अणुक्रमांक ९५-१०६ मधील एक समान दुवा म्हणजे अल्बर्ट घिओर्सो. या अमेरिकन अणुशास्त्रज्ञाचा जन्म १५ जुल १९१५ साली कॅलिफोर्निया शहरात झाला. १९३७  मध्ये युनिव्हर्सटिी ऑफ कॅलिफोíनया, बर्कले येथून त्यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळवली.

पदवी संपादन केल्यावर रेजिनेल्ड टिबेट्स (Reginald Tibbets) या शासनाला किरणोत्सार सूचक यंत्र पुरवणाऱ्या कंपनीत ते कार्यरत होते. रेडिएशन डिटेक्टर (प्रारण संसूचक) व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यात अल्बर्ट घिओर्सो पारंगत होते. त्यांच्या याच कौशल्याने ते

megha engineering
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…
stock markets rise for 3rd session sensex rises 190 points nifty settles at 22096
सलग तिसऱ्या सत्रात वाढ; ‘सेन्सेक्स’ची १९० अंशांची कमाई

बर्कलेतील शास्त्रज्ञांच्या विशेष करून ग्लेन सीबोर्ग ह्य़ांच्या संपर्कात आले. अल्बर्ट घिओर्सो यांचा संशोधन कार्यकाळ १९४० च्या पूर्वार्धापासून ते १९९० च्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे चार दशके होता.

१९४१ साली जेव्हा अमेरिकेने महायुद्धात उतरायचा निर्णय घेतला तेव्हा सीबोर्ग मॅनहॅटन  प्रकल्पाच्या कामासाठी शिकागोत होते, तिथे त्यांनी घिओर्सो यांना बोलावून घेतले. पुढील चार वर्षे घिओर्सो यांनी युद्धासाठी लागणाऱ्या केंद्रकीय विघटनाशी संलग्न अशा अतिशय संवेदनशील किरणोत्सार सूचक उपकरणांची निर्मिती केली, ज्यात त्यांचा सर्वात महत्त्वाचा शोध होता ‘४८ चॅनल पल्स हाइट अ‍ॅनालायझर’. हे उपकरण ऊर्जेवरून किरणोत्साराचा उगम शोधून काढू शकत होते. त्याच सुमारास त्यांनी दोन मूलद्रव्यांचा (अणुक्रमांक ९५ आणि ९६) शोध सीबोर्ग ह्य़ांच्या बरोबर लावला.

युद्ध संपल्यावर अल्बर्ट घिओर्सो, ग्लेन सीबोर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन मूलद्रव्ये शोधण्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देईना. १९५० च्या दशकाच्या मध्यावर असे जाणवले की आवर्त सारणीतील उर्वरित मूलद्रव्यांचा शोध घ्यायचा असेल तर एका नवीन त्वरणित्राची (accelerator) गरज आहे. यासाठी अल्बर्ट घिओर्सो यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बर्कले हेवी आयन लिनिअर अ‍ॅक्सलरेटर (HILAC)’ बनवला गेला. या यंत्राचा उपयोग करून संख्येने अगदी कमी निर्माण झालेल्या अणूंच्या मदतीने अणुक्रमांक १०२ ते १०६ ही मूलद्रव्ये शोधली गेली. म्हणजे अणुक्रमांक ९५ ते १०६, अशा एकूण १२ मूलद्रव्यांच्या शोधामध्ये अल्बर्ट घिओर्सो यांचा सहभाग आहे, जो एक विश्वविक्रम आहे आणि गिनिज बुकामध्ये त्याची नोंद आहे. अशा या गुणी शास्त्रज्ञाचा मृत्यू वयाच्या सुमारे ९५व्या वर्षी, २६ डिसेंबर २०१० साली बर्कले, कॅलिफोíनया येथे झाला.

–  डॉ. तनुजा प्र. परुळेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org