23 February 2019

News Flash

संगीतमय म्हैसूर

कृष्णराजा स्वत संगीतकार आणि संगीतज्ञ होता.

म्हैसूर संस्थानाचे महाराज कृष्णराजा तृतीय, चामराजा दहावा, कृष्णराजा चतुर्थ आणि जयचामराजा हे शास्त्रोक्त संगीताचे महान आश्रयदाते म्हणून ओळखले जातात. कृष्णराजा स्वत: संगीतकार आणि संगीतज्ञ होता. त्याने ‘चामुंडेश्वरी’ या टोपणनावाने अनेक जावळी (कविता) आणि भक्तीकाव्यसंग्रह लिहिले. कृष्णराजा नंतर आलेला चामराजा दहावा याने केवळ संगीतविषयक ग्रंथ आणि ग्रामोफोन रेकॉर्ड्स यांचा संग्रह करून १८९१ मध्ये त्यासाठी ‘ओरिएंटल लायब्ररी’ सुरू केली. चामराजा वोडीयार हा स्वत उत्तम व्हायोलीन वादक होता. चामराजाच्या दरबारात वीणा (वीणा वादक) शेषाण्णा आणि वीणा सुब्बाण्णा हे दोन निष्णात संगीतकार होते. वीणा शामण्णा हा संगीतकार गायकीत आणि वाद्यवादनात निपुण होता. शास्त्रोक्त गायनाबरोबर तो वीणा, व्हायोलीन, घट आणि स्वराभात वादनातही विख्यात असल्यामुळे चामराजाने त्याला दरबारी संगीतकार म्हणून नियुक्त केले. त्याच्या संगीतविषयक प्रतिभेमुळे शामण्णा ‘तालब्रह्म’ या नावानेच ओळखला जाई. शामण्णानंतरचा दरबारी संगीतज्ञ वीणा पद्मनाभ याच्या प्रेरणेने राजा चामराजाने राज्यात संगीत शाळा सुरू केल्या. चामराजा स्वत व्हायोलीन वादनात तरबेज असल्याने तो बहुतेक सर्व संगीत समारोहांमध्ये सहभागी होत असे. ‘पद्मनाभ’ या नावाने त्याने संस्कृत, तेलगू आणि कन्नडमध्ये अनेक संगीत रचना बांधल्या. वोडीयार राजघराण्याच्या सर्व सदस्यांनी कर्नाटक संगीत शिकणे ही परंपराच चालत आली होती. राजा कृष्णराज वोडीयार चतुर्थ हे तर वीणा, व्हायोलीन, मृदंगम, नागस्वर, सितार, हार्मोनियम या वाद्यांबरोबरच सॅक्सोफोन आणि पियानो या पाश्चिमात्य वाद्यवादनातही तरबेज होते. म्हैसूर संस्थानचे सर्व राज्यकत्रे आणि त्यांच्या दरबारातले असंख्य संगीतकार यांनी कर्नाटक संगीताला झळाळी देऊन िहदुस्थानी (उत्तर) संगीताप्रमाणे लोकप्रिय केले.

 सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

कुतूहल

कृषी तंत्र वस्त्राचे उपयोग – २

वृक्ष जाळे : ज्या झाडांवर फळे जमिनीलगत लागतात अशा फळांसाठी वृक्ष जाळ्यांचा वापर केला जातो. ह्य़ा जाळ्यांमुळे झाडे उभी वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे फळांचा ओलसर जमिनीशी संपर्क येत नाही आणि फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते.
भूआच्छादन : हे शेतीसाठी आणि फळ व फुलबागेसाठी एक बहुउपयोगी कापड आहे.
भूआच्छादनामुळे तणांची वाढ खुंटते. जमिनीतील ओलावा टिकून राहतो, जमिनीचा पृष्ठभाग स्वच्छ राहतो आणि अतिनील किरणांपासून पिकांचे सरंक्षण होते. भूआच्छादनामुळे तणनाशकाचा कमीत कमी उपयोग करणे शक्य होते. यामुळे खर्च कमी होतोच, पण त्याचबरोबर पर्यावरण रक्षणही होते. भूआच्छादन हे सर्व साधारणपणे रोप वाटिकेमध्ये, शेताच्या कडेच्या भागात, ग्रीन हाऊसच्या जमिनीवर, मऊ फळांची झाडे व ऑíकडसाठी जमीन तयार करण्यासाठी केला जातो.
वात संरक्षक जाळे : कृषी क्षेत्रामध्ये वात संरक्षक जाळ्यांचा उपयोग लहान तरूंचे, फळांचे व झाडांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
मूळ सरंक्षक जाळे : झाडे जेव्हा एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावली जातात त्या वेळी ती खणून काढताना आणि वाहून नेताना त्यांच्या मुळांचे सरंक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे असते. अशा वेळी मुळांभोवती गुंडाळण्यासाठी मूळ संरक्षक जाळ्याचा उपयोग केला जातो. ही झाडे दुसरीकडे नेऊन लावताना हे जाळे काढण्याची आवश्यकता नसते कारण या जाळ्यांमधून मुळे बाहेर येऊ शकतात.
मिल्चगसाठी वापरले जाणारे कापड : मिल्चग कापड हे भूआच्छादनासारखेच असते आणि याचा उपयोग प्रामुख्याने फळबागांमध्ये तणांची वाढ नियंत्रित राखण्यासाठी केला जातो. मिल्चग कापड हे जमिनीवर अंथरण्यात येते व फक्त रोप या कापडातून बाहेर येते. यामुळे रोपाच्या शेजारील जमिनीवर पुरेसा प्रकाश पोहोचू शकत नाही व तणांची वाढ खुंटते. याशिवाय जमिनीतील पाण्याचे उध्र्वपतन कमी झाल्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते, तर थंड प्रदेशात मुळे गोठण्यापासून वाचविली जातात. सुई छिद्रित विनावीण पद्धतीने बनविलेले कापड या कारणासाठी वापरले जाते.
थंडी आणि हिम दव संरक्षक कापड : या प्रकारच्या कृषी तंत्र वस्त्राचा उपयोग प्रामुख्याने थंड प्रदेशात केला जातो. सहा प्रकारचे कापड रोपांच्या वर झाकले जाते व त्यामुळे रोपांचे थंडी आणि हिम वर्षांवापासून सरंक्षण होते.

 चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

First Published on December 2, 2015 12:42 am

Web Title: musical mysore
टॅग Musical,Mysore