‘ऑक्सिजन व्हॅलीला भेट द्या’ अशा जाहिराती आजकाल वाचनात येतात. तेव्हा वाटलं जर परग्रहावर माणसं असती तर त्यांनी जाहिरात केली असती ‘ऑक्सिजन ग्रहाला भेट द्या’ कारण सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये आपली पृथ्वी ऑक्सिजन मूलद्रव्यानं समृद्ध असा ग्रह आहे. बुध ग्रहावर ऑक्सिजन नाही. मंगळावर पाणी या संयुगाच्या रूपात ऑक्सिजन आहे, पण मुक्त अवस्थेत ऑक्सिजनचे प्रमाण ०.१ टक्के एवढेच आहे. गुरू आणि नेपच्यून हे वायुरूप ग्रह आहेत पण या ग्रहांवर ऑक्सिजन नाही. विश्वात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे,  पृथ्वीवर असणाऱ्या वायूंमध्ये दुसरा क्रमांकाचे आणि आवर्तसारणीत आठव्या क्रमांकाचे असे हे ऑक्सिजन मूलद्रव्य. पृथ्वीच्या वातावरणातील २०.८ टक्के भाग ऑक्सिजन या मूलद्रव्यानं व्यापलेला आहे. या मूलद्रव्याचा पृथ्वीवर जलावरण, जीवावरण आणि समुद्रसपाटीपासून साधारण वीस किलोमीटर उंचीपर्यंतच्या वातावरणात सर्व ठिकाणी मुक्त वावर आहे. पृथ्वीच्या कवचामध्ये ऑक्सिजन खनिजाच्या स्वरूपात आहे.

पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे संयुग आहे. वातावरणातील ऑक्सिजन तसेच जलवनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून मिळणारा ऑक्सिजन पाण्यात विरघळतो. पाण्यात ऑक्सिजन विरघळण्याचे प्रमाण तापमान, दाब आणि क्षारता यावर अवलंबून असते. संयुग स्वरूपात नसलेला हा ऑक्सिजन पाण्यातील सजीवांसाठी उपयुक्त असतो. पाण्यातील सजीवांसाठी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असावे लागते. हे प्रमाण कमी झाले तर जलचर आणि जलवनस्पतींना ते अपायकारक असते.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

तपांबर हा वातावरणातील सर्वात खालचा थर. या थरापासून जसजसं वर जावं तसतसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. समुद्रसपाटीवर ऑक्सिजनचं प्रमाण २१ टक्के असतं. पुढे पाच किलोमीटर उंच गेल्यावर ऑक्सिजनचं प्रमाण ५० टक्के कमी होतं. जगातील सर्वात उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर (८.८४८ किलोमीटर) ऑक्सिजनचं प्रमाण अजूनच कमी होतं. वातावरणातील स्थितांबर या थरात ऑक्सिजनच्या रूपात थोडासा बदल होतो. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे ऑक्सिजनरेणूमधील दोन अणू वेगळे होतात आणि त्यातील एक अणू ऑक्सिजनच्याच एका रेणूशी संयोग पावतो. त्याचा परिणाम म्हणजे ऑक्सिजनचे तीन अणू असलेला ओझोन हा वायू होतो. परिणामी ओझोन वायूचा थर तयार होतो.

– सुचेता भिडे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org