कृत्रिम तंतू बनविण्याच्या प्रयत्नांमधील पहिली पायरी म्हणजे बहुवारिकांपासून मानवनिर्मित तंतू बनविण्याची प्रक्रिया ही होती. नसíगक सेल्युलोज व प्रथिनांच्या बहुवारिकांपासून अनेक प्रकारचे तंतू बनवून ते बाजारामध्ये आणले गेले. परंतु अशा तंतूंना काही मर्यादेपर्यंतच यश मिळाले. पुनर्जनित तंतू नसíगक तंतूंची जागा पूर्णार्थाने घेऊ शकले नाहीत. त्याचे कारण म्हणजे या तंतूंमध्ये चांगले कपडे बनविण्यासाठी लागणारे जे गुणधर्म लागतात ते नसíगक तंतूंच्या तुलनेने खूपच कमी दर्जाचे असतात. नैसर्गिक बहुवारिकांपासून तयार केलेल्या पुनर्जनित तंतूंपासून बनविलेले कपडे नसíगक तंतूंपासून बनविलेल्या कपडय़ांपेक्षा टिकाऊपणा, चुरगाळणे, आकसणे, झिजणे, धुण्यातील सहजता अशा बाबतीत बरेच कमी दर्जाचे असतात. शिवाय या तंतूंची किंमतसुद्धा नसíगक ततूंपेक्षा काही प्रमाणात जास्त असते. या सर्वामुळे १०३० सालापर्यंत व्हिस्कोज, क्युप्राअमोनियम, व्हिस्कोजचे सुधारित तंतू यांसारख्या सेल्युलोज बहुवारिकापासून तयार केलेले तंतू तसेच नैसर्गिक प्रथिनांपासून तयार केलेले पुनर्जनित तंतू यांचा वस्त्रोद्योगातील वाटा १५ ते २० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिला आणि ८० टक्के वाटा नसíगक तंतूंचाच होता.
यामुळे निसर्गातील बहुवारिकांचा उपयोग करून नसíगक तंतूंच्या तोडीचे तंतू बनविता येऊ शकत नाहीत याबाबत शास्त्रज्ञांची खात्री झाली. त्यामुळे प्रयोगशाळेतच मूलभूत रासायनिक द्रव्यापासून बहुवारिक तयार करता येईल असे पायाभूत संयुग बनवणे आणि या संयुगापासून बहुवारिक बनवून त्यापासून तंतू तयार करणे या दिशेने जोमाने प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांना लवकरच यश आले आणि १९३० मध्ये ‘नायलॉन’ या पहिल्या संश्लेषित तंतूचा जन्म झाला. डय़ू पॉन्ट कंपनीतील अमेरिकन शास्त्रज्ञ वॅलेस कॅरोथरस याने सर्वप्रथम प्रयोगशाळेत नायलॉन तंतू तयार करण्यात यश मिळवले. हा तंतू थोडय़ाच दिवसांत अमेरिकन वस्त्रोद्योग व्यवसायात लोकप्रिय झाला. रेशीमला पर्याय म्हणून नायलॉन तंतू प्रसिद्ध झाला. नेमकी याच वेळी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि नसíगक तंतूंचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा भासू लागला आणि कपडे रेशनवर देण्याची पाळी आली. या वेळी नायलॉन तंतूने कपडय़ांच्या पुरवठय़ामध्ये मोलाची भूमिका पार पाडली.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – करारामुळे दयनीय झालेली संस्थाने
गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने इ.स. १७९८ ते १८०५ या काळात अधीनस्थ सहयोग या योजनेखाली साधारणत: शंभर राजे आणि नवाबांकडून करारावर सह्या घेऊन त्यांना कंपनी सरकारच्या अधीन करून घेतले. अशा करारावर सही करून स्वीकार करणारा हैदराबादचा निजाम हा पहिला भारतीय राज्यकर्ता होता. एक सप्टेंबर १७९८ रोजी अधीनस्थ सहयोग कराराच्या दस्तऐवजांवर निजामाने सही केल्यावर ब्रिटिशांनी प्रथम हैदराबादमधील फ्रेंच सेनाधिकारी आणि सल्लागारांना त्यांची सेवा बंद करण्यास भाग पाडले. आणि त्याऐवजी सहा महागडय़ा ब्रिटिश बटालियन्स राज्यात तनाती फौज म्हणून नियुक्त कराव्या लागल्या.
 म्हैसूरच्या टिपू सुलतानने प्रथम अधीनस्थ सहयोग कराराची स्वीकृती करण्यास नकार दिला. परंतु चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धानंतर करार मान्य करण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. अवधचा नवाब हा करार स्वीकारणारा तिसरा तर तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर बाजीराव द्वितीय हा चौथा राज्यकर्ता होता.
या प्रकारच्या अधीनस्थ सहयोग किंवा दुय्यम सत्ताधिकार युतीला ब्रिटिशांनी ‘सबसिडिअरी अलायन्स’असे गोंडस नाव दिले. परंतु कराराच्या अत्यंत जाचक कलमांमुळे व सन्यावरील नियंत्रण न राहिल्यामुळे या स्वाधीन होऊन अधीन झालेल्या संस्थानांची किंवा रियासतींची स्थिती अत्यंत असंतोषजनक आणि केविलवाणी झाली. संस्थानांच्या राज्यक्षेत्रांच्या सीमा घटल्या आणि स्वातंत्र्य कमी होऊन सामथ्र्य क्षीण होत गेले. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले बनल्यामुळे राजे, नवाब हे केवळ नामधारी सत्ताधारी बनून राहिले.
१८५८  साली कंपनी सरकारने भारतातील आपला गाशा गुंडाळून सर्व कारभार ब्रिटिश राजवटीकडे म्हणजेच पर्यायाने ब्रिटिश साम्राज्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर भारतीय प्रदेश औपचारिकरीत्या १८७६ साली ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा भाग म्हणून ओळखला जाऊ लागला. तसा कायदाही ब्रिटिश गव्हर्न्मेंटतर्फे आणि हाउस ऑफ कॉमन्समध्ये मंजूर करण्यात आला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com