विशिष्ट गुणवत्ता असलेले कापड, कापड गिरणीतून पोशाखनिर्मिती करणाऱ्याला उद्योगाकडे आणले जाते आणि तिथे त्याचे नानाविध पोशाखांमध्ये रूपांतर केले जाते. पोशाखाच्या डिझाइनप्रमाणे कापड कापण्याचे नियोजन केले जाते, त्याप्रमाणे ते कापले जाते व शिवले जाते. असे करताना एकदम अनेक शर्ट कापले आणि शिवले जातात. त्या वेळी यंत्रांचा वापर केला जातो. शिवून झालेल्या शर्टाची गुणवत्तेच्या दृष्टीने तपासणी होते, मग तयार झालेले शर्ट पॅक करून विक्रेत्यांकडे पाठवले जाते. तेथून ते वितरणव्यवस्थेच्या माध्यमातून विविध ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते.
ग्राहकांना शर्टिंगबाबत काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे, त्या बाबी पुढीलप्रमाणे –
* ब्लिचिंग पावडरने कपडे धुणे पूर्णपणे टाळावे.
* शर्ट थेट धुण्यासाठी घेवू नये. ते एखादा दुसरा तास पाण्यात भिजत ठेवावा आणि मग धुवावा. धुणे अधिक परिणामकारक होण्यासाठी कॉलर आणि कफ हे घासून घ्यावेत.
* शर्ट धुण्यासाठी थंड अथवा कोमट पाणीच वापरावे. गरम पाणी वापरल्याने शर्टाचे सौंदर्यमूल्य आणि गुणवत्ता दोन्ही कमी होतात. शक्यतो, खनिजयुक्त पाणी धुण्यासाठी वापरू नये. त्याने शर्टाचा मऊसूतपणा आणि चकाकी कमी होते.
* समान किंवा सारख्या रंगाचे कपडे एकत्र धुवावेत. पांढरे आणि रंगीत कपडे वेगवेगळे धुवावेत. यामुळे पांढऱ्या कपडय़ाला रंगीत कपडय़ाचा डाग लागण्याची शक्यता समूळ नष्ट होते.
* रंगीत कपडे थेट सूर्यप्रकाशात वाळवू नयेत, सावलीत वाळवावेत. सर्व रंग सूर्यप्रकाशात तसेच राहतील अशी खात्री देता येत नाही.
* पोशाखनिर्मिती करणाऱ्या कंपनीने धुण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या असतात, त्या कायम पाळाव्यात. अन्यथा आपले नुकसान होण्याची शक्यता वाढते.
* इस्त्री चांगली होण्यासाठी वाफेची इस्त्री वापरावी. नसल्यास, पाण्याचा हलकासा वापर करून शर्ट ओला करून घेतल्यास इस्त्री अधिक चांगली होते. कोणत्याही कपडय़ाला इस्त्री करण्यापूर्वी त्या कपडय़ावर असणाऱ्या उत्पादन करणाऱ्या कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
सतीश भुटडा (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – राणा प्रतापाची महानता
उदयपूर राज्याचा संस्थापक महाराणा उदयसिंह द्वितीय याच्या बावीस पत्नींपकी प्रथम पत्नीचा मुलगा महाराणा प्रतापसिंह प्रथम  याची राजकीय कारकीर्द इ.स.१५७२ ते १५९७ अशी झाली. उदयपूर राज्याने इतिहासात अनेक देशभक्त नायक दिले. सर्व राजपूत  राज्यकर्त्यांमध्ये प्रखर देशभक्त, स्वाभिमानी म्हणून गणला गेलेला राणा प्रतापसिंह राजस्थानात ‘राणा किका’ किंवा ‘राजस्थान सिंह’ या  नावाने ओळखला जातो. बादशाह अकबराने राजस्थानातल्या बहुतेक राजांशी नातेसंबंध जोडून, नातेवाईकांना मोगल सन्यात मोठय़ा हुद्दय़ावरच्या नोकऱ्या देऊन धूर्तपणे आपल्या आधिपत्याखाली आणले होते. राणा प्रतापचा भाऊ शक्तिसिंह मोगलांकडे सेनाधिकारीच्या  हुद्दय़ावर होता. अंबरचा राजा मानसिंहने तर आपली बहीण शाहजादा सलीम यास दिली होती. या गोष्टीमुळे राणा प्रताप आणि मानसिंह यांच्यामध्ये वैमनस्य होते. अकबराच्या विजयरथात केवळ राणा प्रताप अडथळा बनून राहिला होता. अकबराने आपल्या मुत्सद्देगिरीचा राणा प्रतापवर काही परिणाम होत नाही, असे पाहिल्यावर मानसिंह आणि राणा प्रताप यांच्यातील वैमनस्याचा उपयोग करून युद्धानेच हा प्रश्न सोडविला. जून १५७६ मध्ये हळदीघाटी येथे झालेल्या युद्धात मोगलांच्या ८० हजार सन्याच्या फौजेचे नेतृत्व मानसिंह आणि सय्यद  हशीम यांनी केले. राणा प्रतापकडे २० हजार सन्याची फौज होती. या युद्धात राणा प्रतापचा जरी पराभव झाला तरी तो जखमी अवस्थेत आपल्या चेतक घोडय़ावरून निसटून छावनाड येथील जंगलात भिल्लांबरोबर राहू लागला पुढची वीस वष्रे जंगलात राहून, काही वेळा  अन्नाशिवाय राहूनही भिल्लांच्या मदतीने मोगलांवर गनिमी हल्ले करून राणा प्रतापने आपल्या राज्याचा गेलेला अध्र्याहून अधिक प्रदेश  परत मिळविला. भिल्लाच्या झोपडीतच १५९७ मध्ये महाराणा प्रतापसिंहाचा मृत्यू झाला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com