23 April 2019

News Flash

मोल आणि कँडेला

एक कँडेला हे प्रकाशदीप्तीचे म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या प्रकाशस्रोताच्या तेजस्वितेचे एकक आहे.

मोल हे एकक रसायनातील कणसंख्येशी निगडित आहे. कोणत्याही मूलद्रव्याच्या एक मोलमधील अणूंची संख्या किंवा कोणत्याही संयुगाच्या एक मोलमधील रेणूंची संख्या ही सारखीच असते. मोलची व्याख्या करण्यासाठी वस्तुमानाचा आधार घेतला जातो. या व्याख्येनुसार १२ अणुभार असणाऱ्या कार्बनच्या समस्थानिकाच्या (कार्बन-१२) १२ ग्रॅम इतक्या वस्तुमानात असलेल्या अणूंच्या संख्येएवढी कणसंख्या ही एक मोल इतकी मानली गेली आहे.

मात्र स्थिरांकांच्या या युगात या परिमाणाला वजनाच्या मोजमापापासून पूर्णपणे मुक्तकरणे शक्य होते ते अ‍ॅवोगाड्रोचा स्थिरांक वापरून. अ‍ॅवोगाड्रोच्या स्थिरांकानुसार या बारा अणुभार असणाऱ्या कार्बनच्या बारा ग्रॅममध्ये कार्बनचे ६.०२२१४०८५७ ७ १०२३ इतके अणू आढळतात. म्हणूनच ‘मोल’ची नवी व्याख्या म्हणजे ६.०२२१४०८५७ ७ १०२३ इतके अणू वा रेणू.

एक कँडेला हे प्रकाशदीप्तीचे म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या प्रकाशस्रोताच्या तेजस्वितेचे एकक आहे. प्रत्येक वस्तू ही कोणत्याही तापमानाला त्या तापमानाशी निगडित अशा तरंगलांबीच्या प्रकाशलहरी उत्सर्जति करीत असते. (याला कृष्णप्रारण म्हटले जाते.) कँडेलाची पूर्वीची व्याख्या ही एका ठरावीक तापमानाला (प्लॅटिनमचा गोठणिबदू) उत्सर्जति होणाऱ्या कृष्णप्रारणांच्या तीव्रतेशी निगडित होती. परंतु अशा प्रकारे वस्तूची तेजस्विता मोजण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणींमुळे १९७९ साली या व्याख्येत बदल करून ती ठरावीक तरंगलांबीच्या (सेकंदाला ५४० ७ १०१२ आंदोलने करणाऱ्या, हिरव्या रंगाच्या) प्रकाश उत्सर्जनाशी निगडित केली गेली. आपला डोळा या प्रकाशलहरीला सर्वात जास्त संवेदनशील असतो.

या नवीन व्याख्येनुसार, वरील तरंगलांबीचे प्रकाशकिरण उत्सर्जति करणाऱ्या स्रोतापासून, त्याभोवतीच्या एक स्टेरेडिअन इतक्या घन कोनामधून १/६८३ वॉट ऊर्जा उत्सर्जति होत असेल, तर त्याची प्रकाशदीप्ती एक कँडेला म्हटली जाते. (कोणत्याही बिंदूभोवतालचा एकूण घन कोन हा चार पाय इतका म्हणजे १२.५६६३७ स्टेरेडिअन असतो.) या व्याख्येतील ६८३ ही संख्या उत्सर्जति प्रकाशाची तीव्रता आणि उत्सर्जति ऊर्जा यांचा संबंध दर्शवणारी संख्या आहे. ‘प्रकाशदीप्ती गुणकारिता’ (ल्युमिनॉसिटी एफिकसी) या नावे ओळखली जाणारी ही संख्या हा एक वैश्विक स्थिरांक आहे. अशा प्रकारे प्रकाशदीप्तीचे एकक काही दशकांपूर्वीपासूनच वैश्विक स्थिरांकांशी जोडले गेलेले आहे.

डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

डॉ. रघुवीर चौधरी- साहित्य

कविता हा रघुवीर चौधरी यांचा खास आवडीचा साहित्य प्रकार असला तरी त्यांनी कादंबरीलेखनही विपुल केले आहे. शब्दप्रभू चौधरी यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या हरिगीत, झुलना  इ. पारंपरिक, आध्यात्मिक काव्यगायनाचे गहिरे संस्कार लहानपणापासूनच झाले आणि त्यातूनच त्यांच्या काव्यलेखनाला प्रेरणा मिळाली.

‘तमसा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘वहेता वृक्ष पवनमा’, ‘दिवाली थी देवदिवाली’, ‘फुटपाथ अने शेडो’, ‘धराधाम’ आणि ‘बचावनामु’ हे ९५ पृष्ठांचे दीर्घकाव्यही प्रसिद्ध झाले आहे. ते एक भावपूर्ण, संवेदनशील लेखक आहेत. उपरोधातून विनोदाची चांगली जाण त्यांना आहे. लेखकाजवळ देण्यासारखे, सांगण्यासारखे काही नसेल तर त्याने लिहू नये, असे ते स्पष्टपणे म्हणतात.

१९६४ मध्ये त्यांची ‘पूर्वराग’-ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची दुसरी कादंबरी ‘अमृता’ ही गुजरातीतील एक उत्कृष्ट कादंबरी आहे. १९६९ मध्ये ‘परस्पर’, वेणुवत्सला, १९७८ मध्ये रुद्रमहालय आणि सोमतीर्थ. या त्यांच्या गुजरातीतील दर्जेदार, ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. ऐतिहासिक संदर्भाशी प्रामाणिक राहत, कधीकधी काही गोष्टी बाजूला सारत या कादंबरीची वातावरणनिर्मिती केली आहे. या व्यतिरिक्त ‘बारीमाथी ब्रिटन’ हे प्रवासवर्णन आणि अशोकवन आणि झुलता किनारा (१९७०) ही नाटकेही  प्रकाशित झाली आहेत.

विजय बाहुबली आणि लोकलीला या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्या आहेत. एकापेक्षा एक कसोटीच्या क्षणांना तोंड देणाऱ्या रसेश्वर ते योगेश्वर बनलेल्या प्रेरणादायी श्रीकृष्णाच्या व्यक्तित्वाचा परिचय गोकुल, मथुरा, द्वारिका या कादंबरीत रघुवीर चौधरी यांनी करून दिला आहे. गोकुलके लोकनायक कृष्ण, मथुरा के युगपुरुष कृष्ण आणि द्वारिकेचे योगश्वर कृष्ण अशा या एकमेकांना पूरक असलेल्या परिपूर्ण व्यक्तित्वाचा परिचय करून दिला आहे.  गझनीच्या महमूदने सोमनाथ मंदिर लुटले, धार्मिक तेढ निर्माण झाली. खरेतर महमूदचे दोन सेनापती हिंदू होते आणि तो धर्मावर घाला घालण्याच्या इराद्याने आलाच नव्हता. त्याची भूक होती सत्ता आणि संपत्ती. तत्कालीन राजनैतिक, सामाजिक स्थिती, लोकांचे डावपेच, त्यांच्या सुख-दु:खावर सोमतीर्थ  या  कादंबरीत  त्यांनी प्रकाश टाकला असून,  ती एक वाचनीय कादंबरी आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on December 25, 2017 2:13 am

Web Title: mole measurement chemistry science