20 January 2018

News Flash

इतिहासात आज दिनांक.. ५ डिसेंबर

१९०१ कार्टूनपटांचे किमयागार वॉल्ट डिस्ने यांचा अमेरिकेतील शिकागोत जन्म. त्यांचे मानसपुत्र मिकी माउस आणि डोनाल्ड डक अजरामर आहेत. व्यावसायिक कलावंत म्हणून कार्यरत राहून पुढे

Updated: December 5, 2012 6:14 AM

१९०१ कार्टूनपटांचे किमयागार वॉल्ट डिस्ने यांचा अमेरिकेतील शिकागोत जन्म. त्यांचे मानसपुत्र मिकी माउस आणि डोनाल्ड डक अजरामर आहेत.  व्यावसायिक कलावंत म्हणून कार्यरत राहून पुढे स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर त्यांनी कार्टूनपटांना अफाट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या फिल्ममधील प्रत्येक प्राणी वेगळ्या स्वभावाचा असतो. एकही अनावश्यक पात्र त्यात नाही. ‘मिकी’ची निर्मिती करण्यापूर्वी त्यांनी ‘ओसवाल्ड’या लांब कानाच्या सशाची निर्मिती केली होती. हक्क राखून ठेवल्यामुळे या सशाची मालकी युनिव्‍‌र्हसल स्टुडिओकडे गेली. एकदा स्टुडिओत बसले असताना त्यांनी उंदीर इकडून तिकडून पळताना पाहिले आणि जगत्विख्यात अशा ‘मिकी माउस’चा शोध लागला. पहिला रंगीत आणि ध्वनिपट असणारा ‘फ्लॉवर्स अँड ट्रीज’ हा त्यांचा चित्रपट गाजला. सिंड्रेला, पीटर पॅन, अ‍ॅलिस इन वंडरलँड, स्लीपिंग ब्यूटी, ट्रेझर आयलंड, रॉबिनहूड, रॉब रॉय, द लिव्हिंग डेझर्ट, आफ्रिकन लायन हे सिनेमे प्रचंड गाजले. ‘जंगलबुक’ने तर अफाट लोकप्रियता मिळविली. अफाट स्वप्नं बघणं हाच या माणसाचा श्वास होता. लॉस एंजलिसच्या उपनगरातील डिस्ने लँड हेच त्यांचे खरे अजरामर स्मारक आहे. १९६६ मध्ये त्यांचे निधन झाले.
१९५०  क्रांतिकारक योगी अरविंद घोष यांनी पाँडेचरी येथे अखेरचा श्वास घेतला.
१९८५  महिलांसाठीचे महाराष्ट्रातील पहिले शासकीय संरक्षण गृह नागपूर येथे सुरू करण्यात आले.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

First Published on December 5, 2012 6:14 am

Web Title: navneet 36
  1. No Comments.