नायलॉनच्या तंतूचा विशेष गुणधर्म म्हणजे त्याची लंबन क्षमता कापसापेक्षा (८%) तीन पटीने (२५% ते ३०%) अधिक असते. या तंतूंची स्थितिस्थापकता व लवचिकता अतिशय चांगली असते. त्यामुळे नायलॉन तंतूंपासून तयार केलेले कपडे सहज चुरगळत नाहीत आणि या कपडय़ांना कायम टिकणाऱ्या घडीची इस्त्री करता येते. ह्य़ा तंतूंना उष्णता दिली असता सुमारे ६५अं.से. तापमानाच्या पुढे त्यांची स्थितिस्थापकता नाहीशी होते आणि त्या परिस्थितीत त्यांना जो आकार दिला जातो तो तंतू थंड केल्यावर कायमपणे टिकतो. याला थर्मोप्लास्टीसिटी असे म्हणतात. या गुणधर्माचा वापर करून विविध पोताचे धागे तयार केले जातात. सर्वसामान्यपणे नायलॉनची जलशोषकक्षमता (४%) कापसापेक्षा (८%) कमी असते, पण वरील गुणधर्माचा उपयोग करून जलशोषक क्षमता वाढेल, असा पोत नायलॉनच्या धाग्यांना देता येतो.
नायलॉनला उष्णता दिली असता तो २२०अं.से. २३०अं.से. तापमानाला मऊ व चिकट होत जातो आणि २५०अं.से तापमानाला त्याचे विघटन सुरू होते व नंतर तो २६३ अं.से. तापमानास वितळतो. या गुणधर्मामुळे नायलॉनच्या कपडय़ांना इस्त्री करताना इस्त्रीचे तापमान नियंत्रित ठेवावे (१५०अं.से.पेक्षा कमी) लागते अन्यथा कपडे खराब होण्याची, आकसण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते. हे तंतू कुठल्याही जिवाणू किंवा कीटक यांच्या आक्रमणापासून सुरक्षित असतात आणि त्यामुळे नायलॉनचे कपडे नसíगक धाग्यापासून बनविलेल्या कपडय़ांपेक्षा अधिक टिकतात. नायलॉनचे कपडे जर दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिले तर मात्र त्यांची ताकद काही प्रमाणात कमी होते.
नायलॉन तंतूंच्या या गुणधर्मामुळे या तंतूचा उपयोग अंगावर घालावायची प्रावरणे तसेच घरगुती वापराच्या आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या कापडाची निर्मिती करण्यासाठी होतो. अंगावर घालवयाचा शर्ट, पँट, स्त्रियांचे कपडे, साडय़ा या सर्व प्रकारांसाठी नायलॉन हे अतिशय लोकप्रिय आहे. विशेषकरून नीटेड आणि होजियरी उद्योगामध्ये बनविल्या जाणाऱ्या अंतर्वस्त्रे, टीशर्ट, अ‍ॅथलेटिक सूट्स यांसारख्या कपडय़ांसाठी नायलॉन तंतू प्रसिद्ध आहेत.
घरगुती वापरामध्ये पडदे, सोफासेटची आवरणे, टेबलक्लॉथ यासाठी सुद्धा नायलॉन तंतूंचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो.
चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पतियाळाचे भारतीय क्रिकेटमधील योगदान
पतियाळा संस्थान आणि विविध खेळ, शारीरिक शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहे. विशेषत: भारतात क्रिकेटचा खेळ रुजविण्यात आणि लोकप्रिय करण्यात पतियाळा महाराजा भूिपदरसिंगांचा महत्त्वाचा वाटा आहे. शालेय जीवनापासून क्रिकेटचा छंद जोपासणाऱ्या महाराजांनी पुढे पतियाळा इलेव्हन हा आपला संघ बनविला होता. त्यांच्या प्रेरणेने पतियाळामध्ये आंतरसंस्थान सामने भरविले जात. महाराजांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली. १९३३ साली लॉर्ड वििलग्डन हे भारताच्या व्हाइसरॉयपदी नियुक्त झाले. त्यांनी संस्थानांचा क्रिकेट संघ तयार करून भूिपदर महाराजांच्या सल्ल्याने िहदुस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड स्थापन केले. या बोर्डाच्या सर्व कारभारात अर्थात महाराजांचे वर्चस्व होते. पुढे भूिपदरसिंगांना प्रसिद्ध एम.सी.सी.चेही सदस्यत्व मिळाले. भारतातील सुरुवातीच्या क्रिकेट ग्राऊंडपकी पतियाळातील एक होते. पतियाळातील अनेकांनी तिथे क्रिकेटचा सराव करून पुढे ते व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून विख्यात झाले.
‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ स्थापन करून भूिपदरसिंग यांनी मुंबईचे ब्रेबॉर्न स्टेडियम उभारण्यासाठी खर्चाचा मोठा वाटा उचलला. १९३४ साली बीसीसीआयच्या एका बैठकीत महाराजांनी नवानगर ऊर्फ जामनगरचे महाराजा रणजितसिंग यांच्या नावाने क्रिकेटचे सामने भरविण्याचा प्रस्ताव ठेवला. १९३४-३५ पासून ‘रणजी ट्रॉफी’ या नावाने प्रथम खेळले गेलेले हे सामने आजही प्रतिष्ठेचे म्हणून खेळले जातात. भूिपदरसिंगांनी स्वत:चा पतियाळा इलेव्हन हा क्रिकेटचा आणि पतियाळा टायगर्स हा पोलोचा असे दोन क्रीडासंघ स्थापन केले होते.
१९११ साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे कप्तानपद भूिपदरसिंगांनी भूषविले. १९१५ ते १९३७ या काळात ते एकूण २७ प्रथम श्रेणीचे क्रिकेटचे सामने खेळले.पतियाळा राज्याचे सातवे शासक महाराजा राजिंदरसिंग हेसुद्धा क्रिकेट खेळत. त्यांनी १८९३ साली चल येथे क्रिकेट ग्राऊंड तयार केले. ते जगातील सर्वाधिक उंच ठिकाणी असलेले क्रिकेट मैदान आहे.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स