इस्तंबूल म्हणजेच पूर्वीच्या बायझंटाईनच्या परिसरातील इल्बारी टोळीप्रमुखाचा मुलगा शमशुद्दीन इल्तमश याने पुढे िहदुस्थानात तुर्की साम्राज्याचा विस्तार करून त्याला बळकटी आणली. बुद्धिमान असलेला इल्तमश वडिलांची गादी बळकावेल या भीतीने त्याच्या भावांनी त्याला एका गुलामांच्या व्यापाऱ्याला विकले. त्या व्यापाऱ्याने इल्तमशला कुतुबुद्दीन ऐबक या लाहोरच्या सुभेदाराला विकले. कुतुबुद्दीन ऐबक हा गझनीचा सुलतान महम्मद घौरी याचा सुभेदार. इल्तमशची कर्तबगारी पाहून ऐबकने प्रथम त्याला बदायुन येथे व नंतर दिल्लीचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. पुढे ऐबकचा जावई झालेला इल्तमश ऐबकच्या मृत्यूनंतर महम्मद घोरीच्या लाहोरपासून दिल्लीपर्यंत राज्यप्रदेशाचा सुभेदार झाला. तत्कालीन घोरी सल्तनतचा सुलतान शमसुद्दीन मृत्यू पावल्यावर इल्तमशने लाहोर ते दिल्लीच्या राज्यावर आपला अंमल बसवला. सुलतान इल्तमशने ऐबक वंशाचे राज्य ताब्यात घेऊन आपल्या इल्बारी वंशाचे राज्य स्थापन केले. दिल्लीचा सुलतान म्हणून त्याची कारकीर्द इ.स. १२११ ते १२३६ अशी झाली. मुलतान ते बंगाल असा राज्य विस्तार करताना इल्तमशने रणथंबोर, मंदसौर, अजमेर, बयाना, ग्वाल्हेर, उज्जैन वगरे प्रदेशही आपल्या राज्यात सामील केला. िहदुस्थानातील तुर्की साम्राज्याला बळकटी आणण्याचे काम इल्तमशने केले. कुतुबुद्दीन ऐबकशी निष्ठावंत असलेल्या इल्तमशने त्याच्या स्मरणार्थ दिल्लीत कुतुबमिनार बांधला. इल्तमशने बांधलेल्या प्रसिद्ध इमारतींमध्ये बदायुन येथील किल्ला आणि जामा मशीद हे प्रमुख आहेत. त्याशिवाय दिल्लीतील अनेक दग्रे, हज यात्रेकरूंसाठी निवासस्थाने, मशिदी बांधण्यात इल्तमशचा पुढाकार होता. इस्लामचा सर्वोच्च धर्मगुरू खलिफा याने इल्तमशला मुस्लीम राज्यकर्ता म्हणून मान्यता दिली. १२३६ साली इल्तमशच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेनुसार त्याची मुलगी रजिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानपदी आली. कुतुबुद्दीन ऐबक याने िहदुस्थानात स्थापन केलेल्या या राज्याच्या सत्ताधाऱ्यांचा वंश मामलुक वंश किंवा गुलाम वंश म्हणून ओळखला गेला.

सुनीत पोतनीस

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
Amol Kolhe
अमोल कोल्हेंची अजित पवारांविरोधात टोलेबाजी, “नटसम्राट परवडतो पण ‘खोके सम्राट’ आणि ‘पलटी सम्राट’…”
fight between Rajshree Hemant Patil and Sanjay Deshmukh in Yavatmal-Washim Lok Sabha Constituency
यवतमाळात शिवसेना विरूद्ध शिवसेनाच! १७ उमेदवार रिंगणात
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

sunitpotnis@rediffmail.com

 

टेर्रारियम

काचेच्या किंवा प्लास्टिकच्या पारदर्शक पात्रात बंदिस्त प्रकारे वाढवल्या जाणाऱ्या वनस्पती या प्रकाराला टेर्रारियम असे संबोधले जाते. मासे पाळण्यासाठीची काचेची गोलाकार पात्रे किंवा टाक्या, बरण्या आणि चक्क अरुंद तोंडाच्या बाटल्यांमधूनही वनस्पती वाढवता येतात. एखाद्या काचेच्या उथळ पात्राचा कुंडीसारखा वापर करून त्यात वनस्पती वाढविण्याच्या प्रकारास टेर्रारियम म्हणता येणार नाही. जेव्हा वनस्पतींना पारदर्शक पात्रात बंदिस्त प्रकारे वाढवतात तेव्हाच ती टेर्रारियम ठरतात. टेर्रारियमच्या काही प्रकारांत पात्राच्या आत वनस्पती वाढत असताना पात्राच्या तोंडावर आवरण नसते. पण पात्राच्या तोंडावर अगदी हवाबंद आवरण घालूनसुद्धा पात्रातील वनस्पती अनेक महिने हवाबंद पात्रातीलच उपलब्ध हवा, पाणी आणि मातीतील अन्नांश वापरून फक्त जगूच शकतात, असे नाही तर सुखेनव वाढूही शकतात.

आता हवाबंद पात्रात वनस्पती कशा जगतात, असा प्रश्न अनेकांना पडेल. ते समजून घेण्यासाठी वनस्पतीच्या पानांद्वारे चालू असणाऱ्या प्रकाशसंश्लेषण, श्वसनक्रिया आणि बाष्पीभवन यांची माहिती करून घ्यावी लागेल. वनस्पती टेर्रारियममध्ये लावताना प्रथम पात्रात खतमिश्रित माती भरतात. मातीचा थर एवढाच ठेवावा की जो मुळांना चांगला आधार देईल. पात्रात वनस्पती लावल्यानंतर माती फक्त ओलसर होईल इतकेच पाणी दिले जाते व पात्र शक्यतोवर हवाबंद केले जाते. प्रकाशसंश्लेषणासाठी पात्रातील वनस्पती उपलब्ध पाणी, कार्बन डायऑक्साईड व सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून अन्न तयार करतात. या प्रक्रियेत ऑक्सिजन उत्सर्जति केला जातो. श्वसनक्रियेत ऑक्सिजन वापरून त्याचा संयोग स्वत: तयार केलेल्या अन्नावर करून वनस्पतींची वाढ होत असते. श्वसनक्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाण्याचे बाष्प उत्सर्जति होतात. हे सर्व बंदिस्त पात्रात होत असल्याने प्रकाशसंश्लेषणात उत्सर्जति केलेला ऑक्सिजन व श्वसनक्रियेत उत्सर्जति केलेले कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे बाष्प बंदिस्त पात्रातच राहून हे आवर्तन अनेक महिने चालू राहते. कालांतराने पात्रातील उपलब्ध पाणी व कार्बन डायऑक्साईड यांचा वापर अन्नासाठी झाल्याने त्यांची वानवा भासू लागते, पण बंद पात्रात ऑक्सिजनची मात्रा मात्र वाढते. यावरूनच वनस्पती हवेत ऑक्सिजनची अविरत भरपाई करतात हे सिद्ध होते.

नंदन कलबाग (पुणे)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org