भारतीय प्रागतिहासाचे (प्रिहिस्टॉरिक) संशोधनाचे जनक म्हणून संबोधले गेलेल्या रॉबर्ट फूट यांनी आपल्या आयुष्याची अखेरची ५२ वष्रे या संशोधनात आणि त्यावर पुस्तके लिहिण्यात खर्च केली आणि कलकत्त्यात १९१२ मध्ये ते निधन पावले. गुजरात आणि दक्षिण भारतात उत्खनन, संशोधन करून रॉबर्ट यांनी शेकडोंच्या संख्येने प्रागतिहासिक दगडी हत्यारे संग्रहित केली. यामध्ये हातकुऱ्हाडी, फरशा, तासणी, टोकदार आणि धारदार कडांच्या हत्यारांचा समावेश आहे. हा दगडी हत्यारांचा संग्रह पुढे मद्रास वस्तुसंग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या संशोधनावर त्यांनी ‘कट्रलॉग रसोने’ आणि ‘इंडियन प्रिहिस्टॉरिक  आर्टफिॅक्ट्स’ हे ग्रंथ लिहिले.

दगडी हत्यारांचा केवळ संग्रह करून न थांबता सांस्कृतिक निकषात पुराष्मयुग, नवाष्मयुग आणि लोहयुग या तीन युगांमधील वातावरणातील बदल आणि हत्यारांच्या आकारातील बदल लक्षात घेऊन रॉबर्ट फूट यांनी हत्यारांचे वर्गीकरण केले. दक्षिण भारतातील राखेच्या टेकडय़ा हे शेणाच्या राखेचे ढिगारे आहेत आणि त्यांचा संबंध नवाष्मयुगाशी आहे हे निरीक्षण सर्वप्रथम रॉबर्ट फूट यांनी नोंदवले. दक्षिण भारतातील प्राचीन संस्कृतीविषयक त्यांच्या नोंदींमुळे पुरातत्वीय संशोधनाचे एक नवे दालन खुले होऊन पुढील संशोधकांना चालना मिळाली. पुढे १८८७ साली रॉबर्ट फूट जिऑग्राफिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे संचालक झाले आणि १८९१ साली निवृत्तीनंतर तमिळनाडूत स्थायिक झाले. १८६३ ते १९११ या कालावधीत रॉबर्ट यांनी दक्षिण भारतात एकूण ४५९ प्रागतिहासिक स्थळांच्या नोंदी केल्या. रॉबर्ट फूट यांनी आपल्या कारकीर्दीत हे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले होते. जगात अनेक ठिकाणी आपल्या संग्रहित प्रागतिहासिक दगडी हत्यारांची प्रदर्शनं त्यांनी भरवली. जिऑलॉजिकल सोसायटी, लंडन तसेच नॉर्वीच येथील आंतरराष्ट्रीय जिऑलाजी परिषद अशा महत्त्वपूर्ण व्यासपीठांवर रॉबर्ट यांनी भारतीय प्रागतिहासिक संशोधन आणले. एक चित्रकार आणि संगीताचे जाणकार असलेले तसेच पुरातत्त्वज्ञ, संस्कृतीतज्ज्ञ, भूवैज्ञानिक असलेले रॉबर्ट हे ऑलिम्पिक सोसायटी, लंडनचे निवडून आलेले सदस्य होते! कलकत्त्यात १९१२ साली त्यांचा मृत्यू झाला.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com