रसायनशास्त्रातल्या प्रत्येक मूलद्रव्याला जसे स्वत:चे असे वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म आहेत; तसाच त्यांना वैशिष्टय़पूर्ण असा इतिहास आहे. प्रत्येक मूलद्रव्याच्या काही खास अशा कहाण्या आहेत. अणुक्रमांक ८४ असलेलं पोलोनिअम हे मूलद्रव्यसुद्धा याला अपवाद नाही.

पोलोनिअम या मूलद्रव्याशी कायमच्या जोडल्या गेलेल्या काही व्यक्तींपकी एक व्यक्ती आहे, अलेक्झँडर लिटविनेन्को. रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संस्थेत लिटविनेन्को अधिकारी म्हणून काम करत होता. पण रशियाच्या गुप्तहेर संघटनेची काम करण्याची पद्धत आणि यासंदर्भातलं रशियन सरकारचं धोरण न पटल्याने त्याने याचा विरोध करायला सुरुवात केली. पुढे तो रशियाच्या विरुद्ध हेरगिरी करायला लागला. हे जेव्हा उघडकीला येण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा त्याने रशियातून पळ काढला आणि इंग्लंडच्या आश्रयाला गेला.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

१ नोव्हेंबर २००६ या दिवशी इंग्लंडमध्ये असताना लिटविनेन्कोने एका जपानी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि अचानक त्याची तब्येत बिघडली. काही तासांमध्येच लिटविनेन्कोच्या शरीरात विचित्र बदल दिसायला लागले. काही तासांच्या अवधीत लिटविनेन्कोचं वय काही वर्षांनी वाढत जात असल्याचं वाटावं, असे ते बदल होते. कोणत्याही वैद्यकीय उपचाराला लिटविनेन्कोचं शरीर दाद देत नव्हतं. शेवटी २३ नोव्हेंबर २००६ या दिवशी जर्जर शरीर झालेल्या लिटविनेन्कोचा मृत्यू झाला. अशा गूढ प्रकारे झालेल्या मृत्यूची इंग्लंडमध्ये चौकशी झाली. या चौकशीदरम्यान लिटविनेन्कोला अन्नपदार्थातून विष देऊन मारल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. लिटविनेन्कोच्या शरीरात पोलोनिअमचे अंश सापडले.

या घटनेच्या बरोबर दोन र्वष आधी म्हणजे नोव्हेंबर २००४ मध्ये पॅलॅस्टाइन मुक्ती  संघटनेचे नेते यासर अराफत यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांचाही मृत्यू विषप्रयोगामुळे झाला होता, हे तपासाअंती सिद्ध झालं. यासर अराफत यांचं शव कबरीतून उकरून काढून फ्रान्स, स्वित्झर्लँड आणि रशिया या तीन ठिकाणी त्यांच्या हाडांची तपासणी स्वतंत्रपणे करण्यात आली. अराफत यांच्याही शरीरात पोलोनिअम-२१० चे अंश सापडले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नागासाकी इथे टाकल्या गेलेल्या अणुबॉम्बमध्ये प्रेरक म्हणून पोलोनिअम-२१० वापरण्यात आलं होतं. पण त्यानंतर तब्बल साठ वर्षांनी पोलोनिअमचा नवीनच गुणधर्म जगासमोर आला होता.

–  हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org