मातीचा सामू म्हणजे जमिनीचे आम्ल आणि विम्ल (अल्कली) गुण निर्देशित करणारे परिमाण मूल्य. या मूल्यामुळे मातीतील हायड्रोजन आयनाच्या प्रमाणाचे निर्देशन होते. हे मूल्य एक ते १४ या अंक मोजपट्टीत दर्शविले जाते. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. सातच्या खाली असणारे िबदू आम्लता दर्शवितात, तर सातच्या वरील िबदू हे अल्कली (विम्लता) दर्शवितात. मातीच्या बाबतीत मात्र ६.५ ते ७.५ या दरम्यान असणाऱ्या सामूची जमीन उदासीन मानली जाते. मातीचा सामू ६.५ च्या खाली असेल तर जमीन आम्लीय व ७.५ च्या वर असेल तर जमीन विम्लधारी असे मानले जाते.
अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर सामूचा प्रभाव मोलाचा ठरतो. सामू ५.५  ते ८.५ च्या दरम्यान असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला राहातो. ५.५ पेक्षा कमी सामू असल्यास जमिनीत जास्त आम्ल असते. अशावेळी जमिनीतून पिकांना कॅल्शियम, मॉलिब्डेनम, स्फुरद, गंधक व नत्राची उपलब्धता कमी राहाते. तसेच लोह, एल्युमिनीयम, मँगेनीज, तांबे व जस्त यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते. लोह, मँगेनीज व एल्युमिनियमचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो. स्फुरद मात्र स्थिर स्वरूपात जाऊन त्याची उपलब्धता कमी होते. सामू ८.५ पेक्षा जास्त असल्यास सोडियमचे क्षार वाढतात. जमिनीतून पाण्याचा निचरा बरोबर नसेल, तर अशावेळी जमिनी चोपण होतात. म्हणजेच पिक लागवडीस अयोग्य ठरतात. अशा जमिनीत लोह, जस्त, तांबे, मॅंगेनीज यांची उपलब्धता कमी होते. बोरॉनचे प्रमाण वाढते व ते पिकास हानीकारक ठरू शकते. अशा जमिनीचा सामू कमी करण्यासाठी प्रथम निचरा सुधारावा लागतो. त्यामुळे क्षार कमी होतात. तसेच जिप्सम, सेंद्रिय खत, गंधक इत्यादींचा वापर करून जमिनीची सुधारणा होऊ शकते. ज्या जमिनीचा सामू आम्लता दर्शवितो, अशा जमिनीस मात्र चुनखडी देऊन आम्लता कमी करता येते. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सामू किती आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि तो आवाक्यात ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणेही आवश्यक आह
    – डॉ. विठ्ठल चापके
    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

वॉर अँड पीस                                                       ताप- भाग २
आयुर्वेदीय शास्त्रकारांचा आयुर्वेदीय चिकित्सकांना असा सांगावा आहे की; ‘आपण विविध प्रकारचे ज्वराचे रुग्णांना लवकरात लवकर रोगमुक्त केले; तर इतर सर्व रोगही आपण चांगले हाताळू शकाल.’ ताप हा सर्व रोगात श्रेष्ठ असून पीडादायक आहे. जगभराच्या अकाली मृत्यूसंख्येचा आढावा घेतला तर या रोगाने जास्त जणांचा बळी घेतला जातो हे लक्षात येईलच. तापाला श्री शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेल्या रागाची उपमा दिली आहे. ताप आल्यापासून अखेपर्यंत तो शरीरात मोह व दाह एकाच वेळी उत्पन्न करतो. या व्याधीही कारणे अनेक, लक्षणे वेगवेगळ्या प्रकारची त्यामुळेच त्याचे किमान डझनभर प्रकारांचा विचार, वैद्यकीय चिकित्सकांना बारकाईने करावा लागतो. आयुर्वेदीय शास्त्रकारांनी सामान्यपणे दोष भेदानुसार सात; आगंतु ज्वर, जीर्ण ज्वर, शारीरिक व मानसिक ज्वर; शीतपूर्व ज्वर, संतत ज्वर, सतत ज्वर किंवा विषम ज्वर, धातुगत ज्वर असे अनेक अनेक प्रकार केले आहेत. आपण या लेखामालेत दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आठ प्रकारच्या तापांचा विचार करणार आहोत.
१) श्रम धातुक्षय, क्षय, जीर्णज्वर यामुळे ताप – अतिश्रम व त्यामानाने कमी पोषण, शुक्रधातूचा अतिरेकी वापर. क्षय विकारातील सर्दी, पडसे, ताप, अंग दुखणे, जुलाब रुची नसणे, या लक्षणांचा पुन: पुन: प्रादुर्भाव. अंगात सतत कडकी गरमी असणे. इ. कारणांमुळे थकवा, तापाचे प्रमाण कमी अधिक व संचारी असणे. अंग नेहमी गरम असणे, शरीर क्षीण होत जाणे, ताप उत्तरोत्तर धातुगत होत जाणे. भूक मंद होत जाणे अशी लक्षणे असतात.अशा रुग्णाला खूप श्रम होत असल्यास शृंगभस्म द्यावे. जुनाट तापाकरिता लघुमालिनीवसंत, सुवर्णमालिनी वसंत यातील एक औषध निवडावे. क्षयाची पाश्र्वभूमी असल्यास चौसष्ठ पिंपळी अभ्रक भस्म, ज्येष्ठमध, शृंगभस्म यांचे मिश्रण द्यावे. अरुची असल्यास जेवणाअगोदर आमलक्यादि चूर्ण घ्यावे. नेहमीचे औषध म्हणून लघुमालिनीवसंत, ज्वरांकुश व अभ्रकमिश्रण या गोळ्या घ्याव्या.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
बँकांतील ठेवींचा विमा
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
Five Year Plans In India
UPSC-MPSC : भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी राबवण्यात आली? त्यामागचा नेमका उद्देश काय होता?

जे देखे रवी..      वैद्यकीय विज्ञान
मी मेडिकलच्या शेवटच्या वर्षांत असताना एक माणूस हुज्जत घालत होता. तो आला होता ७ १ं८ काढायला आणि माझे शिक्षक म्हणत होते आधी ७ १ं८ ची गरज आहे का? हे मला ठरवू दे. पन्नास वर्षांपूर्वीचा काळ आहे. त्या वेळी सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या रुग्णालयात विनामूल्य मिळत. अँटिबायोटिक्स त्या काळी पाच-दहाच असतील, तीही विनामूल्य असत. मांसाहारी जेवण, खाट, रक्तचाचणी, शस्त्रक्रिया, सलाइन सर्व फुकट होते. पुढे जमाना बदलला. अँटिबायोटिक्सचा पाऊस पडू लागला. ती महाग झाली. आता ७ १ं८ ही कालबाह्य़ होऊ लागला आहे. त्याऐवजी उळ रूंल्ल ंल्ल िटफक या अगदी नव्या पद्धती रुळल्या आहेत. या चिकित्सा पद्धतीच्या किमती अवाढव्य आहेत. पूर्वी ७ १ं८ साठी हुज्जत घालणारा रुग्ण आता उळ रूंल्ल चा आग्रह करतो. या पद्धतींसाठी जागा लागते आणि तज्ज्ञ लागतात, वातानुकूल दालनेही लागतात. उळ रूंल्ल ने काढलेले चित्र दिसते मोठे अचूक आणि आकर्षक. शिवाय त्या चित्राकडे बघितले तर सामान्य माणूसही त्यातील ढोबळ विकृती शोधू शकतो. वैद्यकीय प्रपंच चालवणे हल्ली महागडे झाले आहे. परंतु लोकांच्या अपेक्षाही गगनाला भिडल्या आहेत. हा उळ रूंल्ल,  १ं८ ची सुधारून वाढवलेली आवृत्ती असते. पूर्वी माणसाला उभा करून किंवा झोपवून त्याच्यातून क्ष किरण सोडत, हे किरण इलेक्ट्रॉन्सचे असतात. काही किरण आरपार जातात. उदाहरणार्थ हवेतून किंवा फुफ्फुसातून. शरीरातली हाडे या किरणांना अडथळा आणतात. त्यामुळे पलीकडे ठेवलेल्या ऋ्र’े  वर हे किरण निरनिराळ्या अंशाने आपटतात. फुफ्फुस काळे दिसते तर हाडे पांढरी दिसतात. फुफ्फुसात पाणी भरले तर ते करडे दिसते आणि हाडात भोक पडले असले तर पांढऱ्या हाडात ते भोक काळे दिसते. परंतु हे चित्र सपाट असते. उळ रूंल्ल मध्ये जत्रेमध्ये कसे चक्र फिरते आणि त्याला डोल्या असतात तसे क्ष किरण यंत्र रुग्णाभोवती फिरते आणि डोनट किंवा मेदुवडय़ाला कसे मधे भोक असते त्या भोकामध्ये माणसाला ठेवतात आणि त्याच्याभोवती चक्र फिरवले जाते. क्षणार्धात शेकडो चित्रे काढली जातात. मग या चित्रांची संगणकाकडून छाननी आणि जुळणी होते. गीतेत ‘हातावर बोर ठेवले तर जसे त्याचे ज्ञान सर्व बाजूने होऊ शकते’ असे सांगितले आहे तसेच हे. असंख्य चित्रे निघतात, त्यांचा अनुक्रम लावत मग एक अंतिम चित्र तयार होते आणि आपल्या डिजिटल कॅमेऱ्यावर छायाचित्र काढल्यावर जसे ‘बघू बघू कसे दिसते’ असे म्हणत लोक जमतात, तसेच हे ही चित्र लगेच तयार होते. एखादा खरा हाडाचा सापळा समोर ठेवावा त्याप्रमाणे हे चित्र दिसते आणि रुग्ण अक्षरश: भारावतो!
रविन मायदेव थत्ते  १’३ँं३३ी@ॠें्र’.ूे
लेखक डॉ. थत्ते यांच्या योजनेनुसार हा लेखांक मंगळवार, ५ मार्च रोजी (‘विज्ञान आणि व्यवहार’ या लेखांकापूर्वी) प्रकाशित व्हावयास हवा होता.  

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ६ मार्च
१८९९ > तत्त्वनिष्ठ पत्रकार, ‘त्रिकाळ’ कर्ते शिवराम लक्ष्मण करंदीकर यांचा जन्म. स्वा. सावरकर व लो. टिळक यांची चरित्रे, ‘पाकिस्तानचे संकट’,‘अमेरिकेचे स्वराज्य व सुराज्य’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९०५ > संस्कृतचे व्यासंगी पंडित व मराठी- इंग्रजी भाषांतरकार गोविंद शंकर बापट यांचे निधन. ‘व्युत्पत्तिप्रदीप’ हा त्यांचा गाजलेला ग्रंथ, तर ‘संस्कृत ग्रंथार्थसंग्रह’ या मालिकेद्वारे त्यांनी २५ ते ३० पुस्तके मराठीत आणली. मराठी व संस्कृतात अनेक आधारित पुस्तकेही त्यांनी सिद्ध केली.  
१९५३ > ‘श्यामची आई’ या बोधप्रद, आत्मपर कादंबरीवरील त्याच नावाचा, आचार्य प्र. के. अत्रे यांनी निर्मिलेला चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला.
१९८१ > ‘सृष्टिज्ञान- आकाशदर्शन अ‍ॅटलास’, ‘अणुशक्ती’ आदी शास्त्रविषयक पुस्तकांसह ‘वैज्ञानिक परिभाषा व संज्ञा कोश’ तयार करून मराठी ज्ञानभाषेत भर घालणारे गोपाळ रामचंद्र परांजपे यांचे निधन. मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये होमी भाभा, विष्णुपंत नारळीकर आदींना त्यांनी शिकविले होते.
१९९६> ‘हंबिरा’, ‘सगुणा’, ‘सुगंधा’आदी लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक, लोकशाहीर शंकरभाऊ साठे यांचे निधन.
संजय वझरेकर