14 December 2017

News Flash

इतिहासात आज दिनांक.. २० नोव्हेंबर

१६०२ गेरिक ओटोफोन यांचा जन्म. तो जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. हवेच्या दाबासंबंधीचे महत्त्वाचे प्रयोग त्यांनी

Updated: November 20, 2012 5:16 AM

१६०२ गेरिक ओटोफोन यांचा जन्म. तो जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. हवेच्या दाबासंबंधीचे महत्त्वाचे प्रयोग त्यांनी केले.
१८५९ माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांचे निधन. भारतातील मराठय़ांची सत्ता संपुष्टात आणण्याचे कार्य एलफिन्स्टनने धूर्तपणे पार पाडले. गव्हर्नर, कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार म्हणून परिचित असलेल्या एलफिन्स्टनचा जन्म १७७९ मध्ये ६ ऑक्टोबर रोजी झाला. कलकत्ता येथून नोकरीचा श्रीगणेशा केला आणि बनारसला मॅजिस्ट्रेट डेव्हिसच्या हाताखाली तो कामाला लागला. १८०० मध्ये त्याने फोर्ट विल्यम कॉलेजातून परीक्षा दिली आणि १८०२ मध्ये पुण्याला रेसिडेन्सित आला. १८०३ मध्ये नागपूर, १८०७ शिंदे सरकार, १८०८ मध्ये काबूल, १८१० पासून पश्चिय भारत येथे त्याचे वास्तव्य झाले. सूरजी अंजनगावच्या तहात एलफिन्स्टनचा सहभाग होता, त्याबद्दल रियासतकार सरदेसाई म्हणतात- ‘रेसिडेंट एलफिन्स्टोनची कारकीर्द बाजीरावास पूर्ण भोवली’,  (मराठी रियासत खंड ८ पृ. ३९२) तहांद्वारे पेशव्यांचे त्यांच्या सरदारांवरील नियंत्रण एलफिन्स्टनने संपुष्टात आणले. १८३४ मध्ये त्यास भारताचे गव्हर्नर जनरल पद देऊ करण्यात आले. पण त्याने ते नाकारले.
१९०५ स्वतंत्र पक्षाचे नेते मिनू मसानी यांचा जन्म. संसदेतील त्यांचे कार्य लक्षणीय आहे.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

First Published on November 20, 2012 5:16 am

Web Title: navneet 11
टॅग Navneet