विल्यम क्रुक्स आणि क्वॉड-ऑगस्ट लॅमी यांनी १८६१ साली सल्फ्युरिक आम्ल निर्मिती प्रक्रियेत जो गाळ जमा होतो त्यातून थॅलिअम हे मूलद्रव्य शोधून काढले. १८६० सालच्या सुमारास खनिजे आणि रासायनिक उत्पादिते यांतील घटक निश्चित करण्यासाठी ज्योत-पंक्तिमापी (फ्लेम स्पेक्ट्रोस्कोपी) ही पद्धत प्रचलित झाली होती. या पद्धतीचा वापर करून क्रुक्स हे सल्फ्युरिक आम्लाच्या भट्टीत जो गाळ शिल्लक राहतो त्यामध्ये टेलुरिअम हा धातू शोधण्याचा प्रयत्न करीत होते. या गाळाला ज्योतीवर उष्णता देत असताना त्यांना हिरव्या रंगाची रेषा दिसून आली, जी त्यांना अपेक्षित नव्हती. त्यांच्याजवळ असलेल्या गाळात एखादे नवीन मूलद्रव्य असावे याची त्यांना खात्री पटली आणि या हिरव्या रेषेवरून क्रुक्स यांनी ‘थॅलिअम’ हे नाव सुचविले.

ग्रीक भाषेत थॅलिअम या शब्दाचा अर्थ ‘हिरवी फांदी’ असा होतो. १८६२ साली क्रुक्स यांनी हा धातू भुकटीच्या स्वरूपात मिळविला आणि त्याची काही संयुगे तयार केली.

Marathi JokeMarathi Joke
हास्यतरंग : इंग्रजीचं पुस्तक…
vam fish curry recipe in marathi
कोकणी पद्धतीने बनवा ‘वाम माशाचे झणझणीत कालवण’; ही घ्या सोपी रेसिपी
How sugar sakhar and chini get its name
Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…
The movie Swatantryaveer Savarkar Actor Randeep Hooda Marathi language
‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा..’

योगायोगाने लॅमी यांना अशाच प्रकारे गाळाला ज्योतीवर उष्णता देत असताना हिरव्या रंगाची रेषा दिसून आली. त्यांनी या गाळापासून नवीन मूलद्रव्य मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. लॅमी यांच्यापाशी गाळ अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांनी थॅलिअमच्या वेगवेगळ्या संयुगांचा अभ्यास तर केलाच, तसेच थॅलिअमच्या संयुगांचे विद्युत अपघटन करून त्यापासून थॅलिअम धातूही मिळविला.

थॅलिअम धातू जस्त या धातूप्रमाणे दिसतो. कक्ष तापमानाला हा धातू वर्धनीय असून चाकूने त्याचे तुकडे करता येतात. थॅलिअम धातू सारखा चकाकणारा असला, तरी हवेत उघडा ठेवला असता त्यावर निळसर-राखाडी रंगाची झाक येते. म्हणून तो तेलात बुडवून ठेवतात. पाणी आणि हवा यांच्या सान्निध्यात दीर्घकाळ राहिल्यास थॅलिअम-हायड्रॉक्साइडचे द्रावण बनते. थॅलिअम धातूची एकूण समस्थानिके २५ असली तरी त्यातील थॅलिअम-२०३ आणि थॅलिअम-२०५ ही समस्थानिके स्थिर आहेत.

निसर्गात थॅलिअम बहुधा पोटॅशिअमयुक्त खनिजांसमवेत सापडतो. परंतु त्यांपासून थॅलिअम मिळविणे आíथकदृष्टय़ा फायद्याचे नसते. तांबे, शिसे, जस्त आणि इतर धातूंच्या सल्फाइड धातुकांमध्ये थॅलिअम कमी प्रमाणात आढळते. क्रुकेसाइड, हचिन्सोनाइट आणि लोरँडाइट ही थॅलिअमची खनिजे तसेच पायराइट म्हणजे आयर्न सल्फाइड हे खनिज थॅलिअमचे मुख्य स्रोत आहेत.

– विजय ज्ञा. लाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org