‘परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?’ किती सुंदर शब्द.. हळवी स्पंदने व एक सांकेतिक स्वप्नावस्था. स्वप्नातील त्याच्या येण्याला ‘ती’ किती आतुरतेने वाट बघतेय.. आणि ‘तोही’ स्वप्नात यायच्या प्रयत्नात. आताच्या आई-बाबांनादेखील असलं हे स्वप्नात जाणं-येणं बहुतेक आवडतच असावं. काळ बदलला, अपूर्वाईसुद्धा बदलली, पण ही स्वप्नाळूपणाची संकल्पना मात्र कायमच राहिली आणि भविष्यातही राहणार आहे. पूर्वी स्वप्नात येणारा राजकुमार कदाचित धोती, फेटा बांधून येत असेल. आणि आजचा सुटात अथवा शेरवानीत येईल. अर्थात त्याचं रुबाबदार असणं कायमच अभिप्रेत होतं, आजही आहे व यापुढेही राहील.

मात्र हे केवळ या लग्नाळू वयातच होतं असं नाही. अगदी पूर्ण आयुष्यभरच हे असं रुबाबदार दिसणं आवश्यक आहे. मग ती मुलाखत असो, रोजचं व्यावसायिक जीवन असो, एखादा समारंभ असो की रोजचं कॉलेज अथवा शालेय जीवन असो.. रुबाब हा वाटायलाच हवा. आपल्या मूळच्या रूपाबरोबरच, आपण घातलेला पोशाख आपल्या बाबतीत बरंच काही सांगून जातो. आपल्या शर्टावर आपलं व्यक्तिमत्त्व अवलंबून असतं. अरे यार त्याची ‘कॉलर’ काय ताठ आहे हे विधान कॉलरची शर्टासाठीची महती सांगून जातं. वापरलेलं शìटग, बटणं, धागा-दोरा इत्यादी सर्व साहित्य शर्ट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

कॉलर हा शर्ट बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक. त्यासाठी आवश्यकता असते सुयोग्य इंटरलाइिनग कापडाची. मायक्रोडॉट कोटेड फ्युजिबल वोव्हन इंटरलाइिनग सामान्यत: वापरलं जातं. यात इस्त्रीने फ्युज होऊ शकणारे म्हणजे एल्डीपीई व फ्युजिंग मशीन आवश्यक असणारे ते एचडीपीई. आकसण्याचा तसेच शर्टाच्या कापडाशी संयोग क्षमतेस खूप महत्त्व आहे. इंटरलाइिनग कापड बनवणं हे एक वेगळं तंत्रज्ञान आहे. अलीकडच्या काळात या कापडाच्या गुणवत्तेविषयी टेलर्स व गारमेंट बनवणाऱ्या कंपन्यामध्ये जागरूकता खूप वाढली आहे. इंटरलाइिनगचे नॉन वोवेन, बेसिक वगरेही प्रकार आहेत. आवश्यकतेनुसार त्यांचा सुयोग्य वापर करावयाचा असतो. ‘कॉलर बनवणं हे विज्ञानही आहे तशी कलाही’ हा उल्लेख मात्र करावाच लागेल. या बाबतीत टेलर्स तसेच ग्राहकांनीही खूप जागरूक राहणं गरजेचे आहे. म्हणजेच ‘तो’ स्वप्नातील राजकुमार प्रत्यक्ष अवतरणं सहज शक्य होईल आणि मनीच्या दाटलेल्या भावनांना मनसोक्त साद आणि दाद मिळेल.
 सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – राजर्षी शाहू महाराजांची कारकीर्द
कोल्हापूर संस्थानचे राजे शिवाजी चतुर्थ यांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या विधवा पत्नीने यशवंत घाटगे या मुलाला १८८४ साली दत्तक घेतले. दत्तकविधान झाल्यावर त्याचे नाव शाहू चतुर्थ असे ठेवले गेले. मूळचे, जयसिंगराव घाटगे कागलकर यांचे ते चिरंजीव. शाहू महाराजांना १८९४ साली कोल्हापूर संस्थानचा राज्याधिकार मिळाला. छत्रपतींच्या घराण्याला इंग्रज सरकारकडून १९०० साली ‘महाराजा’ ही पदवी लावण्याचा अधिकार मिळाला. तोपर्यंत छत्रपतींना ‘राजा’ असे संबोधिले जात असे. शाहू महाराज सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कत्रे होते. शाहू महाराजांच्या इ.स. १८९४ ते १९२२ अशा २८ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध प्रत्यक्ष कृतीने पुढाकार घेतला. बहुजन समाजाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या रूढींना त्यांचा विरोध होता. महाराजांच्या अशा सुधारणांमुळे संस्थानाच्या इतिहासात आधुनिक युग सुरू झाले. संस्थानातील मागास वर्गाना मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक नव्या शाळा स्थापन केल्या. कोल्हापूर, नाशिक, पुणे, पंढरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे त्यांनी स्थापन केली. महाराजांनी काही अस्पृश्यांना वकिलीची सनद दिली, काही अस्पृश्य तरुण तलाठय़ाच्या कामासाठी नेमले. १९१६ साली त्यांनी पुनर्वविाह, विधवाविवाह, आंतरजातीय विवाह यांना कायद्याने मान्यता दिली. त्याच वर्षी ‘डेक्कन रयत असोसिएशन’ स्थापून बहुजन समाजास त्यांनी राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले. १९२० साली डॉ. आंबेडकर डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी लंडनला गेले. त्यासाठी सर्व आíथक साहाय्य त्या वेळी महाराजांनी केलेच, पण त्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेले पाक्षिक ‘मूकनायक’ यालाही संपूर्ण अर्थसाहाय्य महाराजांचेच होते. महाराजांनी संस्थानाच्या औद्योगिक उत्कर्षांसाठी शाहू छत्रपती स्पिनिंग मिल, शाहुपुरी व्यापार पेठ, किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिटय़ूट, शेतकरी सहकारी संस्था स्थापन केल्या. धानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रिय परिषदेचे महाराज अध्यक्ष होते. त्या समाजाने शाहू महाराजांना ‘राजर्ष’ि हा किताब दिला. १९२२ साली महाराजांचे मुंबईत निधन झाले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com