X
X

जे आले ते रमले.. : मेहबूब खान यांचे चित्रपट (२)

READ IN APP

१९४५ साली मेहबूब खाननी ‘मेहबूब प्रॉडक्शन्स’ ही स्वतची निर्मिती संस्था आणि स्टुडिओ स्थापन केला.

पठाण कुटुंबात बिलीमोरा येथे जन्मलेले मेहबूब खान पुढे मुंबईला येऊन िहदी चित्रपटसृष्टीत स्थिरावले, एक नामांकित चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विख्यात झाले. मेहबूब खानना ‘जजमेंट ऑफ अल्लाह’ (१९३५) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची पहिली संधी प्राप्त झाली. पुढे डेक्कन क्वीन (१९३६), एक ही रास्ता (१९३९), औरत (१९४०) हे चित्रपट त्यांनी सागर मूव्हीटोन आणि नॅशनल स्टुडिओसाठी दिग्दíशत केले. १९४० साली त्यांनी दिग्दíशत केलेला ‘औरत’ प्रचंड गाजला. याच ‘औरत’ची रंगीत पुनर्निर्मिती त्यांनी ‘मदर इंडिया’द्वारे १९५६ मध्ये केली. मदर इंडिया िहदी चित्रपट क्षेत्रात गुणवत्तेचा मापदंड मानला गेला!

१९४५ साली मेहबूब खाननी ‘मेहबूब प्रॉडक्शन्स’ ही स्वतची निर्मिती संस्था आणि स्टुडिओ स्थापन केला. डाव्या विचारसरणीकडे कल असलेल्या मेहबूब खान यांच्या संस्थेचे ‘विळा कोयता’ हे बोधचिन्ह प्रसिद्ध होते. त्यांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी अनमोल घडी, मदर इंडिया, आन, अमर, अंदाज वगरे सात चित्रपटांची निर्मिती केली तर चोवीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले, चार चित्रपटांत छोटीशी भूमिका केली आणि दोन चित्रपटांचे पटकथा लेखनही केले! मेहबूब खानांच्या मार्गदर्शनाखाली आपली अभिनयाची कारकीर्द सुरुवात करणारे अनेक अभिनेते, अभिनेत्री पुढे मोठे दिग्गज कलावंत म्हणून उदयाला आले. त्यात सुरेंद्र, दिलीपकुमार, सुनील दत्त, राजकुमार, राजेंद्रकुमार, राज कपूर, नíगस, निम्मी, नादिरा यांचा समावेश आहे. त्यांनी निर्मिती केलेला, १९६२ साली प्रदर्शित‘सन ऑफ इंडिया’ हा अखेरचा चित्रपट. अर्थपूर्ण चित्रचौकटी, लोकसंगीताचा सुयोग्य वापर, सामान्य प्रेक्षकाला सहज पचनी पडेल असे सादरीकरण ही त्यांची वैशिष्टय़े.

िहदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ आपला ठसा उमटवणाऱ्या मेहबूब खान यांचे ते कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच १९६४ साली निधन झाले. आदल्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. या धक्क्याने मेहबूब खानांचे प्राणोत्क्रमण झाले असे म्हटले जाते. ‘मदर इंडिया’ या त्यांच्या चित्रपटाला १९५८ सालचा उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. २००७ साली त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल खात्याने त्यांचे तिकीट प्रसिद्ध केले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

23
X