03 June 2020

News Flash

कुतूहल – शर्टाचे कापड

व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यामध्ये पेहेरावाचा सिहांचा वाटा असतो. विशेषत: पुरुषांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या पेहेरावावरून किंवा पेहेरावाच्या पद्धतीवरून (स्टाईलवरून) बऱ्याच अंशी ठरत असतं.

| August 11, 2015 01:08 am

व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यामध्ये पेहेरावाचा सिहांचा वाटा असतो. विशेषत: पुरुषांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या पेहेरावावरून किंवा पेहेरावाच्या पद्धतीवरून (स्टाईलवरून)  बऱ्याच अंशी ठरत असतं. आजकालची मुले, युवक, प्रौढ आणि वृद्धसुद्धा आपापल्या पोशाखाबद्दल कमालीचे जागरूक आणि संवेदनशील आहेत. पुरुषांच्या पोषाखाचे दोन मुख्य अविभाज्य घटक होऊ शकतात, त्यातील पहिला म्हणजे शर्ट आणि दुसरा, अर्थातच पँट. केवळ शर्टचा विचार करायचा झाल्यास, त्याचेही दोन प्रकार होऊ शकतात. पहिला फॉर्मल शर्ट (औपचारिक प्रसंगी अथवा कार्यालयीन कामकाजाच्या प्रसंगी घालावयाचे शर्ट्स) आणि दुसरा कॅज्युअल शर्ट (अनौपचारिक प्रसंगी घालावयाचे शर्ट्स).
साधारणपणे आपण शर्ट किंवा शर्टाचे कापड खरेदी करताना ज्या गोष्टी लक्षात घेतो, त्यात प्रामुख्याने रंगसंगती, चमक, मऊसूतपणा, त्यावरील नक्षीकाम आणि या सर्वावर मात करणारी किंमत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. प्रत्येक शर्ट परिधान करणाऱ्याचे नुसतेच समाधान नव्हे तर त्याला तो एक वेगळा अनुभव वाटावा. तो जे परिधान करणार आहे त्याचा त्याला अभिमान वाटावा यासाठी हे सर्व गुणधर्म शर्टात उतरवावे लागतात. हे यशस्वीरीत्या होण्यासाठी या वस्त्राची उत्पादन प्रक्रियादेखील तितकीच सक्षम असावी लागते. अगदी कापसापासून सुरू होऊन ते शर्ट पॅक होईपर्यंतची ही उत्पादनप्रक्रिया आपण आता समजावून घेऊ.
शìटग (शर्टाचे कापड) उत्पादन प्रक्रिया ही साहजिकच सुरू होते कच्च्या मालापासून, नसíगक कापसाच्या धाग्यापासून किंवा मानवनिर्मित कृत्रिम तंतू व नसíगक कापसाचे तंतू यांच्या संगमाने तयार केलेल्या धाग्यापासून सुरू होते. कापूस अथवा कृत्रिमतंतू यांपासून सुरुवातीला धागा बनवला जातो. ही प्रक्रिया बऱ्याच अंशी इतर वस्त्रांसाठी बनणाऱ्या धाग्यांसारखीच असते. हा धागा मग विशिष्ट आकाराच्या नळ्यांवर गुंडाळला जातो. नळ्या आणि त्यावरील धागा यांना एकत्रितपणे ताणा कोश/कोन असे म्हणतात. गेल्या साधारणपणे दोन दशकांत प्रथम धागा रंगवून मग यांत्रिकी प्रक्रियेने वस्त्र बनवण्याची प्रक्रिया हा प्रघात, ही परंपरा प्रचलित होत आहे. या मागचे काही सर्वमान्य अनुभव नमूद करणे समर्पक ठरावे.
धाग्याच्या स्वरूपात दिलेला रंग जास्त टिकाऊ असतो. तो जास्त (चकाकतो) पारदर्शक असतो. रंग छपाईपेक्षा जास्त रंगवलेल्या धाग्याच्या प्रतिमा वा आकार कितीतरी पटीने मोहक असतात.
सतीश भुटडा (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – मेवाड राज्यस्थापना
आज प्रचलित असलेल्या  नकाशाप्रमाणे दक्षिणमध्य राजस्थानात असलेले, प्रांताची राजधानी जयपूरपासून चारशे कि.मी. अंतरावरील उदयपूर हे शहर पूर्वीच्या उदयपूर संस्थानाची राजधानी होते.
राजस्थानातील सध्याचे भिलवाडा, चित्तोडगढ, राजसमंद आणि उदयपूर हे चार जिल्हे पूर्वीच्या उदयपूर संस्थानात अंतर्भूत होते. या राज्याला ‘मेवाड’ असेही नाव होते. मेवाडचे मूळ नाव मेधपत असे होते. शिवजी (एकलिंग नाथ) हे दैवत मेवाडचे राजे असल्याची लोकांची श्रद्धा होती. मेधपतचे पुढे मेवाड झाले.
मेवाड या राज्याची राजधानी सातव्या शतकापासून राज्यकर्त्यांनी अनेक वेळा बदलली. प्रथम भिवी जनपदाची ‘नगरी’ येथे राजधानी होती.
तेराव्या शतकात बाप्पा रावळच्या काळात देलवाडा, नागद्राह, अघाटपूर या मेवाडच्या राजधान्या राहिल्या. अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले तेव्हा चितोड ही राजधानी होती. राणाकुंभने कुंभलगढ येथे, तर राणासंगने चितोड येथे, तर राणा प्रताप व राणा अमरसिंह यांनी गागुंदा आणि चावंड येथे राजधान्या केल्या.
राणा उदयसिंहने पिछोली येथे १५६८ मध्ये राजधानी केली. सोळाव्या शतकापासून पिछोली गावच उदयपूर या नावाने ओळखले जाऊ लागले.
चितोड येथील गेहलोत राजपूत घराण्याचा बाप्पा रावळ याने इ.स. ७३४ मध्ये मेवाडचे राज्य स्थापन केले. त्यापुढे स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंतची बाराशे वष्रे मेवाड राज्यावर गेहलोत वंशातील सिसोदिया राज्यकर्त्यांचे राज्य होते.
‘भक्ती आणि शक्तीचे राज्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूर ऊर्फ मेवाड राज्याचे राज्यक्षेत्र ३३५०० चौ.कि.मी. होते आणि १९०१ साली लोकसंख्या दहा लाखांहून अधिक होती
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2015 1:08 am

Web Title: shirt cloth
टॅग Navneet
Next Stories
1 सॅटिन वीण २
2 सॅटिन वीण – १
3 ट्विल वीण – २
Just Now!
X