पृथ्वीवर असे अनेक भाग आहेत जेथे वर्षभरात २५० मिलिमीटरसुद्धा पाऊस पडत नाही. जोडीला दिवसा ५० अंशापर्यंत पोहोचणारी गरम हवा आणि रात्री ५ अंशाला उतरणारे तापमान. अशा ठिकाणी वैराण प्रदेश तयार होतात. पृथ्वीवरील २५ टक्के जमीन वैराण आहे. अमेरिकेतील डेथ व्हॅली समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे, तर अनेक उंच पर्वतही वैराण आहेत. अशा कठीण परिस्थितीतही अनेक वनस्पती-प्राणी अनुकूलन करून जगतात. त्यांची विविधता पर्जन्यवनातील जैववैविध्याच्या पाठोपाठ आहे. पाऊस थोडा असला तरी एकदम पडतो. दिवस-रात्रीच्या विषम तापमानामुळे वादळवारे नेहमीचेच. वनस्पती आणि प्राणी अशा टोकाच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे असल्याने तेथे तग धरू शकतात.

वनस्पतींची वाढ खुरटी, जमिनीवर एक-दोन मीटर उंच. जमिनीखाली मात्र मुळे पाण्याच्या शोधात खोलवर पोहोचणारी. राजस्थानात वाढणाऱ्या खेजडीची मुळे सहज ७-८ मीटर खोल पोहोचतात. एक-दोन मीटर उंचीच्या खेजडीच्या झाडाची मुळे जमिनीत ४३ मीटर पसरलेली असल्याची नोंद आहे. थोडय़ा वेळात पडणारा मोठा पाऊस जमिनीत मुरण्याआधी शोषून घेण्यासाठी लेप्तडेनिया आणि बोऱ्हाविया झुडपांची मुळे तीन-चार मीटर दूपर्यंत पसरलेली पुष्करच्या वाळूत पाहण्यात आली आहेत.

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?
Uran, Mango Trees Burn, Forest Fire, chirner, Farmers, Demand Compensation, Hundreds of Trees, marathi news,
उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख

शोषलेले पाणी बाष्पोच्छ्वासाने हवेत जाऊ नये म्हणून झाडाच्या वाढीचा माफक वेग, लहान पाने, श्वसनरंध्रे खोलवर, त्यावर रक्षक रोम व मेणाची कमान मांसल पाना-खोडांत पाण्याची साठवण यामार्फत मिळालेले पाणी वनस्पती सांडू देत नाहीत. वाऱ्यामुळे वाळू उडल्यावर उघडी पडलेली मुळे बुचाच्या आवरणामुळे सुकून जात नाहीत आणि उडालेली गरम वाळू झुडपावर पडल्यास लहान पानांमधून जमिनीवर पडते, झुडूप गुदमरत नाही.

आफ्रिकेतील सहारा वाळवंट सपाट असून खडक आणि वाळूचे, समुद्रापासून दूर, कोरडे आहे. मध्य आणि उत्तर अमेरिकेतील वाळवंटे, खंडांच्या स्थलांतरामुळे डोंगर-दऱ्यांची आहेत. आफ्रिकेतील नमिब आणि चिलीतील अटाकामा वाळवंटे समुद्राजवळ आहेत. ऑस्ट्रेलियातील वाळवंटात लोकसंख्या चौ. किमी.मध्ये एक इतकी कमी, तर दक्षिण आशियातील थर वाळवंटात सर्वात जास्त लोकवस्ती आहे.

जैवविविधतेच्या आणि उत्क्रांतीच्या अभ्यासकांना वैराण प्रदेश बरेच काही शिकवतात. थरच्या वाळवंटात आणखी कालवे काढून पाणीपुरवठा वाढवला तर जैववैविध्याचे काय होईल?

प्रा. शरद चाफेकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

मॅग्झिम गॉर्की

मॅग्झिम गॉर्की या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या, रशियन सोव्हिएत संघातील महान साहित्यिकाचे मूळ नाव अलेक्सेई मॉक्झिमोविच पेश्कोव असे होते. मॉस्कोजवळच्या नोव्होगोरोद येथे १८६८ साली जन्मलेल्या मॅग्झिमची ओळख केवळ एक महान साहित्यिक एवढय़ापुरती मर्यादित नसून लेनिन यांच्या नेतृत्वाखालील रशियन क्रांतीतील कृतिशील साहित्यिक कार्यकर्ता अशीही आहे. या चतुरस्र लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या विविध घटनाही रोमांचकारी आणि चकित करणाऱ्या आहेत. बालपणीच आईवडिलांचे छत्र हरपल्यावर वयाच्या दहाव्या वर्षांपासून मॅग्झिमने उपजीविकेसाठी मिळेल ते काम केले. त्यामध्ये हमाली, चर्मकाराकडे नोकरी, उकिरडय़ांवरचे कागद, चिंध्या विकणे, माळीकाम, बेकरीत पाव भाजणे, रखवालदार इत्यादी होते. बोटीवरील आचाऱ्याचा मदतनीस म्हणून काम करताना आचाऱ्याकडील गोगोल, वॉल्टर, ग्लेब, स्कॉट यांची पुस्तके वाचून मॅग्झिमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. तत्कालीन झारच्या जुलमी, एकतंत्री कारभाराविरुद्ध समाजात खदखदणारा असंतोष आणि राजवटीविरुद्ध उठाव करणारे कामगार क्रांतिकारक यांच्याकडे मॅग्झिम आकर्षति झाले. त्यांनी प्रथम वृत्तपत्रातून लिहिलेले स्तंभलेखन आणि लेखांनी वाचकांच्या मनाची पकड घेतली. पुढे त्यांनी लिहिलेली ‘दाचनिकी’, ‘मेश्चान्ये’ ही नाटके गाजली. मॅग्झिमची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणजे ‘मात्’ (मदर) ही कादंबरी. एका साध्या कामगाराचे कडव्या क्रांतिकारक नेत्यात झालेले परिवर्तन आणि त्याच्या अडाणी, बुजऱ्या आईचे कडव्या क्रांतिकारिकेत झालेले परिवर्तन असा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. या कादंबरीचे मराठीसह अनेक भाषांत अनुवाद होऊन तिच्या लाखो प्रती खपल्या. या कादंबरीने जगभरातल्या असंख्य कामगारांनाही स्फूर्ती दिली. ‘मात्’, ‘द मॅग्नेट’, ‘ए कन्फेशन’ वगरे १४ कादंबऱ्या, आठ लघुकथा संग्रह, १६ नाटके, १० निबंध अशी त्यांची साहित्य संपदा होती. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि क्रांतिकार्याचा प्रचार करीत मॅग्झिम गॉर्की खेडय़ापाडय़ांतून िहडले. या काळात मार्क्‍सवादाचाही ते प्रचार करीत होते. १८९८ ते १९०५ या काळात झारच्या नाराजीमुळे मॅग्झिमनी अनेक वेळा कारावास, हद्दपारी भोगली. जून १९३६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com