News Flash

मेंदूशी मैत्री : शोध

एखादी शारीरिक कमतरता असेल तर हा सिद्धांत नक्कीच उपयोगाचा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

कोणत्याही माणसाचा मेंदू हा अनेक गोष्टी, अनुभव, आवड-निवड यांचं मजेदार मिश्रण असते. ‘माणूस असा का?’ याचं उत्तर शोधण्यात डॉ. गार्डनर यांना बऱ्याच अंशी यश मिळालं आहे.   त्यांनी केलेल्या मेंदूशास्त्रीय संशोधनात असं दिसून आलं की न्युरॉन्सचं कार्य एकच असलं तरी न्युरॉन्सच्या जुळणीचा वेग व्यक्तिपरत्वे बदलतो. समान वयोगटात समान वेग असतो, असं घडत नाही. तसंच स्त्रियांचा वेग – पुरुषांमधला वेग असाही फरक नाही. प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकातल्या न्युरॉन्सचा वेग हा क्षेत्रपरत्वे बदलतो.

प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता या कमी-आधिक प्रमाणात असतात. आठ बुद्धिमत्तांपैकी किमान दोन ते तीन बुद्धिमत्ता प्राधान्याने असतात. ठळक असतात. तर काही कमी असतात.  त्यांच्याच शब्दात सांगायचं तर प्रत्येक जण या आठपैकी दोन किंवा तीन बुद्धिमत्तांचा ‘सेट’ घेऊन आलेला असतो. इथे ‘सेट’ असा शब्द त्यांनी वापरला आहे.  आपला सेट नक्की कोणता, हे मात्र आपल्याला सापडायला पाहिजे. कोणाचीही बुद्धिमत्ता एकसारखी नसते, हे या सिद्धांतातून स्पष्ट होतं.  उदाहरणार्थ, काहींच्या भाषेच्या क्षेत्रातल्या न्युरॉन्सच्या जुळणीचा वेग जास्त असतो, त्यामुळे ती माणसं भाषाविषयक कामकाजात रमतात. काहींच्या संगीतविषयक क्षेत्रात न्युरॉन्सच्या जुळणीचा वेग जास्त असतो, त्या माणसांचा तोच छंद असतो. काही जण गातात, काहींना वाद्यवादन आवडतं. अशा प्रकारे आपल्याला काय आवडतं ते त्या त्या क्षेत्रातल्या न्युरॉन्सच्या जुळणीच्या वेगावर अवलंबून असतं. आपल्या मुलांमध्ये यापैकी कोणती बुद्धिमत्ता आहे, हे आपण सततच्या निरीक्षणातून शोधू शकतो. त्यासाठी आधी स्वत:च्या बुद्धिमत्ताही शोधल्या पाहिजेत. स्वत:च्या आवडींचं आणि नावडींचं विश्लेषण केलं पाहिजे. तर आपल्या प्राधान्य बुद्धिमत्ता आपल्याला समजतील.  एखादी शारीरिक कमतरता असेल तर हा सिद्धांत नक्कीच उपयोगाचा आहे. तसंच अध्ययन अक्षम, गतिमंद असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच चांगला आहे. हा सिद्धांत अभ्यासाचा विचार करतोच, पण त्यापलीकडे जाऊन आपल्या सर्वच क्षमतांचा व्यापक विचार करतो. त्यामुळे सर्वानी  हा सिद्धांत वाचला पाहिजे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:33 am

Web Title: neurons in brain sense of the brain nervous system brain
Next Stories
1 हॉटेल ‘अनंताश्रय’!
2 मेंदूशी मैत्री : न्युरॉन्सचा वेग
3 कुतूहल : सात पुलांचे कोडे
Just Now!
X