रिटेल विक्री क्षेत्रात उपलब्ध माल मर्यादित जागेत सुयोग्य पद्धतीने मांडून त्याच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा कमवावा असं उद्दिष्ट असतं. या क्षेत्रातल्या विविध अनिश्चिततांचा विचार करून व्यवसाय फायदेशीर करताना पुढची काही मोजमापनं महत्त्वाची ठरतात.

१. दुकानात येणारे ग्राहक (footfalls) – यासाठी बऱ्याचदा दरवाजावर बसवलेल्या इन्फ्रारेड किरणांचा वापर केला जातो. किरण खंडित झाले की एक व्यक्ती बाहेरून आत किंवा आतून बाहेर गेली, असं समजून एकूण किती लोकांनी दुकानाला भेट दिली हे मोजता येतं.

ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी जाहिरातींचा किंवा सेलचा धडाका लावला जातो.

२. प्रत्यक्ष खरेदी करणारे ग्राहक (conversion ratio) – दुकानात येणारे किती? आणि दुकानात येणाऱ्यांपकी किती जणांनी प्रत्यक्षात खरेदी केली?  हे गुणोत्तर जितकं जास्त, तितका तो व्यवसाय यशस्वी असं म्हणता येईल.

३. परत येणारे ग्राहक (returning customers) – जर ग्राहकांना दुकानातील वस्तू आवडल्या आणि खरेदीचा अनुभव सुखकर वाटला; तर ते परत येतात. अशा निष्ठावान ग्राहकांमुळे व्यवसायाला स्थर्य मिळू शकतं. बऱ्याच दुकानांमध्ये एक लॉयल्टी कार्ड आणि त्यावर पॉइंट्स दिले जातात. त्यामागे ग्राहकांनी पुन्हा येऊन खरेदी करावी हा हेतू असतो.

४. प्रत्येक ग्राहकामागील खर्च (cost of acquiring a customer) – दुकान मांडताना जागेचं भाडं, इतर नियमित बिलं, विक्रेत्यांचं वेतन, जाहिरात असे जे खर्च होतात त्याला एकूण खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येने भागल्यावर हे गुणोत्तर मिळतं. समजा असा खर्च १०० रुपये असेल, तेव्हा प्रत्येक ग्राहकाने सरासरी १०० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली तरच व्यवसाय नफ्यात जाईल.

५. प्रत्येक चौरस फुटांसाठी विक्री (sales per square foot) एकूण विक्रीला दुकानाच्या क्षेत्रफळाने भागल्यावर ही संख्या मिळू शकते. जागेचा परिणामकारक वापर होतो आहे की नाही; याचा अंदाज या संख्येवरून काढता येतो. चॉकोलेट-बिस्किट्स विकणाऱ्याने दुकानात माल दाटीवाटीने भरलेला असतो; उलट किमती वस्तू विकणाऱ्या दुकानांमध्ये प्रशस्त मोकळी जागा का दिसते. याचं उत्तर इथे दडलेलं आहे.

–  मेघश्री दळवी

 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मास्ती वेंकटेश अय्यंगार श्रीनिवास

भारतीय ज्ञानपीठाचा १९८३ चा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. मास्ती वेंकटेश अय्यंगार ‘श्रीनिवास’ यांना १९७८ च्या पूर्वीच्या भारतीय सृजनात्मक साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी, त्यांच्या ‘चिक्कवीर राजेंद्र’ या (कन्नड) कादंबरीच्या विशेष उल्लेखाने  प्रदान करण्यात आला.

ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे मास्तीजी हे चौथे कन्नडभाषक साहित्यिक आहेत. ‘श्रीनिवास’ या टोपणनावानेही त्यांनी लेखन केले आहे. तरी कर्नाटकामध्ये ते ‘मास्तीजी’ म्हणूनच ओळखले जातात. ‘मास्ती’ म्हणजे कन्नडची आस्ती. (आस्ती म्हणजे मालमत्ता)

कन्नड लघुकथेचे जनक मास्तीजी यांचा जन्म ६ जून १८९१ मध्ये कर्नाटकच्या सीमेवरील कोलार जिल्ह्य़ातील मास्ती गावामध्ये एका सुसंस्कृत अय्यंगार कुटुंबामध्ये झाला. त्यांची मातृभाषा खरे तर तामीळ. पण कर्नाटकात राहत असल्याने त्यांनी कन्नड भाषेतच साहित्यनिर्मिती केली. बालपण मास्ती गावात खेडय़ातच गेले. एके काळी श्रीमंत असलेल्या मास्तींवर परिस्थितीवश वार लावून जेवावे लागण्याची वेळ आली. १९०८ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यामुळे यलदूरमध्ये शाळेत प्रवेश घेतलेल्या मास्तींनी पुढे शिवारपट्टण, मळवळ्ळी, म्हैसूर अशा अनेक ठिकाणी आपले आजोबा, मामा, काका यांच्याकडे राहून शिक्षण पूर्ण केले. प्रथम वर्गात प्रथम स्थान मिळवून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. संस्कृत ग्रंथांचा अभ्यास आणि भारतीय परंपरागत जीवनदृष्टीच्या वातावरणात वाढलेले मास्तीजी मद्रास विद्यापीठाची, इंग्रजी साहित्यातील एम.ए. ची पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून चमकले. म्हैसूर राज्य सिव्हिल परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनेक उच्च पदांवर शासनाधिकारी म्हणून काम केले. २६ वर्षांच्या सेवेनंतर १९४३ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ पदावर काम करणाऱ्याला वरच्या श्रेणीत नेमण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला. या निवृत्तीनंतर त्यांनी ‘जीवन’पत्रिकेचे संपादकपद २५ वर्षे भूषविले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com