संस्थानांची बखर

सध्या कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्य़ात असलेले मुधोळ हे ब्रिटिश राजमध्ये नऊ तोफांच्या सलामीचा मान असलेले संस्थान होते. साधारणत: १३०० साली चितोडच्या राणाचे वंशज मुधोळ येथे स्थलांतरित झाले. त्यांच्यापकी राणा भरवजी ऊर्फ बोसाजी यास मुधोळची जहागिरी मिळाली. त्याचा वंशज उग्रसेन याने भोसले हे उपनाव घेतले. सातारा, कोल्हापूर, नागपूर, तंजावर येथील राज्यकत्रे आणि मुधोळचे भोसले एकाच वंशाचे. पुढे राजे भीमसिंग यांना इ.स. १४७० मध्ये घोरपडे हा खिताब मिळाल्यावर पुढील पिढय़ांनी घोरपडे हेच उपनाव लावले. चोलराज घोरपडे (१५६५-१५७८) याला विजयनगरची सात हजारी मनसबदारी आणि २६ गावे इनामात मिळाली. बाजी घोरपडे हा आदिलशहाकडे नोकरीस असताना शहाजी भोसले यांना पकडण्याची कामगिरी बाजीने मुस्तफाच्या मदतीने पार पाडली. इथपावेतो जहागीर म्हणून अस्तित्व असलेले मुधोळ मालोजीराव घोरपडे (कारकीर्द १६६६ ते १७००) यांच्या काळात एक स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले. मालोजीराव घोरपडे विजापूरच्या आदिलशहाकडे प्रमुख सेनानी म्हणून नोकरीत होते. मिर्झाराजे जयसिंहाने विजापूरवर हल्ला केला तेव्हा मालोजीरावांनी केलेल्या कामगिरीबद्दल आदिलशहाने त्यांना पाच महालांचे राजेपद आणि सात हजारी पायदळाची मनसबदारी दिली. मालोजीरावांचा पणतू मालोजीराव घोरपडे द्वितीय याचा पेशव्यांशी स्नेह होता. त्यांनी त्याची जहागिरी आणि मुधोळच्या राज्यास मान्यता दिली. पुढे त्याचा मुलगा व्यंकटराव याने १८१९ मध्ये कंपनी सरकारचे आधिपत्य स्वीकारल्यामुळे मुधोळ हे ब्रिटिशअंकित संस्थान बनले. राजे भरवसिंह घोरपडे द्वितीय हे मुधोळ संस्थानाचे अखेरचे राजे. त्यांनी मुधोळ संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले.

jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात
Shahpurkandi
यूपीएससी सूत्र : जम्मू काश्मीरच्या सीमेवरील शहापूरकंडी धरण अन् राजकीय पक्षांना असलेली आयकरातील सूट, वाचा सविस्तर…

sunitpotnis@rediffmail.com

——–
कुतूहल

तांत्रिक किंवा कार्योपयोगी वस्त्रे-१

वस्त्रोद्योग म्हटले की सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यापुढे शर्ट, पँट, साडी, धोतर, सलवार-खमीज यांसारखे अंगावर घालावयाचे कपडे किंवा आपण घरात वापरत असलेले टॉवेल, चादर, सतरंजी, बेडशीट यांसारखे कपडे उभे राहतात. परंतु आजच्या वस्त्रोद्योगाचा आवाका फार मोठा आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत वस्त्रांचा उपयोग केला जातो. वस्त्राच्या उपयोगावरून ते तयार करणाऱ्या उद्योगाची तीन भागांत वर्गवारी केली जाते. वस्त्रप्रावरणे, गृहोपयोगी वस्त्रे, तांत्रिक किंवा कार्योपयोगी वस्त्रे, अंगावर नेसावयाच्या वस्त्रांबरोबरच आपण घरांमध्ये पडदे, टेबलावर पसरवायचे कापड, सोफा कव्हर, कार्पेट अशा अनेक कारणांसाठी कापडाचा वापर करतो. याबरोबरच आज इतर अनेक क्षेत्रांत कापडाचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. कृषी, औद्योगिक, वैद्यकीय, मोटारगाडय़ा, क्रीडा, इलेक्ट्रॉनिक यांसारख्या अनेक क्षेत्रांत कापडाचा वापर मोठय़ा गतीने वाढत आहे.
अंगावर घालावयाच्या किंवा घरामध्ये वापरावयाच्या वस्त्रांचा उपयोग प्रामुख्याने सौंदर्य, सजावट व कलात्मकता या कारणांसाठी केला जातो. त्या दृष्टीने त्यांची रचना व उत्पादन केले जाते. परंतु तांत्रिक उपयोगासाठीच्या वस्त्रांमध्ये सौंदर्य, सजावट व कलात्मकता या गुणांपेक्षा त्यांची तांत्रिक क्षमता आणि त्या उपयोगासाठी लागणारे तांत्रिक गुणधर्म असणे जास्त महत्त्वाचे असते व अशा दृष्टीने त्यांची रचना व उत्पादन केले जाते. तांत्रिक वस्त्रांना विशिष्ट कार्योपयोगी वस्त्रे, तंत्र कार्यक्षम वस्त्रे, औद्योगिक वस्त्रे, अभियांत्रिकी वस्त्रे, उमदी वस्त्रे आणि उच्च तंत्र तंतू अशा विविध नावांनीही संबोधले जाते.
तांत्रिक वस्त्रांचे क्षेत्र हे ज्ञानावर आधारलेले आणि संशोधनाभिमुख क्षेत्र असून ते हळूहळू पण निश्चितपणे आपला पाया विस्तारत आहे. आजच्या काळात धातू व लाकूड यांची उपलब्धता कमी होत चालली आहे. ती भरून काढण्यासाठी, तसेच धातू व लाकूड यांसारख्या नसíगक पदार्थापेक्षा वेगळ्या व अधिक चांगले गुणधर्म मिळवण्यासाठी, तांत्रिक वस्त्रांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. विविध क्षेत्रांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये आरोग्य व सुरक्षितता, किंमत, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता, उच्च ताकद, वजनाचा हलकेपणा, अष्टपलुत्व, ग्राहकाभिमुखता, पर्यावरणपूरकता अशा अनेक गुणांची आवश्यकता व मागणी वाढत आहे. यांची पूर्तता तांत्रिक वस्त्रे समाधानकारकरीत्या करू शकतात आणि म्हणूनच या क्षेत्राचा विकास झपाटय़ाने होत आहे.