सं नाही ना तुला वाटत? अरे, एकदा मनातली जळमटं काढून टाकली की बरं वाटतं. फ्रेश वाटतं. हे छानच झालं. पण परवाचं सांगतो, आम्ही युरोप टूरला जाऊन आलो. परतल्यावर मित्रांचे फोन आले. हे बघितलं का? ते जवळून दाखवलं का? सगळं सांगितलं. पण एक मित्र खनपटीला बसून म्हणाला, ‘पहिल्या दिवसापासून प्रत्येक शहरात कधी पोहोचलात? कसे गेलात, आलात ते क्रमवार सांग!’ दांडी गुल, अरे प्रवासाची ‘आयटेनररी’ विसरूनच गेलो. या आठवणी म्हणजे काही मनातली जळमटं नव्हेत. हे अ‍ॅबनॉर्मल आहे का सांग ना रे!’
मानस : उत्तम प्रश्न विचारलेस. पहिली गोष्ट म्हणजे मनातली जळमटं एकदा काढून भागत नाही मित्रा, धिस मस्ट बी रेग्युलर अ‍ॅक्टिव्हिटी. जुन्या गोष्टी फेकून दिल्याशिवाय नव्या गोष्टी सामावणार कशा काय? स्मरणशक्तीमध्ये साठवलेल्या गोष्टी म्हणजे प्रसंगांची जंत्री नसते. त्या अनुभवांच्या अनुषंगाने मनात अनेक कडूगोड भावनांच्या स्मृती तयार होतात. प्रसंगांमधले बारकावे विरून जातात पण त्या वेळी जाणवलेल्या भावनांचा विसर पडत नाही. त्यामुळे ‘कीप युवर माइण्ड क्लीन.’ तू युरोप टूर करून आलास तो खूप मजेदार अनुभव होता. तुझं मन आनंदात होतं तरी प्रवासाच्या आयटनररीचा विसर कसा पडला? आणि हे अ‍ॅबनॉर्मल आहे का?
अ‍ॅबनॉर्मल नक्की नाही. हे बघ. आपण गोष्टी लक्षात ठेवण्याकरिता सर्वसाधारणपणे त्यांची यादी बनवतो. अशा यादीमध्ये किती गोष्टी सामावतात? फार तर सात-आठ इतक्याच. म्हणजे क्रमवार यादी केलीस तर तुला पाच-सहा शहरांची किंवा ठिकाणांची नावं लक्षात राहतील. पण अशा यादीचं पाठांतर करावं लागतं तर ती मनात पक्की होते. आता आपण पर्यटनाला जातो की पाढे पाठ करायला? मानस हसून म्हणाला.
मग तिथे घडलेल्या घटना कशा आठवतात?
 ‘अरे मित्रा, त्यादेखील तुला क्रमवार आठवणार नाही. त्यासाठी तू पर्यटनाचे मॅप घेऊन बस, कार्यक्रमाची यादी पाहा, तुला नक्की आठवेल. सो डोण्ट वरी. धिस इज नॉट डिमेन्शिआ..’
मी सुस्कारा टाकला. पण मनात पुन्हा शंका. मानस- सगळे तपशील नाही आठवत! त्याचं काय?
मानस हसून म्हणाला, याचं कारण घुसखोरी. तू खूप ठिकाणं पाहिलीस. पण गंमत अशी झाली की पहिल्या ठिकाणची एन्जॉयमेंट, तिथले तपशील मनात पूर्णपणे सामावण्याअगोदर नवे अनुभव त्या स्मरणकोशात घुसले. आपल्या मनातली मौजमजेची माहिती नीट ऑर्गनाइझ व्हावी लागते. ती सुसूत्रपणे मनात साठवायला थोडा अवधी लागतो. असं सुसूत्रीकरण होण्याआधी नव्या माहितीची घुसखोरी सुरू होते. त्यामुळे आईस्क्रीम खाल्लं ते आठवतं पण ते इटली नि ऑस्ट्रियाच्या बॉर्डरवर की ब्लॅक फॉरेस्टात हा तपशील सटकतो. त्यातूनही दोन अनुभव अगदी भिन्न असले तर त्यांच्या स्मृती नीट सुसूत्रपणे तयार होतात. त्यांच्यात घुसाघुशी होत नाही. परंतु दुसरा अनुभव पहिल्यापेक्षा ‘लय भारी’ असला तर आधीच्या अनुभवाला गळती लागते. त्याचे तपशील निसटतात. हेदेखील नॉर्मल हं! ‘हुश्श, मानस मित्रा, खूप छान समजावलंस रे. मुख्य म्हणजे, आपल्याला स्मृतिभ्रंश झालेला नाही, ही ग्रेट न्यूज मिळाली.’
एक सांग, तू कसं काय सगळं लक्षात ठेवतोस? ‘अरे, अपने दोस्तके लिए, जब तक है जान, तुझे याद रखूंगा.’
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com