‘के.एस.रणजीतसिंह’ किंवा ‘रणजी’ या नावाने क्रिकेटविश्वात ओळखले जाणारे जामनगरचे जामश्री रणजीतसिंहजी जडेजा हे जगातील नामांकित क्रिकेट खेळाडूंपकी एक होते. रणजीत हा जामनगर राजाचा दत्तकपुत्र असूनही त्याला वारसा हक्क नाकारल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठविले. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर सन १८९० ते १८९३ या काळात केंब्रिज विद्यापीठाच्या क्रिकेट संघाकडून तो खेळला. एक निष्णात फलंदाज म्हणून रणजीतची ख्याती झाल्यावर तो ससेक्सकडून प्रथम श्रेणी काऊंटी सामने खेळू लागला. ससेक्स काऊंटीमधून सन १८९५ ते १८९७, १८९९ ते १९०४, १९०८ आणि १९१२ या काळात रणजीतने फलंदाजी केली. १८९९ ते १९०३ या काळात त्याने ससेक्सचे कप्तानपदही भूषविले. १८९९ साली एका मोसमात ३००० धावा काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात रणजीत एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. जुल १८९६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या संघातून खेळून रणजीतने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्याच्या दोन इिनग्जमध्ये त्याने ५४ आणि १५४ (नाबाद) अशी धडाकेबंद फलंदाजी केली. रणजीतसिंह एकूण १५ कसोटी सामने खेळला. या सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत. इंग्लिश क्रिकेट संघातून खेळलेला हा पहिला भारतीय पुढे ‘ब्लॅक प्रिन्स ऑफ द क्रिकेटियर्स’ या नावाने ओळखला जाऊ लागला. १९०७ साली रणजीतसिंहची जामनगर राजेपदी नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर १९३४ सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या नावाने रणजी करंडक हे भारतीय क्रिकेट संघांमधील सामने भरविणे सुरू केले. ‘रणजी ट्रॉफी’ या क्रिकेट स्पर्धा आजही त्यांची प्रतिष्ठा टिकवून आहेत. जामनगरने भारताला एकूण सहा अव्वल क्रिकेटपटू दिले आहेत. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, विनू मंकड, सलीम दुराणी, इंद्रजीतसिंह आणि अजय जडेजा.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: कापसापासून सूत निर्मिती  – भाग २
सूत निर्मितीतील कताई पूर्व प्रक्रियांमध्ये िपजण (ब्लो रूम), वििपजण (काìडग), खेंचण (ड्रॉईंग), िवचरण (कोिम्बग), वात बनविणे (रोिवग) हे विभाग येतात.
कापूस जेव्हा सूत गिरणीत येतो तेव्हा तो कापसाच्या गाठींच्या रूपात येतो. या गाठींमध्ये कापूस हा गाठी बांधण्याच्या यंत्रात मोठय़ा दाबाखाली गाठींमध्ये घट्टपणे बसविलेला असतो. याशिवाय शेतातून वेचला गेलेला कापूस गाठीमध्ये तसाच बांधला गेल्यामुळे शेतात कापूस वेचताना कापसाबरोबर काही इतर अनेक गोष्टी वेचल्या जातात. त्या गाठीतील कापसामध्ये तशाच येतात. यामध्ये कापसाच्या झाडाची वाळलेली पाने, बोंडाची देठे व कवचाचे तुटके भाग, माती व वाळू यांचा समावेश असतो. ह्य़ा पदार्थाना कापसातील कचरा असे म्हणतात.
कताईपूर्व प्रक्रियांमध्ये सर्वात प्रथम ज्या प्रक्रिया कापसावर केल्या जातात त्यांमध्ये कापसातील कचरा काढून टाकणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य असते. गाठींमध्ये कापूस घट्ट दाबून बसविला असल्यामुळे त्यातील कचराही कापसामध्ये घट्ट असा मिसळलेला असतो. त्यामुळे कापूस िपजून सल केल्याशिवाय कापसातील कचरा काढून टाकता येत नाही. त्यामुळे कताईपूर्व प्रक्रियांमध्ये पहिल्या दोन विभागांत कापूस िपजणे आणि त्याच वेळी कापसातील कचरा काढून टाकणे ही दोन काय्रे केली जातात.
िपजण : या प्रक्रियेमध्ये गाठीतील कापसाचे मोठे गठ्ठे फोडून त्यापासून लहान लहान पुंजके केले जातात. हे करीत असतानाच गाठीतील कापसात असलेल्या कचऱ्यामधील ५०% ते ७०% कचरा काढून टाकला जातो. िपजण प्रक्रिया करण्यासाठी यंत्रांची एक साखळी वापरली जाते.
वििपजण : िपजण विभागातून बाहेर पडणारा कापूस हा कापसाच्या लहान लहान पुंजक्यांच्या स्वरूपात असतो. परंतु चांगल्या दर्जाचे सूत बनविण्यासाठी कापूस पूर्णपणे िपजावा म्हणजे कापसाचा प्रत्येक तंतू एकमेकांपासून वेगळा करावा लागतो आणि कापसातील १००% कचरा काढून टाकावा लागतो. वििपजण प्रक्रियेमध्ये या दोन्ही क्रिया पार पाडल्या जातात. गाठीतील कापसामध्ये आणि सूतामधील कापसामध्ये आणखी महत्त्वाचा फरक म्हणजे गाठीतील तंतू हे सुटे सुटे आणि विस्कळीतपणे विखुरलेले असतात. तर सूतामध्ये कापसाचे एकमेकांपासून सुटे केलेले तंतू हे एका अखंड अशा पेडामध्ये जुळविलेले असतात. या पेडामध्ये हे तंतू एकमेकांस व पेडाच्या आसास समांतर असे असतात. या पेडास पीळ दिल्यावर त्याचे सूत तयार होते.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org