24 February 2021

News Flash

भोपाळकर बोरबॉन

आपले नशीब अजमावून नवीनच आयुष्य जगायचे ठरवून त्याने भोपाळचा रस्ता धरला.

मोगलांच्या नोकरीत असलेला सन्य प्रशासकीय तज्ज्ञ आणि हकीम म्हणजे वैद्य सॅल्व्हाडोर डी बोरबॉन १७३९ साली नादीरशाहाने केलेल्या लूट आणि हिंसाचारातून निसटून कुटुंबासह त्याच्या शेरगढ जहागिरीत स्थायिक झाला; परंतु पुढे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील एका व्यक्तीने क्रूरपणे त्या फ्रेंच कुटुंबाच्या वसतीतील लोकांचा छळ करून त्यांची सर्व मालमत्ता हडप केली. त्यामुळे  सॅल्व्हाडोरने आपले नशीब अजमावून नवीनच आयुष्य जगायचे ठरवून त्याने भोपाळचा रस्ता धरला.

त्या काळात भोपाळवर विधवा बेगम ममोलाबाईचा कारभार होता. कर्तव्यशून्य आणि भोगवादी असलेला तिचा सावत्र मुलगा हयात नवाबपदावर होता. ममोलाबाई सत्तर वष्रे वयाची वृद्धा असूनही सर्व कारभार चालवत होती. गेल्या पन्नास वर्षांपासून ममोलाबाईच भोपाळचे प्रशासन उत्तम रीतीने सांभाळत होती.  सतत होणाऱ्या हल्ल्यांनी बेजार झालेली ममोलाबाई एखाद्या भरवशाच्या लष्करी प्रशासकाच्या शोधात होतीच. सॅल्व्हाडोर नोकरीच्या शोधात ममोलाबाईकडे आल्यावर तिने त्याचा लष्करी अनुभव, स्वामीनिष्ठा यांची चाचपणी करून प्रथम त्याला आपल्या फतेहगढच्या किल्लेदारपदी नियुक्त केलं. किल्लेदारपदाचा चांगला अनुभव आल्यावर ममोलाबाईने त्याला आपलं लष्करप्रमुख केलं. सॅल्व्हाडोरने भोपाळच्या फौजेचे आधुनिकीकरण करून व्यवस्था लावलीच, पण ममोलाबाईला अनेक वेळा मोलाचे राजकीय सल्ले देऊन स्वतची उपयुक्तता सिद्ध केली. त्याच्या आयुष्याला भोपाळमध्ये चांगले वळण मिळून स्थर्य आले होते. पुढे ममोलाबाईने तिचा दत्तकपुत्र छोटेखानला भोपाळ राज्याचा पंतप्रधान नेमून बराचसा कारभार त्याच्यावर सोपवला. १७९४ साली ममोलाबाई आणि छोटेखान दोघांचाही मृत्यू झाला. ममोलाबाईच्या जाण्याने राज्यात अंदाधुंदी माजून हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या अकार्यक्षम नवाब हयातने त्याचा चुलतभाऊ वजीर याला पाचारण केले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 12:36 am

Web Title: salvador de bourbon de navarre 2
Next Stories
1 सिलिकॉन
2 बोरबॉनचा भोपाळप्रवेश
3 कुतूहल : मूलद्रव्ये : अ‍ॅल्युमिनिअम विद्युत तारा
Just Now!
X