नायलॉन ६ व नायलॉन ६,६ तंतू दोन्ही पॉलीअमाइड बहुवारिकापासूनच बनविले जातात. परंतु दोन्ही तंतूच्या उत्पादन प्रक्रियेत काही मूलभूत फरक आहेत. नायलॉन ६,६ हा तंतू हेक्सॅमिथिलीन डायआमाइन अ‍ॅडिपिक आम्ल या रसायनांच्या रासायनिक प्रक्रियेतून मिळणाऱ्या संयुगाच्या बहुवारिकीकरणाने बनविला जातो. तर नायलॉन ६ तंतू तयार करण्यासाठी कोळसा हा मुख्य कच्चा माल आहे. कोळशावर अनेक प्रक्रिया करून प्रथम सायक्लोहेक्सेन ऑक्साइम हे संयुग बनविले जाते. या सायक्लोहेक्सेन ऑक्साइम संयुगाची गंधकाम्लाबरोबर रासायनिक प्रक्रिया करून कॅप्रोलॅक्टम हे संयुग तयार केले जाते. कॅप्रोलॅक्टम रेणूच्या एका टोकाला अमाईन (ठऌ2) समूह तर दुसऱ्या टोकाला आम्ल (उडडऌ) समूह असतो त्यामुळे एकाच संयुगाचे रेणू एकमेकांस जोडून बहुवारिक बनविणे शक्य होते. कॅप्रोलॅक्टमचे बहुवरिकीकरण करून नायलॉनचा वितळलेला द्राव तयार होतो आणि या द्रावाचे वितळ कताई पद्धतीने नायलॉनचे तंतू बनविले जातात. कॅप्रोलॅक्टमच्या एका रेणूमध्ये ६ कार्बनचे अणू असल्यामुळे नायलॉनच्या या प्रकारास नायलॉन ६ असे म्हटले जाते.
नायलॉन ६चे गुणधर्म जवळजवळ नायलॉन ६,६ सारखेच असतात. परंतु नायलॉन ६ची ताकद नायलॉन ६,६ पेक्षा काही अंशी कमी असते. उष्णतेस नायलॉन ६ तंतू नायलॉन ६,६ तंतूपेक्षा कमी टिकाव धरतात. नायलॉन ६ तंतूची स्थितिस्थापकता ४७ अंश सेल्सियस तापमानाच्या वर नाहीशी होते आणि हे तंतू २१६ अं.सें. तापमानास विरघळतात. त्यामुळे ज्या उपयोगामध्ये अधिक उष्णतेशी संबंध येत नाही अशा वस्तू तयार करण्यासाठी नायलॉन ६चा वापर केला जातो. नायलॉन ६,६ प्रमाणेच नायलॉन ६ तंतू अंगावर नेसावयाचे कपडे, विविध प्रकारच्या जाळ्या, दोरखंड, दोरा आणि तयार कपडे यासाठी मोठय़ा प्रमाणावर केला जातो. टायर, यंत्राचे भाग व इतर औद्योगिक वापरासाठी यासाठी नायलॉन ६,६ चा वापर होतो.
याशिवाय नायलॉन ६चा वापर जास्त करून दात घासावयाचे ब्रश तयार करण्यासाठी, ऑपरेशननंतर टाके घालण्यासाठी वापरावयाचा दोरा (ज्याला इंग्रजीमध्ये सुचर थ्रेड म्हणतात) बनविण्यासाठी केला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पतियाळाच्या महाराजांच्या पत्राचा प्रताप..
राजपूत, मोगल, पंजाबी या तीन संस्कृतींचे अप्रतिम मिश्रण असलेल्या पतियाळवी संस्कृतीवर येथील संस्थानिक, विशेषत महाराजा भुिपदरसिंग यांच्या जीवनशैलीचा विशेष प्रभाव या पडलेला दिसतो. त्यांच्याविषयींचे किस्से, अख्यायिका प्रसिद्ध आहेत. क्रिकेटच्या जागतिक नकाशावर भारताचे नाव आणणारे महाराज भुिपदरसिंगांचे क्रिकेटवेड सर्वश्रुत आहेच. या वेडापायी भारताच्या गव्हर्नर जनरलच्या नोकरीवर कसे बेतले याचाही एक किस्सा आहे. नव्याने गव्‍‌र्हनर जनरल पदावर नियुक्त झालेले लॉर्ड वििलग्डन भारतात आले, तेही क्रिकेटप्रेमी. त्यांनी महाराजांच्या सल्ल्याने िहदुस्थान क्रिकेट कंट्रोल बोर्ड स्थापन केले. ग्रँट ग्रोव्हन या विलिंग्डन साहेबांच्या मर्जीतल्या माणसाला या बोर्डाचे अध्यक्षपद दिले. या बोर्डावर विलिंग्डन व महाराजा भुिपदरसिंग या दोघांनाही वर्चस्व गाजविण्याची इच्छा होती. परंतु यात महाराजांचे पारडे जड होऊन साहेबाचे काही चालेना. या गोष्टीमुळे विलिंग्डन हे महाराजांचा मत्सर करू लागले. त्यात भर म्हणून महाराजांना एम.सी.सी.चे सदस्यत्व मिळाले. १९३४ साली जॉर्डीन याच्या नेतृत्वाखाली एम.सी.सी.चा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला. महाराजांनी बरेच प्रयत्न करून कप्तान जॉर्डीनच्या संघात प्रवेश केला. विलिंग्डनचा पारा आणखीच चढला. गोष्टी इतक्या थराला पोहोचल्या की महाराजांवर खोटा खुनाचा आरोप ठेवून चौकशीसाठी त्याने कमिशन नेमले. असत्य अहवाल तयार करून लंडनला राजेसाहेबांकडे पाठविण्याचे साहेबाने ठरविले. याची कुणकुण महाराजांना लागताच त्यांनी त्या अहवालाची प्रत मिळवली. पतियाळा संस्थानचे एक मंत्री के. एम. पणिक्कर यांच्या देखरेखीखाली महाराजांनी पंचम जॉर्जसाठी पत्र तयार केले. विलिंग्डनने आपल्याकडे मागितलेली लाच व लेडी विलिंग्डनने मागितलेले जडजवाहर आपण दिले नसल्याने आपल्यावर हे खोटेच बालंट उभे केले आहे असे या पत्रात नमूद करून पणिक्करांसोबत ते पत्र लंडनला धाडले. विलिंग्डन विरुद्ध आधीही बऱ्याच तक्रारी आल्याने, या पत्रानंतर विलिंग्डनची भारतातील कारकीर्द तातडीने संपुष्टात आली!
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com