News Flash

सर फ्रान्सिस बोफोर्ट

फ्रान्सिस बोफोर्ट जन्माने आयरिश असले तरी त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं होतं.

समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांची अनेक निरीक्षणं घेऊन अ‍ॅडमिरल फ्रान्सिस बोफोर्ट यांनी १८३३ साली सागरी वाऱ्यांची तीव्रता किंवा वेग ठरवणारी एक मापनश्रेणी निश्चित केली. १९२६ साली या मापनश्रेणीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग समजून घेण्यासाठी बोफोर्ट मापनश्रेणी वापरण्यात यायला लागली.

वाऱ्यांचा वेग किती आहे, हे सांगणाऱ्या मापनश्रेणीचे निर्माते सर फ्रान्सिस बोफोर्ट १७७४ साली आर्यलड इथे झाला. त्यांचे वडील डॅनिएल बोफोर्ट हे लंडनमधून आर्यलडला आले आणि स्थायिक झाले. डॅनिएल बोफोर्ट भूगोल आणि टोपोग्राफी या दोन विषयांतले सुप्रसिद्ध तज्ज्ञ होते. आर्यलडचे सर्व तपशील दाखवणारे नकाशे त्यांनीच सर्वप्रथम तयार केले. साहजिकच फ्रान्सिस बोफोर्ट यांच्यावर त्यांच्या वडिलांचे संस्कार झाले.

फ्रान्सिस बोफोर्ट जन्माने आयरिश असले तरी त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं होतं. त्यांची सागरी सफरीची कारकीर्द अगदी लवकर म्हणजे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी सुरू झाली. तेव्हा ते ब्रिटिश आरमाराच्या जहाजावर ‘केबीन बॉय’ म्हणून काम करत असत. पण जहाजावर असताना त्यांच्या शिक्षणात खंड पडला नाही. कारण, जहाजावरील इतर लोकांची मदत घेऊन त्यांनी स्वत:च सातत्याने आपला अभ्यास सुरू ठेवला. याच अभ्यासाच्या जोरावर पुढे त्यांनी जॉन हर्शेल, जॉर्ज बिडेल एअरी आणि चार्ल्स बॅबेज यांसारख्या थोर संशोधक आणि गणितींना संशोधन कार्यात मदत केली.

जहाजावर काम करताना फ्रान्सिस बोफोर्ट सागरी नकाशांच्या बाबतीत अत्यंत जागरूक असत. कारण, वयाच्या पंधराव्या वर्षीच चुकीचे सागरी नकाशे वापरल्याने जहाज भरकटून फुटल्याची घटना त्यांनी अनुभवली होती. आपल्या सागरी कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक सागरी नकाशे तयार केले. ज्या सागरी किनाऱ्यांचे नकाशे तयार केले नव्हते असे किनारे शोधून त्यांचे अचूक नकाशे तयार करण्याचं काम बोफोर्ट यांनी केलं. आजही म्हणजे तयार केल्यापासून दोनशे वर्ष उलटून गेल्यावरही हे नकाशे वापरले जातात. पण फ्रान्सिस बोफोर्ट हे त्यांनी वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी तयार केलेल्या मापनश्रेणीबद्दल परिचित आहेत.

वयाच्या ८३व्या वर्षी  इंग्लंडमधल्या ससेक्स इथे बोफोर्ट यांचं निधन झालं. त्यांच्या सागरशास्त्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी आर्टकि महासागराच्या एका शाखेला ‘बोफोर्ट समुद्र’ तर अंटाíक्टक समुद्रातील एका बेटाला ‘बोफोर्ट बेट’ असं नाव देण्यात आलं आहे.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

विंदा (गो. वि.) करंदीकर- साहित्य :

विंदा करंदीकर यांचे लेखन मुख्यत: ‘काव्य’ या प्रकारातून झाले असले तरी, लघुनिबंध, समीक्षा व भाषांतरित वाङ्मय या प्रकारांतही त्यांनी लक्षणीय साहित्यनिर्मिती केली आहे.

स्वत:च्या काव्य लेखनाच्या आरंभाविषयी विंदा म्हणत, ‘लहानपणी- एकदा सुट्टीमध्ये कोकणात घरी आल्यावर, ‘गरीब बिचारा शेतकरी। करी शिळी चतकोर भाकरी घेऊन मेरेवरी बैसला, अश्रू ढाळीत’ या ओळी त्यांनी आईला म्हणून दाखविल्या. तिचे डोळे पाणावले. त्याच क्षणी कविता लिहिता येते असा आत्मविश्वास निर्माण झाला. वयाच्या १९ व्या वर्षी म्हणजे १९३६ साली ‘प्रतिभेस’ ही कविता त्यांनी लिहिली. स्वेदगंगा (१९४९) या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहात ही कविता ‘पहिली कविता’ म्हणून छापली आहे. १९४९ साली पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनात त्यांनी प्रथम मजूर आणि भरतीची लाट या दोन कवितांचे जाहीरपणे काव्यवाचन केले. कविता लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक मार्ग आहे. असे त्यांचे मत होते. विंदा, वसंत बापट, मंगेश पाडगावकर ही त्रयी अतिशय बहारदार, आपापल्या खास शैलीमध्ये कविता वाचन करी. मार्मिकपणे पण गंमतीने म्हणत, ‘आमचे प्रकाशक हस्तलिखितावर इतकं प्रेम करतात की ते मुद्रकाला देण्याची कल्पनाच त्यांना अनेकवर्षे सहन होत नाही. मग आमचे प्रकाशक अर्वाचीन वाङ्मय स्वीकारतात अन् प्राचीन म्हणून प्रसिद्ध करतात. त्या मानाने कविता वाचकांपर्यंत पोहचविण्याचा काव्य वाचनाचा अनुभव कितीतरी उत्साहवर्धक असतो.’!

स्वेदगंगा या पहिल्या काव्य संग्रहानंतर ‘मृद्गंध’ (१९५४), ‘धृपद’ (१९५९) ‘जातक’ (१९६८), ‘विरूपिका’ (१९८१) व ‘अष्टदर्शने’ (२००३) हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सामाजिक जाणिवेच्या कविता, प्रेमकविता, गझल, सुनीत, तालचित्रे, बालकविता अशा विविध रूपात त्यांनी काव्यलेखन केले आहे.

लघुनिबंधकार म्हणून विंदांच्या नावावर ‘स्पर्शाची पालवी’ (१९५८) आणि  आकाशाचा अर्थ (१९६५) हे दोन संग्रह आहेत. करंदीकरांनी इंग्रजी व मराठीतही साहित्य समीक्षा लिहिली आहे. परंपरा आणि नवता (१९६७) आणि लिटरेचर अ‍ॅज, ए व्हायटल आर्ट (१९९१) आणि ‘अ क्रिटिक हॅव लिटररी व्हॅल्यूज’ (१९९७) समीक्षा ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 2:49 am

Web Title: sir francis beaufort
Next Stories
1 ‘रिश्टर’ मापनपद्धत
2 आर्द्रता मोजण्याच्या अन्य पद्धती
3 आर्द्रतेचे मापन
Just Now!
X