयव बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येतात. (उदा. कृत्रिम रक्तवाहिन्या, कृत्रिम मज्जातंतू इत्यादी.) जर असे घटक शरीराने स्वीकारावयाचे असतील तर अशा वस्त्रांसाठी जैविक सुसंगतता हा सर्वात आवश्यक गुणधर्म असतो.
रोपणक्षम साधनांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
जखमा शिवायचा दोरा (सुचर धागा) : यामध्ये जैविकदृष्टय़ा विघटनक्षम असलेले आणि जैविकदृष्टय़ा विघटनक्षम नसलेले असे दोन प्रकार असतात. जैविकदृष्टय़ा विघटनक्षम धागे हे कोलॅजेन, पॉलि लॅक्टाइड किंवा पॉलि ग्लायकोलाइड यांच्या एकेरी तंतूंच्या गोफापासून बनविण्यात येतात. तर जैविकदृष्टय़ा विघटनक्षम नसलेले धागे हे पॉलिस्टर, नायलॉन, अथवा पॉली प्रॉपिलीन यांच्या एकेरी तंतूंच्या गोफापासून बनविण्यात येतात. जर जैविकदृष्टय़ा विघटनक्षम धाग्यांचा वापर जखम शिवण्यासाठी केला असेल तर असे टाके काढण्याची गरज पडत नाही. याउलट जर जैविकदृष्टय़ा विघटनक्षम नसलेल्या धाग्यांचा वापर केला असेल तर ठरावीक कालावधीनंतर टाके काढावे लागतात. ही प्रक्रिया थोडी क्लेशदायक असते. आता मात्र यापेक्षा अगदी वेगळ्याच पद्धतीचा वापर शस्त्रक्रियेच्या वेळची जखम शिवण्यासाठी केला जातो. तिथे असा कोणत्याही धाग्यांचा वापर केला जात नाही.
शरीरातील रोपण घटक : यामध्ये कृत्रिम रक्तवाहिन्या, हृदयातील कृत्रिम झडपा, कृत्रिम मज्जातंतू, कृत्रिम त्वचा, डोळ्यातील संपर्क भिगे आणि कृत्रिम सांधे यांचा समावेश होतो. कृत्रिम रक्तवाहिन्या आणि कृत्रिम झडपा या पॉलिस्टर तंतूंपासून विणाई किंवा गुंफाई पद्धतीने बनविलेल्या कापडापासून तयार करण्यात येतात. कृत्रिम मज्जातंतू हे पॉलिस्टर आणि कर्ब यांच्यापासून बनविलेल्या विना-वीण कापडापासून किंवा गोफापासून तयार केले जातात. कृत्रिम त्वचा ही कायटिन तंतूंपासून, कृत्रिम संपर्क िभगे ही सिलिकॉन किंवा कोलॅजेन तंतूंपासून तर कृत्रिम सांधे हे सिलिकॉन, पॉलिथिलिन अथवा पॉलिअ‍ॅसिटल तंतूंपासून बनविले जातात.
बाह्य़ोपचाराची साधने : या प्रकारची साधने शरीरावरील बाह्य़ोपचारासाठी वापरण्यात येतात, त्यांचा त्वचेशी संपर्क येतो किंवा येत नाही. या प्रकारामध्ये प्रामुख्याने मलमपट्टय़ा, प्लास्टर आणि विविध प्रकारच्या दाब देणाऱ्या पट्टय़ा यांचा समावेश होतो.
चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

चिथिरा थिरूनलचे प्रशासन
पद्मदास चिथिरा थिरूनल राम वर्मा हा त्रावणकोर संस्थानाचा अखेरचा अधिकृत शासक. उत्तम प्रशासन देऊन अनेक सार्वजनिक सुधारणा केल्यामुळे आदर्श राजा म्हणून गौरविल्या गेलेल्या या राजाची कारकीर्द इ.स. १९२४ ते १९४९ अशी झाली.
चिथिराने १९३७ साली त्रावणकोर विद्यापीठ (सध्याचे केरळ विद्यापीठ) स्थापन करून १९४० सालापासून राज्याच्या उत्पन्नाच्या ४०% खर्च शिक्षणावर केल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढले. त्याच्या काळात त्याने तिरुवनंतपूरम आंतर्देशीय विमानतळ, केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन, पल्लीवसल हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड केमिकल्स, त्रावणकोर इत्यादी प्रकल्प सुरू करून औद्योगिक विकासाला गती दिली. चिथिरा याने उद्योगधंद्यांना उत्तेजन देताना रबर, सिरॅमिक्स, खनिजे यांसारखा केरळातील कच्चा माल वापरण्यावर भर दिला. त्रावणकोर रबर वर्क्‍स, कुंदरा सिरॅमिक्स, त्रावणकोर कोचिन मिनरल्स यांसारखे अनेक प्रकल्प राजा चिथिराने चालू केले.
चिथिरा स्वतसाठी अवास्तव खर्च करण्याच्या विरोधात होता. त्याच्या पूर्वीच्या त्रावणकोर राजांनी महादानम, हिरण्यगर्भम, तुला पुरुषदानम यासारख्या अतिखर्चीक धार्मिक विधींना फाटा दिला.
चिथिराच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध पेरियार नॅशनल पार्क हे अभयारण्य तयार केले गेले. संगीतकार, नर्तक आणि वैदिक पंडितांना राजाश्रय देऊन कर्नाटक संगीत लोकाभिमुख करण्यासाठी त्याने संगीतज्ज्ञांची नियुक्ती केली. भव्य कलादालन उभे करून त्यात राजा रवि वर्मा, जेमिनी रॉय, रवींद्रनाथ टागोर, के.सी.एस. पणीक्कर प्रभृती प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींची मांडणी केली. ही चिथिराची महत्त्वाची देणगी होय. त्रावणकोर संस्थानातील प्रसिद्ध वायकोम महादेव मंदिराच्या दलित प्रवेशबंदीचे पूर्वीचे विधेयक राजा चिथिराने १९३६ साली रद्द करून मंदिर प्रवेश सर्वाना खुला केल्याचा जाहीरनामा काढला. १ जुल १९४९ रोजी त्रावणकोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:57 am

Web Title: medical system clothes part 3
Next Stories
1 त्रावणकोर : सेथु लक्ष्मीबाईची कारकीर्द
2 कुतूहल – वैद्यक तंत्र वस्त्रे भाग – १
3 कुतूहल – तांत्रिक वस्त्रांचे प्रकार – गृहवस्त्रे : २
Just Now!
X