केसांची निगा राखण्यासाठी त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची असते. केस चांगले राहावेत म्हणून आपण केसांना तेल लावतो, तसेच केसाखालील त्वचेत असणाऱ्या तलग्रंथींमधूनसुद्धा तेल स्रवत असते. हे तेल काढून टाकले नाही तर त्यावर धूळ बसू शकते आणि मग केसांच्या समस्या सुरू होतात.  
पूर्वीच्या काळी केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा यांचा वापर केला जात असे. शिकेकाई आणि रिठय़ामध्ये तेल काढून टाकण्याचा गुणधर्म आहे. दोन्हींमध्ये सॅपोनिन असते, ज्यामुळे साबणाला भरपूर फेस येतो. शिकाकाईने केस मऊ राहतात. शिकाकाईमध्ये लुपेऑल, लॅक्टोन, ग्लुकोज आणि ऑक्ज़्‍ॉलिक, सायट्रिक, टार्टारिक, अ‍ॅस्कॉर्बकि, सक्सिनिक अशी विविध आम्ले असतात.
अगदी सुरुवातीला केस धुण्याचे साबण वडी स्वरूपात मिळत असत. आता द्रव स्वरूपातील शाम्पू उपलब्ध आहेत. शाम्पूमधील द्रावणात फेस आणणारी रसायने आणि कंडिशनर यांचा समावेश असतो. द्रव स्वरूप येण्यासाठी द्रावण म्हणून प्रोपिलीन ग्लायकॉल आणि पाणी यांचा वापर करतात. सोडियम लॉरेथ सल्फेट, कोका मिडो प्रोपाइल बीटेन, टी.ई.ए. डोडेसाइल बेंझीन सल्फोनेट या रसायनांमुळे शाम्पूला फेस येतो. ही रसायने तेल, धूळ आणि पाणी यांचे एकत्र मिश्रण करतात. त्यामुळे त्वचेवरून तेल आणि धूळ काढून टाकण्यास मदत होते. केस मऊ होण्यासाठी, केसांना चमक येण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल, डायमेथिकनॉल पॅथेनॉल, पेंटोलॅक्टॉन ही रसायने वापरली जातात. ग्लिसरॉल, अल्कोहोलमुळे शाम्पू पारदर्शक होतो. त्याची पारदर्शकता काढून टाकण्यासाठी त्यात स्टिअरील आणि सेटील अल्कोहोल घालतात.
लिनॅलॉल, स्रिटोनेलॉल यांसारख्या रसायनांमुळे शाम्पूला सुगंध येतो. शाम्पूचा सामू साधारण ५.५ ते ६.५ एवढा असतो. योग्य तो सामू राखण्यासाठी, शाम्पू खराब होऊ नये तसेच जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून त्यात काही रसायनांचा समावेश केलेला असतो. अँटिडॅण्ड्रफ शाम्पूमध्ये झिंक पायरिऑन असते. बऱ्याचशा शाम्पूंमध्ये नसíगक आणि रासायनिक पदार्थाचा एकत्रित वापर केलेला असतो.
अनघा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – सुपरकॅली सुपरकॅलीफ्रॅजिलिस्टिकएक्सपिअ‍ॅलीडोशस..
हुश्श! प्रयत्न केला तर कदाचित एका दमात हा २१ अक्षरी (१८+३) शब्द म्हणता येईल.. जमेल जमेल पाठ झाला तर तो सुरात म्हणतादेखील येईल. कहर म्हणजे तो उलटासुद्धा म्हणता येईल.
खूप गंमत आहे या शब्दात. शब्दाची संपूर्ण मजा घ्यायची असेल तर ‘मेरी पॉपिन्स’ हा १९६४ सालचा वॉल्ट डिस्नेचा सिनेमा पाहा. निदान यू टय़ूबवर ते गाणं म्हणणारी, अगदी सहज गाणारी ज्युली अ‍ॅण्ड्रय़ुज नाचताना बघता येईल.
अ‍ॅनिमेटेड पात्र आणि ‘डिक व्हॅन डाइक’ या अभिनेत्याबरोबर मस्त नाचणारी ज्युली पाहणं हृद्य अनुभव आहे.
मुळात ‘मेरी पॉपिन्स’ ही साठाव्या दशकातली यशस्वी आणि लोकप्रिय ‘डिलाइटफुल कॉमेडी’ आहे. मेरी पॉपिन्स लहानग्यांची गव्हर्नेस. ती स्वत:च ‘प्रॅक्टिकली पर्फेक्ट’ या शब्दात करते.मुलांच्या संगोपनातली आईची भूमिका किती मजेदार आणि आनंददायी असू शकते, याचं या सिनेमात चित्रण केलंय. ‘मेरी’ अवतरते छत्री घेऊन धूर ओकणाऱ्या चिमण्यांच्या पाश्र्वभूमीवरील दाट वस्तीमधल्या एका घराच्या टेरेसवर. म्हणजे पूर्णपणे काल्पनिक. या गव्हर्नेसचं नाव ‘मेरी’. त्या नावालाही विशेष अर्थ आहे. मुलांच्या संगोपनातला पुढचा अध्याय रचण्यासाठी ‘मेरी’नं पुनर्जन्म घेतलाय, असा भास होतो. मेरी त्या मुलांच्या आयुष्यात अक्षरश: बहार बनून येते आणि सुरू होते एक मनोरंजक फॅण्टसी. त्यामध्ये तिचा मित्र व्हॅनडॅकनं फूटपाथवर काढलेल्या खडूच्या चित्रामध्ये अलगद घुसता येतं, नाचता नि बागडता येतं. जमल्यास घोडय़ाची रेस जिंकता येते.
अशी रेस जिंकल्यावर मेरीची मुलाखत घ्यायला पत्रकार येतात तेव्हा मेरी अवाक होते, गोडगोड लाजते आणि जमलेले पत्रकार तिला शिष्टपणे म्हणतात, ‘शब्द सुचत नाहीत की काय तुला?’ यावर हा भला मोठा शब्द बोलून सगळ्यांना नि:शब्द करून टाकते.
त्या शब्दावर अख्खं गाणं म्हणते. शब्दोच्चारात दोष असल्यामुळे मुलाचं नाक ओढणाऱ्या बापाची मुलगा कशी जिरवितो याची गोष्ट सांगते. असा अवघड आणि अवजड शब्द उच्चारल्यामुळे समाजातलं स्थान कसं उंचावतं, असंही ठासून सांगते. गाण्याच्या अखेरीस एका दमात तोच शब्द उलटा म्हणून दाखविते आणि म्हणते, जाऊ दे, नाही म्हणता येणार, त्यासाठी मांजराची काटेरी जीभ लागते.
गंमत म्हणजे हा लांबलचक शब्द वाटतो तसा निर्थक नाही. म्हणजे सुपर: अबव्ह, कॅली: ब्युटी/सौंदर्य फ्रॅगिलिस्टिक: डेलिकेट-नाजूक, एक्सिपिअली-टु अटोन आणि डोशस- एज्युकेबल! म्हणजे नाजूक सौंदर्य शिकविण्याचा प्रमाद घडल्याबद्दल प्रायश्चित्त!! डिस्नेचं असलं काही म्हणणं नव्हतं, काहीच बोलता येत नसेल तर म्हणून टाका..
सुपरकॅलिफ्रॅजिलिस्टिकएक्सपिअ‍ॅलीडोशस.. कदाचित अमर अकबर अँथनीमध्ये असाच भला मोठा शब्द किशोरकुमारनं म्हटलाय, पण नुसत्या हीरोगिरीत तो वाया गेलाय.
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

प्रबोधन पर्व – आपण एकमेकांच्या सान्निध्यात आलो की अपूर्णाकाचा गुणाकार होतो
‘‘आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वत:कडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वत:कडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वत:चा विचार करतो. आपली स्वत:ची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते.. आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत नाही. स्वार्थ, लोभ, दुष्टपणा, मत्सर यांमुळे माणूस स्वकेंद्रित होतो ते निराळे; त्यामुळे समाजाची हानी होतच असते. पण आम्ही वरच्या पायरीवर गेलो, निलरेभ झालो तरी आमची दृष्टी अशी स्वकेंद्रित असते. आणि त्यामुळे वैयक्तिक सद्गुणांची संपादणी उत्तम करूनही श्रेष्ठ समाजधर्म व ते सद्गुण यांचा समन्वय घालण्याची दृष्टी नसल्यामुळे आमच्या सद्गुणांतूनही विपरीत अनर्थ निर्माण होतात.’’
पु. ग. सहस्त्रबुद्धे व्यक्तीविकासाबरोबरच समाजविकास गरजेचा असतो हे सांगताना लिहितात-‘‘दुर्गुणांमुळे समाज विघटित होणे हे नेहमीचेच आहे; पण आपण सद्गुण म्हणून ज्यांची जोपासना करतो त्यांतूनच आपल्या समाजविमुख, आत्मकेंद्रित दृष्टीमुळे अशी चमत्कारिक मूल्य निर्माण होतात, की त्यांचा परिणाम विघातक व्हावा!.. कोणतेही कृत्य करताना, कोणतेही धोरण ठरविताना आपल्या अखिल समाजाचे चित्र डोळ्यांपुढे ठेवावे, अखिल समाजाच्या जीवनाचे आपण अंशभागी आहो ही जाणीव मनात ठेवावी, असा संस्कार भारतीय मनावर गेल्या सातशे-आठशे वर्षांत झालेलाच नाही.. वैयक्तिक जीवनात परमोच्च बिंदू गाठण्याचे सामथ्र्य आपल्या अंगी असताना सांघिक जीवनात आम्ही सर्वत्र नामोहरम होतो ही दु:खद स्थिती म्हणजे आपल्या पूर्वीच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक आहे.. आपण एकमेकांच्या सान्निध्यात आलो की अपूर्णाकाचा गुणाकार तयार होतो.’’