‘वार’ म्हणजे गाय/म्हशीच्या गर्भाशयातील वासराच्या किंवा रेडकाच्या संरक्षणासाठी आणि त्याला आहार पुरवण्यासाठी गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव. ही वार (जार) पातळ, चिकट, ताकदवान व पारदर्शक स्नायूंनी बनलेली असते. यामध्ये तीन आवरणे असतात. १२० ते १३४ मांसल गोळ्यांनी ही आवरणे गर्भाशयाला चिकटलेली असतात.
गाय/म्हैस व्यायल्यानंतर वार तीन ते चार तासांत संपूर्णपणे बाहेर पडणे आवश्यक असते. आठ ते नऊ तासांत वार पडली नाही, तर पुढच्या एक-दोन तासांतच (म्हणजे व्यायल्यापासून १० ते ११ तासांतच) निष्णांत पशुवैद्यकाकडून ती काढून घ्यावी लागते. वार हाताने काढल्यास, पोटातून वा इंजेक्शनद्वारे किमान तीन दिवस गर्भाशयातसुद्धा औषधपाणी करणे गरजेचे असते.
 वार आपसूक पडल्यास गर्भाशयात गोळ्या बसवून घेणे योग्य नसते. त्याने गर्भाशयाच्या आंतरपडद्याला इजा होते. गायीचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते.
वार न पडता लोंबत असेल, तर कावळा, उंदीर, कुत्रा, मांजर हे प्राणी ती ओढणार नाहीत, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. लोंबणारी वार पडण्यासाठी तिला कोणतीही जड वस्तू बांधणे अयोग्य आहे. वार अडकू नये म्हणून, गाय विण्यापूर्वी ४५ दिवस तिची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. वारेची योग्य काळजी घेतल्यास, गाय/म्हैस पुढे नियमितपणे माजावर येते व गाभण राहते. या क्रिया त्रासदायक होत नाहीत.
विण्याच्या वेळी गाय/म्हैस अशक्त असेल, त्या निरोगी नसतील, त्यांच्यात कॅल्शियम, िझक, फॉस्फरस या खनिजांची कमतरता असेल तर त्यांच्या गर्भाशयाची हालचाल (आकुंचन/ प्रसरण) कमी प्रमाणात होते व त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाचे स्नायू जास्त ताणले जातात व विताना त्यांना त्रास होतो. वासरू/ रेडकू बाहेर काढण्यासाठी त्यांच्या गर्भाशयात हात घातला असेल, काही संसर्गजन्य आजारामुळे वार चिकटून बसली असेल, गर्भपात झाला असेल, कासदाह झाला असेल किंवा विण्यापूर्वी अस्वच्छता असेल, तर व्यायल्यानंतर वार अडकू शकते.

जे देखे रवी..  – ज्ञानेश्वरांचे चित्र
एकदा एक ओळखीचे गृहस्थ भेटले आणि मतभेद झाल्यावर म्हणाले, ‘डॉक्टर हे तुमचे वागणे तुमच्या ज्ञानेश्वरांवरच्या भक्तीशी जुळत नाही.’ ज्ञानेश्वरांबद्दल ज्या अनेक गैरसमजुती आहेत त्यातला हा एक प्रकार. हे मानसिक घोटाळे होण्याचे एक कारण त्यांचे प्रचलित आणि लोकमानसात बिंबलेले छायाचित्र.
ज्ञानेश्वर कसे दिसत हे कोणालाच माहीत नाही. चित्रपटात अनेक वर्षांपूर्वी शाहू मोडक या देखण्या नटाने ज्ञानेश्वरांचे काम केले आणि मुळगावकर आणि दलाल या सुप्रसिद्ध कलाकारांनी त्यांची छायाचित्रे काढली. युद्धाला प्रवृत्त करणाऱ्या गीता नावाच्या आपल्या संचितावर ज्ञानेश्वरांनी सांगितले त्यानंतर आपण त्यांना माऊली असे नाव ठेवले आणि या एका चित्राला आपण बिलगलो. ज्ञानेश्वर अकाली गेले हे गृहित धरले तरी या चित्रामुळे थोडी गफलत होते हे नक्की.
 ज्ञानेश्वरांनी लिहिले ते जगाच्या इतिहासात असामान्यच. ज्ञानेश्वरांनी शांतपणे लढायलाच सांगितले आहे मग त्यात तुकारामांचे ‘रात्र आणि दिवस दोन्ही वेळेला चालणारे युद्ध जे मनात चालते’ तेही आलेच. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले वाचताना खरे तर त्यांची कोणतीही प्रतिमा मनासमोर उभी राहत नाही. माझ्यातरी राहिली नाही.
माझा ज्ञानेश्वरांबरोबर जो संवाद होतो त्यात ते माझ्यामागे तरी उभे असतात किंवा पाठमोरे असतात. क्वचित हसतात पण ते स्मित. सगळा चेहरा दाखवत नाहीत. ज्ञानेश्वरी उतारवयात वाचण्याची प्रथा झाली आहे. त्यामुळे फक्त आपल्या गतआयुष्याचा उलगडा होतो. आयुष्याला माणूस भिडतो तेव्हा जर ज्ञानेश्वरी वाचली तर मग हे जग जास्त स्पष्ट दिसतेच, परंतु स्वत:चीही ओळख होते आणि पटते. आपण मग एक नाटकातले पात्र होतो. पहिल्यापहिल्यांदा prompting लागते, मग नाटक हळूहळू विनासायास आपल्या स्वभावाप्रमाणे वठते. नाटकातली पात्रे जसे नाटक घरी घेऊन जात नसावीत तसे आपले होते.  पुण्याचे सुप्रसिद्ध सरदेसाई डॉक्टर औषधांच्या यादी खाली दररोज ज्ञानेश्वरी वाचावी असे लिहितात. कारण औषध घेणाऱ्याला स्वत:ची ओळख व्हावी हाच हेतू असावा परतत्त्वाचा शोध त्यानंतर. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हेच खरे.  खरे तर तेवढेच मला तरी पुरले.  शेवटी परतत्त्व परके नसते ते आपल्यातच असते. आणि ज्ञानेश्वर एक फार बहुरूपी व्यक्तिमत्त्व आहे. माणसाचा स्वभाव, त्याचा समाज, व्यवहार, निसर्ग, लपत लपत सांगितलेले पदार्थ विज्ञान आणि निखळ तत्त्वज्ञान यांचे एक अफाट आणि असामान्य चित्र त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. त्याबद्दल उद्यापासून.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी

वॉर अँड पीस     – क्षय : भाग ३
अनुभविक उपचार – १) ताप – हे प्रमुख लक्षण असताना ल. मा. वसंत ६ गोळ्या, सुवर्णमालिनी वसंत १ गोळी, लक्ष्मीनारायण ३, ज्वरांकुश ६ अशा १६ गोळय़ा २ वेळा मध तुपाबरोबर घेणे.  २) खोकला – हे प्रमुख लक्षण असल्यास अभ्रकभस्म ६० मि. ग्रॅ., चौसष्ट पिंपळी चूर्ण, अस्सल वंशलोचन चूर्ण व खोकला चूर्ण प्रत्येकी पाव ग्रॅम असे एकत्र घोटावे. त्याचे चाटण पुन: पुन्हा मधातून घ्यावे. रात्री झोपू न देणाऱ्या खोकल्यावर त्यांचा विशेष उपयोग होतो. खोकला काढा अधिक चौसष्ट पिंपळी चूर्ण असे मिश्रण ४ चमचे समभाग पाण्याबरोबर २-३ वेळा घ्यावे. खोकला दीर्घकाळचा असल्यास, कशानेही थांबत नसल्यास भृंगराजासव ४ चमचे समभाग पाण्याबरोबर दोन्ही जेवणानंतर घ्यावे. खोकला कोरडा असल्यास एलादिवटी रोज ६-१२ गोळ्या चघळाव्यात. ३)अरूचि – हे प्रमुख लक्षण असल्यास आमलवदि चूर्ण पाव ते अर्धा चमचा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूप मिसळून घ्यावे. जेवणानंतर प्रवाळ पंचामृत व अम्लपित्तवटी ३ गोळ्या २ वेळा घ्याव्यात. ४) थुंकीतून रक्त पडणे – हे लक्षण असल्यास लाक्षादिघृत सकाळ – सायंकाळ २ चमचे घ्यावे. सोबत प्रवाळ, शंृग, लाक्षादिगुग्गुळ प्र. ३ गोळ्या २ वेळा घ्याव्या. ५) स्वरभंग – हे प्रमुख लक्षण व त्याबरोबर खोकला, थकवा असल्यास एलादिवटी एकेक करून १०-१२ गोळ्या चघळाव्यात. त्याबरोबर किंचित चौसष्टपिंपळी चूर्ण, शृंगभस्म, सुवर्णमाक्षिकादि प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. वासापाक ३ चमचे दोन वेळा घ्यावा. ६) पांडुता, दुबळेपणा – ही लक्षणे असल्यास चंद्रप्रभा, लक्ष्मीविलास सुवर्णमाक्षिकादि, शंृगभस्म प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. ७) वजन सतत घटत असल्यास, भूक लागत नसल्यास – आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ प्र.३ गोळ्या २वेळा, जेवणानंतर कुमारीआसव, फलत्रिकादि, पिप्पलादिकाढा, पंचकोलासव यातील १ वा अधिक काढे ४ चमचे समभाग पाण्यासह घ्यावे. ८)आतडय़ाचा क्षय – शंका असल्यास प्रवाळ पंचामृत, अम्लपित्तवटी प्र. ३ गोळ्या २ वेळा जेवणानंतर घ्याव्यात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –   १९ जुलैह्ण
१३०९> संत नामदेवांचे गुरू, संत विसोबा खेचर समाधिस्थ (श्रावणशु.११, श.१२३१).
१९३१> लेखक, समीक्षक मधुकर सुदामा पाटील यांचा जन्म. ‘कवीमन: स्वरूप व शोध, ज्ञानेश्वर व तुकारामांच्या संदर्भात’ या त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठात उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले. ‘दलित साहित्य’ ‘भारतीयांचा साहित्यविचार’, ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’ तसेच बालकवी, सदानंद रेगे, इंदिरा यांच्या काव्याचा वेध घेणारे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
१९३८> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक जयंत विष्णु नारळीकर यांचा जन्म. ‘यक्षांची देणगी’ या विज्ञानकथा संग्रहानंतर ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’ या विज्ञानकादंबऱ्या तसेच ‘गणितातल्या गमतीजमती’, ‘खगोलाचे विश्व’, ‘आकाशाशी जुळले नाते’ आदी पुस्तके व ‘चार महानगरांतील माझे विश्व’ हे आत्मवृत्त त्यांनी लिहिले आहे.
१९९३> प्रख्यात समीक्षक, वक्ते, साहित्यिक व ‘अश्मसार’ नावाने राजकीय लिखाण करणारे धोंडो विठ्ठल देशपांडे यांचे निधन. ‘महाभारत आणि गीता’, ‘व्यक्तिनीती की समूहनीती’, ‘मला दिसलेली नाटके’ यांखेरीज मर्ढेकर आणि जीए यांच्याबद्दल महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले.
– संजय वझरेकर