पॉलिस्टर तंतूच्या नावावरूनच त्याची रासायनिक रचना समजते. ईस्टर हे संयुग सेंद्रिय आम्ल व अल्कोहोल यांच्या रासायनिक क्रियेमधून तयार होते. अशा ईस्टर संयुगाचे बहुवारिकीकरण केले असता पॉलिस्टर हे बहुवारिक मिळते. आणि अशा बहुवारिकापासून पॉलिस्टर तंतूची निर्मिती होते. परंतु ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कोणतेही सेंद्रिय आम्ल व अल्कोहोल घेऊन पॉलिस्टर तंतू करता येत नाही. त्यासाठी एक विशिष्ट आम्ल आणि एक विशिष्ट अल्कोहोल लागते. आणि त्यांचाच शोध लावायला संशोधकांना १० वर्षांपेक्षा अधिक काळ संशोधन करावे लागले. खरे तर नायलॉन तंतू विकसित करणाऱ्या कॅरोथर्स आणि त्याच्या सहकारी संशोधकांनी सुरुवातीला पॉलिस्टर बहुवारिकांवरच लक्ष केंद्रित केले होते. कॅरोथर्सच्या हे लक्षात आले होते की सेंद्रिय आम्ल (कारबॉक्सिल आम्ल) व अल्कोहोल यांच्या रासायनिक प्रक्रियेने तयार होणाऱ्या ईस्टर या संयुगाचे बहुवारिकीकरण करून त्यापासून तंतू तयार केला जाऊ शकतो. परंतु ज्यापासून चांगल्या प्रतीचा तंतू बनविता येईल असे पॉलिस्टर बहुवारिक शोधून काढण्यात त्यांना यश आले नाही म्हणून त्यांनी पॉलिस्टर तंतूवरील संशोधन थांबविले आणि पॉलीअमाइड बहुवारिकांवर लक्ष केंद्रित केले आणि नायलॉन तंतू विकसित केला. इंग्लंडमधील इम्पिरियल केमिकल कंपनीमध्ये (आय.सी.आय.) काम करणाऱ्या संशोधकांच्या समूहाने, ज्यामध्ये जे. आर. व्हिनफील्ड, जे. टी. डिकसन, डब्ल्यू. के. ब्रिटव्हीस्टल आणि सी. जी. रिट्ची यांचा समावेश होता, १९३९ पासून कॅरोथर्सचे पॉलिस्टरवरील संशोधनाचे काम पुढे चालू केले आणि १९४१ मध्ये पहिला पॉलिस्टर तंतू बनविला. या तंतूचे त्यांनी ‘टेरिलीन’ असे नाव ठेवले. डय़ू. पॉन्ट कंपनीने आय.सी.आय. या कंपनीकडून पॉलिस्टरच्या संशोधनाचे सर्व हक्क विकत घेतले आणि संशोधन पुढे चालू ठेवले. डय़ू पॉन्ट कंपनीने १९४६ मध्ये नवीन पॉलिस्टर तंतू बनविला आणि त्याचे नाव डॅक्रॉन असे ठेवले. टेरिलीन, डेक्रॉन, टेरीन इत्यादी. ही सर्व उत्पादक
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – भूपिंदरसिंगांचे अफाट खर्च!
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय संस्थानिकांना डोक्यावर राजमुकुट परिधान करण्यास करारान्वये बंदी घातली होती. मुकुट वापरणे ही तर प्रतिष्ठेची बाब. त्यामुळे हे संस्थानिक मुकुटाचे काम रत्नजडीत पगडी, फेटा आणि त्यावर हिर्यामोत्यांचा शिरपेच वापरून भागवीत. मुकुट परिधान करण्याचा अधिकार फक्त ब्रिटनच्या सम्राट आणि साम्राज्ञीलाच होता. एकदा बुशेराँ या प्रसिद्ध जवाहिऱ्याकडे पतियाळाचे महाराजा भुिपदरसिंग त्यांच्या गुलाबी फेटे बांधलेल्या वीस सेवकांसह आले. सेवकांच्या हातात हिरे आणि रत्नांनी भरलेल्या सहा पेटय़ा होत्या. या पेटय़ांमध्ये असलेले ७५५० हिरे, १४३० पाचू आणि इतर असंख्य मोती महाराजांनी बुशेराँला देऊन आपल्या मुकुटवजा पगडीवर सोन्याच्या तारांनी हिऱ्या मोत्यांच्या माळा आणि वर ऐटबाज शिरपेच लावून घेतला. स्वतसाठी मोत्यांचा १४ पदरांचा हार, स्त्रियांचा डोक्यावर लावण्याचा मुकुटासारखा दागिना, कंबरपट्टे, हार इत्यादी १८ दशलक्ष फ्रँक किमतीचे जडजवाहर करून घेतले. पुढे इतर अनेक संस्थानिक आपले जडजवाहर काíतए आणि बुशेराँ यांच्याकडून करून घेऊ लागले. १९११ साली ब्रिटिश सम्राटाचा दिल्ली दरबार भरला असता महाराणी भस्तावार कौरने राणी मेरीला भारतीय स्त्रियांतर्फे अत्यंत मौल्यवान असा हिऱ्यांचा हार भेट दिला.
महाराजा भुिपदरसिंग हे पहिले भारतीय विमान मालक होते. १९ व्या शतकाच्या अखेरीस त्यांनी इंग्लंडमधून हे विमान खरेदी केले. या महाराजांचे सर्वच अफाट! महाराजा भुिपदरसिंगांनी १९२२ साली तयार करून घेतलेला एक डिनर सेट अलीकडेच १७ कोटी रुपयांना विकला गेला. १४०० विविध वस्तूंचा व एकूण ५०० किलो वजनाचा हा संच प्रिन्स एडवर्ड ऑफ वेल्स (हे पुढे राजे एडवर्ड आठवे झाले) हे पतियाळात आले तेव्हा , एकदाच वापरला गेलेला हा डिनरसेट लंडनच्या गोल्डस्मिथ्स अँड सिल्व्हरस्मिथ्स कंपनीने पतियाळाच्या राजचिन्हासह बनविला होता.  
पुढे लंडनच्या ख्रिस्तीज लिलावगृहाने हा सेट विक्रीस काढला तेव्हा, त्यास १३ लाखांच्या अंदाजित किमतीऐवजी १९ लाख पौंडांची (१७ कोटी रु.) बोली मिळाली !
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com