उत्तर इराणमधील तेहरान हे शहर इराणच्या इस्लामी प्रजासत्ताक सरकारची राजधानी आणि तसेच तेहरान प्रांताचीही राजधानी आहे. नव्वद लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले तेहरान जगातील एकोणिसाव्या क्रमांकाचे मोठे शहर समजले जाते. इ.स.पूर्व १५०० मध्ये या ठिकाणी मेडेस या जमातीने प्रथम वस्ती केल्याची नोंद आहे. पíशया हे इराणचे मूळ नाव. सायरस द ग्रेट या पíशयन राजाने स्थापन केलेल्या साम्राज्यात सव्वा दोनशे वष्रे तेहरान समाविष्ट होते. तेहरानवरील पुढे झालेल्या सत्तांतरांमध्ये अलेक्झांडर, सेल्यूसिड, पाíशयन वंश आणि सेसनियन वंश यांचा अंमल झाला. त्यानंतर तेहरान ६४१ साली अरब मुस्लीमांच्या हातात पडले. आठव्या शतकाच्या मध्यावर तेहरान हे एक जागतिक महत्त्वाचे वैज्ञानिक आणि सांस्कृतिक केंद्र समजले गेले. तेहरान आणि संपूर्ण पíशयाच्याच सुपीक जमिनीमुळे संपन्न झालेल्या त्या प्रदेशावर बाराव्या शतकात मंगोल आक्रमकांनी तेहरान आणि आसपासचा प्रदेश हल्ले करून उद्ध्वस्त केला. पुढे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस या प्रदेशात स्थापन झालेल्या सेफवीद वंशाच्या कारकीर्दीत तेहरानमध्ये शिया पंथीय इस्लाम धर्माचा मोठा प्रसार झाला. १७९४ ते १९२५ या सव्वाशे वर्षांत इथे कजार घराण्याचे राज्य होते. १९२१ साली रजा खान याने तत्कालीन कजार राजवटी विरोधी केलेला उठाव यशस्वी होऊन १९२५ मध्ये रजा खानाची राजवट तेहरानवर आली. रजा तेहरानचा शाह होऊन त्याच्या रजा शाह पहलवी घराण्याची कारकीर्द इ.स. १९२५ ते १९७९ अशी झाली. दुसर्या महायुद्धानंतर शाह मोहम्मद रजा पहेलवी याने तेहरानमध्ये पाश्चिमात्यीकरण आणण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे इस्लामी धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक आंदोलनाला घाबरून मोहम्मद रजा परदेशात पळून गेला. जानेवारी १९७९ मध्ये धर्मगुरू अयातोल्ला खोमेनी सत्तेवर येऊन त्याने पíशयात इस्लामी प्रजासत्ताक स्थापन केले. स्त्रियांनी बुरखा घेणे त्याने सक्तीचे करून संगीत, नृत्य, मद्यप्राशन यांवर बंदी यांसारख्या इस्लामी परंपरा पाळण्याची सक्ती तेहरानमध्ये लादली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

बाटलीतील बगीचा

अनेक जण बॉटल गार्डन व टेर्रारियम ह्य़ातील फरक समजू शकत नाहीत. सर्वच बॉटल गार्डन टेर्रारियम असतात, पण सर्वच टेर्रारियम बॉटल गार्डन नसतात. जेव्हा बाटलीच्या आत वनस्पती वाढविल्या जातात तेव्हाच त्यांना बॉटल गार्डन म्हणतात. एक प्रश्न विचारला जातो की बाटलीच्या छोटय़ाशा तोंडातून हात आत न घालता रोपे कशी लावतात. त्यासाठी लांब चिमटा वापरला जातो. प्रस्तुत लेखकाने स्वत:च छत्र्यांच्या काडय़ा वापरून रोपणासाठी चिमटा, माती उकरण्यासाठी ट्रॉवेल, मुळांजवळ माती दाबण्यास व सुकलेली पाने कापण्यास अवजारे तयार केली आहेत.

पूर्वी रसायने साठवण्यासाठी काचेचे मोठे बुधले मिळत; हल्ली ते दुर्मीळ झाले आहेत. मोठय़ा बुधल्यात अनेक झाडे लावून बागसदृश देखावे करता येतात. बुधला मिळाला नाही तरी लहान बाटलीतही एखादे रोप सहज लावता येते. आता प्रश्न असा की कसल्याही अवजाराशिवाय बाटलीत रोप लावता येईल का?  कसे ते पुढे पाहू.

बागकामाची माती दोन भाग, शेणाचे किंवा पालापाचोळ्याचे खत एक भाग आणि वाळू किंवा कोकोपीट अर्धा भाग असे मिश्रण करा. पाण्यात बुरशीनाशक मिसळून त्या पाण्याने मिश्रण भुसभुशीत ओलसर होईल इतकेच भिजवावे. कोरडे मिश्रण बाटलीत भरताना धूळ उडून बाटलीच्या आतल्या भागावर धूळ बसून पारदर्शीपणा कमी होतो. लांब चिमटय़ाने रोप बाटलीत लावून घ्यावे. चिमटा नसला तर रोप बाटलीत टाकून द्यावे. परत बुरशीनाशक मिश्रित थोडेसे पाणी बाटलीत घालून बाटलीला झाकण लावावे. बाटलीतील दमट वातावरणामुळे रोप जगून त्याची वाढ होताना ते आपोआप उभे वाढते. बाटली भरपूर उजेड असलेल्या जागी ठेवावी. जोपर्यंत पाण्याअभावी रोपे मरगळत नाहीत. तोपर्यंत परत पाणी देण्याची गरज नसते. कमीत कमी सहा महिने ते एक वर्षांपर्यंत रोप परत पाणी न देता सुदृढ वाढू शकते. दोन-तीन महिन्यांतून एकदा बाटली तासभर उघडी ठेवावी; ज्याद्वारे बाटलीतील कार्बन डायऑक्साइडची कमतरता भरून निघेल. रोपे सावलीत वाढणारीच निवडावीत.

नंदन कलबाग (पुणे)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org