श्वास घेणं हे नाकाचं महत्त्वाचं काम. या श्वासामुळेच विविध वास मेंदूपर्यंत जाऊन पोहचतात. प्राण्यांच्या नाकाचा विचार केला तर लक्षात येईल की ते नाकाचा वापर स्वसंरक्षणासाठी करतात. आसपास कोणता धोकादायक प्राणी वावरतो आहे का, हे प्राण्यांना वासावरून कळतं. कुत्र्यांमधली वास घेण्याची क्षमतादेखील इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते. म्हणूनच ते गुन्हेगारांना पकडतात, घराच्या वासावरून ते घर शोधत येतात.

आदिमानवाने धोकादायक परिसराचा, शिकारी प्राण्यांचा वास घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग पत्करला असणार. आज होमो सेपियन्समध्ये म्हणजे आपल्यामध्ये वास घेण्याची क्षमता वाढली असल्याचं संशोधनातून दिसून येतं. पण ‘आपण या क्षमतेचा पुरेपूर वापर करत नाही.’ असं शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन म्हणतात.

Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

चार्ल्स विसोकी यांनी वर्तन आणि वास घेण्याची क्षमता यावर संशोधन केलं आहे. ते म्हणतात, कॉफीच्या वासाची एक ओळख मेंदूत निर्माण झालेली असते. या वासात शंभरेक प्रकारचे रेणू असतात. आपल्याला हवी तशी कॉफी झाली असेल तर वासावरूनच आपण ‘आहा ऽ’ म्हणतो. लहान मुलांना भरवताना चमचा तोंडाजवळ नेल्यावर त्या पदार्थाचा वास आवडला नाही तर मुलं तो चमचा आपल्या हाताने बाजूला करतात. एखादं औषध घेताना वासाचा तिटकारा आला तर औषधापासून लांब पळतात.  एखाद्या वस्तूचा, फुलांचा, फळांचा, खाद्यपदार्थाचा वास त्या वस्तूविषयीची बरीच नवी माहिती पुरवत असतो. ही माहिती ऑल्फॅक्टरी सिस्टिमपर्यंत पोहोचते.  एखाद्या टाल्कम पावडरचा वास नवजात बाळाच्या आठवणीपर्यंत नेतो. ज्यांना विशिष्ट वासाने मळमळतं त्यांना त्या वासाशिवाय, नुसत्या आठवणीनेही मळमळायला लागतं. कारण ऑल्फॅक्टरी सिस्टिम आणि भावनांचं केंद्र असलेली लिंबिक सिस्टिम एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या गंधांच्या स्मृती मेंदूत कायम टिकून राहतात.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com