रोमच्या सम्राटपदी ५४ साली आलेल्या निरोने प्रथम उत्तम, संयमित कारभार केला. व्यापार-विकास करून सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी नाटय़गृह बांधले, क्रीडा स्पर्धाना प्रोत्साहन दिले, कर कमी केले. पुढे पुढे निरोच्या आईचे त्याच्याशी पटेना म्हणून तिने तिचा हद्दपार केलेला सावत्र मुलगा ब्रिटानिकस याला राज्यावर बसवण्याचा घाट घातला. निरोने मग ज्युलियाला बंदिवासात पाठवून विषप्रयोग करून ठार मारले. यानंतर त्याच्या वर्तणुकीत अचानक बदल होऊन त्याच्याभोवती सतत तरुणी आणि विषयलंपट तरुणांचा घोळका दिसू लागला. रात्री तो गुलामाच्या वेशात शहरात फिरे. नाटक, संगीत आणि मद्यपान याचा अतिरेक होऊ लागला. पापिया या सुंदर तरुणीला तिच्या नवऱ्यापासून पळवून तिच्याशी पत्नीप्रमाणे संबंध ठेवले. पुढे पुढे निरोचा विक्षिप्तपणा आणखीच वाढू लागला. निरोने त्याची प्रथम पत्नी ऑक्टेव्हियाला एका निर्जन बेटावर नेऊन तिचा खून करविला. त्यानंतर प्रेयसी पापियाशी रीतसर लग्न करून तो मोकळा झाला. पुढे निरो आणखी व्यभिचारी बनून कुठल्याही स्त्रीशी चाळे करू लागला. कधी कधी निरो स्त्रीवेश धारण करून फोरममध्येही येत असे. काही वेळा तो स्वत:ला स्त्री समजत असे. या सर्वावर कळस म्हणजे एके दिवशी स्पोरस या पुरुषाशी त्याने लग्न केले! सन ६४ मध्ये अचानक रहस्यमयरीत्या रोम शहरात प्रचंड प्रमाणात आग लागून अध्र्याहून अधिक शहर भस्मसात झाले. त्या वेळी निरो शांतपणे आपल्या नाटय़शाळेत हार्प वाजवीत शहराचा विनाश पाहत बसला होता. आग विझल्यानंतर निरोने शहराचे पुनíनर्माण कार्य हाती घेतले. ही आग निरोनेच लावली असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. निरोच्या जुलमांचा आणि व्यभिचाराचा अतिरेक झाल्यामुळे सिनेटने निरोला देहदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच निरोने ९ जून ६८ रोजी आत्महत्या केली.

  सुनीत पोतनीस

Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

sunitpotnis@rediffmail.com

 

 

आंबा

आंबा किंवा आम्रफल सगळ्यांनाच आवडते. हा वृक्ष सर्वसाधारणपणे सर्वाना माहीत असतो. आपल्या मंगल कार्यामध्ये याच्या पानाचे तोरण, पवित्र म्हणून वापरतात. हा वृक्ष मूळचा दक्षिण पूर्व आशिया आणि मलाया (मलेशिया) मधील आहे असे समजते. पण गेली हजारो वष्रे त्याची लागवड भारतात होत आहे. म्हणूनच हा वृक्ष वनस्पतीशास्त्रात-  मॅग्निफेरा इंडिका लिन या नावाने ओळखला जातो.

हा एक सदाहरित डेरेदार वृक्ष आहे. याची उंची २० मीटपर्यंत वाढू शकते. खोड सरळ, दणकट असते. खोडावरील साल राखाडी, खडबडीत असते. पाने फांदीच्या टोकाशी एकवटलेली असतात. पाने लांबट भालाकृती ८-२५ सेंमी लांब ४-९ सेंमी रुंद, तजेलदार, पोपटी, हिरव्या रंगाची असतात. जून झाल्यावर काळपट हिरवी दिसतात. कडा अखंड नागमोडी असतात. फुले पिवळट, पांढरी, लहान, ६ ते ८ मिमी आकाराची असतात. त्यांचे लहान दाट झुबके झाडावर दिसतात. त्याला मोहर असे म्हणतात. त्याला सुगंध असतो. थंडीमध्ये साधारण डिसेंबर-जानेवारीपासून मोहर येण्यास सुरुवात होते. नंतर त्यावर लहान हिरव्या रंगाची फळे दिसू लागतात. फळे मोठी झाल्यावर त्याला कैरी म्हणतात. झाडावरून तोडल्यावर याच्या देठामधून चीक येतो. कैरी परिपक्व  झाल्यावर त्याचे पिवळ्या नािरगी रंगाच्या आंब्यामध्ये रूपांतर होते. हा आंबा गोड, रसदार, गराने भरलेला असतो. हे फळ लांबट अंडाकृती ८ ते १५ सेंमी, आकाराचे असते. याच्या आतमध्ये बी असते. त्याला कोय म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येकाची चव स्वतंत्र असते. कैरी व आंब्यापासून खूप उत्पादने करतात. आमरस, आंब्याची पोळी, साटे, आमचूर, लोणचे, गुळांबा, साखरांबा, पन्हे इत्यादी म्हणूनच याची लागवड सर्वत्र केली जाते. आंब्याची साल, फुले, कोय, व मुळे यांचा अतिसार, जंत व प्रदर इ. आजारावर औषधी उपचार करतात. याची उगवणक्षमता चांगली आहे. हा अ‍ॅनाकाíडएसी म्हणजेच आम्रकुलातील वृक्ष आहे.

आंबा वृक्षाच्या अनेक जाती भारतात लागवडीखाली आहेत. कोकणचा हापूस, पायरी बनारसचा लंगडा, लखनऊचा दशहरी, गुजरातचा केशर, तोतापुरी, दक्षिणेतला नीलम, बंगनपल्ली आणि स्थानिक अनेक. या प्रत्येक आंब्याच्या जातीप्रमाणे फळाच्या हंगामात थोडासा फरक पडतो. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला परदेशातही मोठे स्थान आहे. आम्रवृक्ष अभ्यास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण आंब्याच्या पानांना वायू प्रदूषणातील चढउतार लगेच जाणवतात.

अनिता कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org