आपल्या आजूबाजूला जी हिरवळ दिसते ती सर्व या गटातील वनस्पतींमुळे आहे. आवृतबीजी वनस्पती आजपर्यंतच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील सर्वोत्तम निर्मिती आहे. त्यांच्यात उच्च प्रतीच्या कार्याचे विभाजन झालेले आढळते. उदा. मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे. या वनस्पतींच्या आकारात आणि आधिवासात प्रचंड वैविध्य आहे. अगदी लहानात लहान वोल्फिया जे टाचणीच्या डोक्याच्या आकाराचे असून पाण्यावर तरंगत वाढते. मोठाल्या वृक्षांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास एक मोठा समूह आपल्या डोळ्यासमोर येतो, वड, पिंपळ, आंबा, चिंच, नीलगिरी इत्यादी.
आवृतबीजी वनस्पतींचे दोन भागांत विभाजन केले जाते. एकबीजपत्री उदा. गवत, बांबू, नारळ इत्यादी आणि द्विबीजपत्री – वड, पिंपळ
कांद्याला किंवा गवताला असणारी मुळे आणि मेथीच्या भाजीची मुळे आपण नेहमीच बघतो. यांचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की या दोन्ही मुळांत फरक असतो. कांदा किंवा गवत या वनस्पतींची मुळे तंतुमय प्रकारची असतात अशी मुळे एकबीजपत्री वनस्पतींची ओळख आहे. त्याचप्रमाणे मेथीची मुळे सोटमूळ प्रकारची असतात. अशी मुळे द्विबीजपत्री वनस्पतींना असतात. एकबीजपत्री वनस्पतींच्या पानांच्या शिरा एकमेकांना समांतर असतात.
द्विबीजपत्री वनस्पतींच्या पानावरील शिरांची जाळी झालेली असते. एकबीजपत्री वनस्पतींच्या आणि द्विबीजपत्री वनस्पतींच्या फुलांमध्येसुद्धा फरक असतो. एकबीजपत्री उदा लिली, निशिगंध. द्बिबीजपत्री जास्वंद आणि सदाफुलीची फुलं. आवृतबीजी वनस्पती विविध अधिवासांत वाढतात. काही पाण्यावर तरंगणाऱ्या उदा. लेम्ना, पिस्टीया ऑयकारनीया. काही वृक्षांच्या खोडावर आणि फांद्यांवर वाढतात.
वृक्षांवर आढळणाऱ्या पण वृक्षावर अवलंबून नसणारी वनस्पती. आíकड (आधिपादप) ही आहे. बांडगूळ ही परजीवी वनस्पती आहे.
खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती सर्वसाधारण मॅन्ग्रुव्हज (कांदळ) किंवा तिवर या नावाने ओळखल्या जातात. पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली वाढणाऱ्या सामान्यत: नाजूक असतात उदा. – हॅड्रीला, वॅलिइसनेरीया, ओटेलिया, इत्यादी आणि यांचा उपयोग अक्वेरियमसाठी केला जातो. या संपूर्ण वर्गीकरणाच्या आधारे एक गोष्ट लक्षात येते की, जसे वृक्षच फक्त वनस्पती नसून वनस्पती विश्वाचा विस्तार मोठा असून, अभ्यासासाठी ते एक मोठे आव्हानात्मक क्षेत्र आहे.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

नगराख्यान – अद्भुत टॉवर ब्रिज
टॉवर ब्रिज हा लंडनकरांचा दुसरा प्रतिष्ठेचा पूल सन १८८६ ते १८९४ अशा आठ वर्षांत बांधून पूर्ण झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी बॉम्बफेक करून हा पूल पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून हा सुखरूप बचावला. त्या आधीच्या ‘लंडन ब्रिज’वरची रहदारी एवढी वाढली की टेम्स नदी पार करण्यासाठी दुसरा पूल बांधणे आवश्यक झाले. या टॉवर ब्रिजच्या नियोजित जागे अलीकडे नदीवर बोटींचे धक्के होते. त्यामुळे मोठय़ा बोटी पुलाखालून जाण्यासाठी पूल उघडण्याचे विशिष्ट तंत्रज्ञान वापरले गेले. बोट पुलाखालून जाण्यासाठी वरची रहदारी बंद करून दोन झडपा उघडल्या जातात. त्याखालून बोट गेल्यावर झडपा बंद होऊन वरील रहदारी पूर्ववत चालू राहते. झडपा उघडण्याची यंत्रणा पूर्वी वाफेवर काम करीत असे, ती सध्या विजेवर चालते. सध्या या पुलावरून जाणारी वाहने आणि पादचाऱ्यांची संख्या रोजची ४० हजार आहे. या टॉवर ब्रिजच्या बांधकामासाठी ११८४ हजार पौंड खर्च आला. मध्यावर असलेले दोन टॉवर आणि पोलादी केबलच्या आधारावर हा ब्रिज उभा आहे. झडपा उघडल्यावर पादचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी दोन्ही टॉवरना जोडलेल्या वरच्या बाजूला पदपथ तयार केला गेला, पण गमतीची बाब म्हणजे त्या वरच्या पदपथाचा वापर पादचाऱ्यांपेक्षा पाकीटमार, वेश्यांचे दलाल व आत्महत्या करणाऱ्यांनीच अधिक केला. त्यामुळे हा पदपथ बंद करून आता तिथे प्रदर्शने भरविली जातात.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!