दक्षिण मध्य जर्मनीतले स्टुटगार्ट शहर, वुटेम्बर्ग प्रांताची राजधानी आणि युरोपातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विख्यात आहे. ९५० साली या प्रदेशात रोमन साम्राज्याची घोडय़ांची मोठी पागा होती आणि त्यावरून या वस्तीचे नाव झाले स्टुटगार्टन. तेराव्या शतकात स्टुटगार्ट वुर्टेम्बर्ग सरदाराच्या अमलाखाली आले. या काळात या वस्तीला शहराचे स्वरूप येऊन तिथे वुर्टेम्बर्गच्या सरदाराचे वास्तव्यही होते. पंधराव्या शतकाच्या अखेरीस स्टुटगार्ट ही राज्याची राजधानी झाली. पुढे काही काळ स्टुटगार्ट ऑस्ट्रियाचा वर्चस्वाखालीही राहिले. परंतु त्या काळात ऑस्ट्रियन साम्राज्याविरुद्ध बंड आणि यादवी माजून ते परत वुर्टेम्बर्गच्या अमलाखाली आले. स्टुटगार्ट शहराच्या इतिहासात आणि संस्कृतीत मोठा बदल झाला तो एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर. या काळात येथे झालेल्या औद्योगिक विकासामुळे स्टुटगार्ट हे युरोपातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले. जवळपास दीड लाखांवर लहान-मोठे कारखाने असलेल्या या शहरात चारचाकी वाहनांचा निर्मिती उद्योग प्रमुख आहे. यामध्ये मर्सडिीज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या डायमलर या कंपनीचे केंद्र कार्यालय आणि प्रमुख कारखाना स्टुटगार्टमध्येच आहे. गोटलिब डायमलर या मर्सडिीज बेंझ कारच्या उत्पादकांनी स्टुटगार्टमध्ये पहिल्या मोटारकारची निर्मिती केली. पोर्शे या अतिजलद स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कंपनीचे केंद्र कार्यालय आणि कारखानाही स्टुटगार्टमध्येच आहे. वाहन उत्पादक उद्योग संस्थांबरोबरच बॉश, बेहेर वगरे वाहनाच्या सुटय़ा भागांच्या उत्पादकांचेही कारखाने स्टुटगार्टमध्ये आहेत. स्टुटगार्टमध्ये मर्सडिीज बेंझ आणि पोर्शे या वाहन उत्पादकांचे म्युझियम्सही आहेत.  इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग, वस्त्रोद्योग, चामडी वस्तूंचे, कॅमेऱ्याचे उत्पादन या शहरात मोठय़ा प्रमाणात चालते. जर्मनीतले सर्वात मोठे वाइन उत्पादक अशी ओळख असणाऱ्या स्टुटगार्टचा वाइन उद्योग अठरा हेक्टर्सवर पसरलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात बॉम्बिंगमुळे येथील उद्योग क्षेत्र आणि इमारती निम्म्याअधिक उद्ध्वस्त झाल्या होत्या. युद्धसमाप्तीनंतर मात्र जर्मन सरकारने त्वरेने डागडुजी करून येथील कारखाने पूर्ववत सुरू केले.

सुनीत पोतनीस

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

sunitpotnis@rediffmail.com

 

बेल

भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड या ठिकाणी बेल हा वृक्ष आढळतो. भारतात देवळाच्या आसपास बऱ्याच ठिकाणी आढळणाऱ्या वृक्षाचा उल्लेख वैदिक वाङ्मय, पाणिनीची अष्ठाध्यायी, महाभारत, चरक संहिता, सुश्रुत संहिता अशा अनेक संस्कृत ग्रंथांत पाहावयास मिळतो. मध्यम आकाराचा हा पानझडी वृक्ष आहे. ‘ईगल मॉम्रेलॉस्’ हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. हा वृक्ष साधारण १८ मीटर उंच वाढतो. खोडाची साल जाड, फिकट राखाडी रंगाची असून त्यावर खवले असतात. फांद्यांवर पानांच्या बगलेत काटे असतात. याची पाने संयुक्त त्रिदली, सुगंधी आणि एकाआड असतात. त्यात बाष्पनशील तेलद्रव्य असते. फुले मध्यम आकाराची, हिरवट, पांढरी, सुगंधी असून पाकळ्यांवर दाट ठिपके असतात. फळ गोलसर गरयुक्त, कठीण कवचाचे, करडे-पिवळ्या रंगाचे असते. फळात नािरगी रंगाचा, चिकट, घट्ट, गोड आणि सुवासिक गर असतो. फळातील ‘माम्रेलोसिन’ हे औषधी द्रव्य असते. ते मूत्रविकार, निद्रानाश, हृदयविकार, घाम कमी करणे यासाठी वापरतात. त्याच्या बियांचे तेल रेचक म्हणून उपयुक्त आहे. मुळावरच्या सालीचा उपयोग मत्स्यविष म्हणून होतो. फळातील गर शीतकारक, पाचक, अतिसार व आमांश यावर उपयुक्त आहे. बहिरेपणा आणि कर्णदोष यावरही बेलफळ उपयोगी आहे. बेलफळाचा मुरांबा पोटातील मुरडय़ावर उत्तम औषध आहे. बेलफळ औषधात निरनिराळ्या प्रकारे वापरतात. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात. त्याला बेलाची काचरी अथवा वैद्यकीय भाषेत बिल्वपेशिका म्हणतात. अतिसार आणि रक्तीआव बंद होण्यासाठी बिल्वपेशिका उपयुक्त आहे. पोट फुगणे, वारंवार लघवी होणे यावर बेलफळाचा काढा घेतला जातो. क्षयरोगावर बेल उपयुक्त आहे. दशमुळातील एक घटक आहे. शक्तिवर्धक म्हणून बेलाच्या पानांच्या रसाचा उपयोग होतो. दमा, श्वास यामध्ये पानाचा काढा मिऱ्याच्या पुडीबरोबर देतात. सूजसंग्रहणी, व्रण, जुलाब, वांती, आम्लपित्त यावर उपचार म्हणून बेलफळाचा मुरांबा किंवा सरबताचा उपयोग होतो.

फळाच्या गरातील चिकट पदार्थ वॉíनश, चिटकवण्याचा पदार्थ म्हणून वापरतात. कच्च्या फळापासून पिवळा रंग बनवतात. खोडाचा उपयोग घरबांधणी, बलगाडय़ा, तेलघाणे, मुसळ, उसाचे चरक अशी विविध अवजारे बनवण्यासाठी करतात.

  मृणालिनी साठे (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org