आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेकदा ‘दाब’ हा शब्द वापरत असतो. दाब म्हणजे एक एकक क्षेत्रफळावर कार्यरत असलेले बल. दाबमापन ही आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट आहे.

रक्तदाब कमी-जास्त होऊ लागला की माणसे चिंताक्रांत होतात. सामान्य रक्तदाब १२०/८० असा मानला जातो. त्याचे एकक सामान्यपणे सांगितले जात नाही. हे दाबाचे आकडे सांगताना ते पाऱ्याच्या स्तंभाने दिलेल्या दाबानुसार सांगितले जातात. ते mm of Hg  किंवा mmHg   या पद्धतीने लिहिले जाते. १२०

Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

mm Hg   याचा अर्थ १२० मिलिमीटर उंची असलेल्या पाऱ्याच्या स्तंभाने दिलेला दाब.

आपल्या वाहनाच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवेचा दाब असेल तर ते जोरात पळू शकते. हा दाब एका ठरावीक मर्यादेपेक्षा कमी असला, तर वाहन जोरात चालवता येत नाही. त्याचे नुकसान होण्याचीही शक्यता असते. याउलट तो मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर टायर फुटण्याची शक्यता असते.

आपल्या वाहनाच्या चाकात हवा भरताना आपण हवा भरणाऱ्या माणसाला ३२ ठेवा किंवा ३६ ठेवा, असे नुसते आकडय़ात सांगतो. पण आपल्याला म्हणायचे असते; ३२  psi   म्हणजे ३२ पौंड प्रति चौ. इंच). हाच दाब आपल्याला ‘किलोग्रॅम प्रति चौसेमी’ हे एकक वापरूनही सांगता येतो. पेट्रोलपंपावर हवा भरण्याची जी यंत्रे असतात त्यात या दोन्ही एककांचा उल्लेख असतो. आपल्या देशाने दशमान पद्धत अधिकृतपणे स्वीकारलेली असली; तरी व्यवहारात अनेक ठिकाणी आपण फूट, इंच आणि पौंड या एककांचा वापर करत असतो.

वातावरणाचा दाब समुद्रसपाटीला सर्वात जास्त असतो आणि आपण जसजसे उंचीवर जाऊ तसतसा तो कमी होत जातो. वातावरणीय दाब विविध एककांमध्ये सांगितला जातो. उदा. समुद्र-सपाटीवर

1 Atmosphere (वातावरणीय दाब) असतो.

1 Atmosphere = 760 mm of Hg

= 101325 pascal (पास्कल)

= 760 Torr (टॉर)

= 1.011325 Bar (बार)

ही एकके लिहिताना त्यांची लघुरूपे अनुक्रमे atm, mmHg, pa, Torr, bar अशी आहेत.

एस. आय. पद्धतीमध्ये दाब १ न्यूटन प्रति चौरस मीटर असा मोजतात. त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्राज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल’ असेही म्हणतात.

डॉ. गिरीश पिंपळे ,  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

 

वाग्देवीचे वरदवंत : आधुनिक कवितायुगाचे  प्रतिनिधी

फिराक गोरखपुरी हा विलक्षण बुद्धिमत्ता आणि उत्तुंग प्रतिभेचा  कवी एकाकीपणाची सोबत घेऊन पुढे जात राहिला. कवितेचं बोट धरून चालत राहिला. पण हे एकाकीपणाचे पडसाद त्यांच्या कवितेतही उमटत राहिले. पण या एकाकीपणातूनही त्यांची बुद्धी धारदार झाली. विचारशक्ती तीक्ष्ण झाली. उर्दू कवितेतील प्रेमभावनेपेक्षा वेगळी संवेदनशील प्रेमकविता फिराक यांनी लिहिली. त्यांच्या प्रेमगीतांचीही एक खास जात आहे. प्रेयसीबद्दल उर्दू काव्यात आढळणाऱ्या ‘शिकायती’चे प्रदर्शन त्यांच्या या प्रेमगीतात नसते. तर दिसते ती जीवन जगण्याची नवी प्रेरणा. उदा.-

‘‘मुद्दते गुजरी तेरी याद भी, आयी ना हमें

और हम भूल गये हो तुझे, ऐसा भी नहीं

वौ शौख किसी सुरत, अपना भी नहीं होता

और ये भी नहीं मुमकीन समझे उसे बेगाना’’-

फिराक गोरखपुरी यांनी उर्दू शायरीला एक नवाच प्रेमी आणि नवी प्रेमिकाही दिलेली आहे. त्यांच्या प्रेमात एक गांभीर्य आहे. जे उर्दू शायरीत पहिल्यांदाच जाणवलं. त्यांच्या प्रेमी-प्रेमिकांकडे हृदय तर आहेच, पण बुद्धीदेखील आहे. कित्येक मानसिक अनुभूतींपैकी प्रेम ही एक अनुभूती आहे. त्यांचं प्रेम केवळ शारीरिक भावनेपुरते मर्यादित नाही. ही एक पवित्र पूजा आहे.

फिराक यांच्या एका इश्किया शायरीत ते म्हणतात-

‘‘इश्क  में सच ही का रोना है

झुटे नहीं तुम, झुटे नहीं हम।.

..तुम मुखातिब भी हो, करीब भी हो

तुमको देखे कि तुमसे बात करें।’’.

त्यांच्या गझल लेखनात एक लय आहे. त्यामुळे त्यांच्या गझला मोठय़ा प्रमाणात गायल्या गेल्या. उदा.-

‘‘रात भी नींद भी कहानी भी

हाय क्या चीज है जवानी भी

दिल को अपने भी गम थे दुनिया में

कुछ बलायें भी आसमानी भी.।’’

फिराक स्वत: ‘संस्कारवादी’ (Impressionistic) समीक्षक आहेत. याचा परिणाम त्यांच्या कविता लेखनावरही झालेला दिसतो. स्वत:च्या मनाला जे आणि जसे स्पर्शून गेले- ते आणि तसेच व्यक्त करण्याकडे ‘फिराक’ यांचा अधिक कल होता.  फिराक यांनी २०-२२ कडव्यांचे गझल लिहिले आहेत. रचनाप्रभुत्वही सिद्ध केले आहे. त्यामुळेच ‘फिराक’ हे उर्दू काव्यात आधुनिक कवितायुगाचे प्रतिनिधी आहेत.

 मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com