News Flash

कुतूहल – कापसापासून सूतनिर्मिती – भाग ३

कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर सलग अशा पेडाच्या आकारात त्याची रचना करणे ही पुढची नसíगक पायरी असते.

| June 16, 2015 12:36 pm

nav01कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर सलग अशा पेडाच्या आकारात त्याची रचना करणे ही पुढची नसíगक पायरी असते. विपिंजण यंत्रात कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर आणि त्यातील संपूर्ण कचरा काढून टाकल्यावर कापसाच्या तंतूंची रचना ही पेडाच्या आकारात केली जाते. या अखंड आणि सलग पेडास पेळू असे म्हणतात.
खेचण : विपिंजण प्रक्रियेमध्ये तयार होणारा पेळू हा आता सूतकताई प्रक्रियेसाठी वापरला जाण्यासाठी तयार असतो. या पेळूची जाडी त्यापासून कातल्या जाणाऱ्या सुतापेक्षा जवळजवळ २०० ते ५०० पट अधिक असते. त्यामुळे या पेळूची जाडी कमी करून सूतकताई करणे हे पुढचे काम असते; परंतु चांगल्या दर्जाच्या सुतासाठी ज्या गोष्टी पेळूमध्ये आवश्यक असतात त्या वििपजण यंत्रातून निघणाऱ्या पेळूमध्ये नसतात. वििपजण यंत्रातून बाहेर पडणाऱ्या पेळूमध्ये कापसाचे तंतू हे अस्ताव्यस्तपणे रचले गेलेले असतात. याशिवाय वििपजण यंत्रात कापसाचे बहुतांश तंतू हे आकडय़ा (हूक) सारखे वाकडे झालेले असतात. चांगल्या दर्जाचे सूत बनविण्यासाठी पेळूमधील सर्व तंतूंचे आकडे सरळ करून तंतू सरळ करावे लागतात. याशिवाय पेळूमधील तंतूंचा अस्ताव्यस्तपणा काढून सर्व तंतू एकमेकांस आणि पेळूच्या आसास समांतर करावे लागतात.
वििपजण यंत्रातून बाहेर पडणारा पेळू हा त्याच्या संपूर्ण लांबीवर सारख्या जाडीचा असत नाही. त्याच्यामध्ये जाड बारीक असे भाग असतात. अशा पेळूपासून चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या ताकदीचे सूत तयार करता येत नाही. यासाठी हा पेळू सर्व लांबीवर एकसारख्या जाडीचा करावा लागतो.
खेचण प्रक्रियेमध्ये पेळूतील तंतूंचे आकडे काढून त्यांना सरळ करणे, तंतू एकमेकांस आणि पेळूच्या आसास समांतर करणे आणि पेळूची जाडी सर्व ठिकाणी एकसारखी करणे या प्रक्रिया केल्या जातात. यासाठी जे यंत्र वापरले जाते त्याला खेच साचा (ड्रॉ फ्रेम) असे म्हणतात. सहा ते आठ पेळू एकत्रित करून त्याला सहा किंवा आठची खेच दिली जाते. यामुळे पेळू जास्त नियमित स्वरूपाचा होतो.
एकाच टप्प्यात या सर्व क्रिया करणे शक्य असत नाही. यासाठी एकानंतर एक असे दोन खेच साचे वापरले जातात. यातील पहिल्या खेच साच्याला पहिला खेच साचा असे म्हणतात आणि दुसऱ्या साच्याला अंतिम किंवा शेवटचा (फिनिशर) खेच साचा असे म्हणतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ‘स्क्वेअर ऑफ गुड महाराजा’
पोलंडमधील वॉर्सा शहराच्या महापालिकेने ३१ मे २०१२  रोजी शहरातील एका चौकाला भारताच्या एका संस्थानिकाचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. या संस्थानिकाचे नाव होते जाम श्री दिग्विजयसिंह रणजीतसिंह जडेजा (१८९५-१९६६). परंतु हे नाव पोलिश लोकांना उच्चारायला अवघड, म्हणून ते टाळून जून २०१२ मध्ये चौकाचे नामकरण झाले ‘स्क्वेअर ऑफ गुड महाराजा’.
जामनगरच्या या युवराजांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले व काही काळ त्यांनी ब्रिटिश लष्करातही काम केले. सप्टेंबर १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. नाझी जर्मनी व सोविएत रशिया यांनी आपसात पोलंडची विभागणी करून घेतली. युद्धाच्या सुरुवातीला जर्मनी व रशिया यांची युती होती. रशियाने बळकावलेल्या पोलंडमध्ये जे लोक साम्यवादाच्या विरोधात आहेत अशांना कैद करून रशियाच्या सबेरिया सारख्या दुर्गम प्रदेशात श्रम छावण्यांमध्ये रवानगी करण्याचा हुकूम स्टालिनने काढला. पुढे लवकरच, १९४१ मध्ये आपला मित्र हिटलरने आपल्यावरच पंजा उगारल्याचे लक्षात आल्यावर स्टालिनला दोस्त राष्ट्रांकडे धाव घेऊन त्यांच्या गोटात सामील होण्याखेरीज काही मार्ग राहिला नाही. स्टालिनने दोस्तराष्ट्रांशी युती केल्यावर आपल्या श्रम छावण्यांमध्ये अडकवलेल्या हजारो पोलीश स्त्री पुरुष व अनाथ मुलांच्या सुटकेचा हुकूम काढला. या काळात पोलंडचे रूपांतर रणक्षेत्रात झाल्यामुळे या पोलिश लोकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी विस्टन चíचलच्या सरकारवर आली. चíचलने दिग्विजयसिंहाला या बाबतीत काही मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. जाम श्रीने  त्वरित रशियाच्या कझाकीस्तानच्या श्रमछावणीतल्या ५०० अनाथ मुलामुलींना आपल्या जामनगरच्या समर पॅलेसमध्ये नेऊन त्यांना आश्रय दिला. सन १९४२ ते १९४६ ही चार वष्रे ही पाचशे मुले जामनगरला राहिली. त्यांच्यासाठी पोलिश शिक्षक आणवून शाळाही उघडली. युद्ध संपल्यावर महाराजांनी या ५०० मुलांना परत पोलंड सरकारच्या सुपूर्द केले. अलिकडेच २००४ साली यापकी सत्तर मुले (अर्थात आता वृद्धावस्थेत) जामनगरला भेट देऊन गेली.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2015 12:36 pm

Web Title: thread production from cotton
टॅग : Cotton,Navneet
Next Stories
1 अव्वल क्रिकेटपटू रणजीतसिंह
2 जामनगरच्या रणजीतसिंहांची कारकीर्द
3 जामनगर राज्यस्थापना
Just Now!
X