तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दरुगधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय?  
दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम काबरेनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट, सजल अल्युमिना, पोटॅशियम टार्टारेट, बेंटोनाइट इत्यादी न विरघळणारे अनेक पदार्थ यासाठी वापरतात. या पदार्थामुळे बऱ्याच वेळा टूथपेस्टला आम्लता किंवा क्षारता (अल्कलिनिटी) येते. टूथपेस्ट आम्लधर्मी असेल, तर तोंडाला जास्त लाळ सुटते व क्षारधर्मी असेल तर अन्नकण कुजून तयार झालेल्या आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया होते. उदा. कॅल्शियम फॉस्फेटने आम्लता व पोटॅशियम टार्टारेटाने क्षारता येते.
टूथपेस्ट दातांच्या फटींमध्ये पोहचावी म्हणून त्यात प्रक्षालकाचा (मळलेला पृष्ठभाग स्वच्छ करणारा पदार्थ) वापर करतात. सोडियम लॉरिल सल्फेटचा वापर प्रक्षालक म्हणून केला जातो. कॅल्शियम व मॅग्नेशियम परबोरेट किंवा मॅग्नेशियम पेरॉक्साइड यांचाही अंतर्भाव टूथपेस्टमध्ये असतो. या रासायनिक पदार्थाचे अपघटन होऊन ऑक्सिजन बाहेर पडतो आणि त्यामुळे जंतुनाश होतो आणि तोंडाची दरुगधी नाहीशी होते.
याशिवाय मेंथॉल, थायमॉल, यूजेनॉल, मिथिल सॅलिसीलेट इ. सुगंधी द्रव्ये टूथपेस्टमध्ये घालतात. त्यामुळे उत्साहवर्धक स्वाद निर्माण होतो व टूथपेस्टमध्ये एखादे उग्र वासाचे द्रव्य असल्यास त्याचा वास झाकला जातो. ही द्रव्ये काही प्रमाणात जंतुनाशकही आहेत.
काही टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचा समावेश असतो. फ्लोराईडमुळे दातात कॅव्हिटी (कीड लागण्यास) होण्यास प्रतिबंध होतो. लेमन, िमट अशा वेगवेगळ्या स्वादामध्ये टूथपेस्ट उपलब्ध असतात. बहुतेक वेळा िमट फ्लेवरचा उपयोग मुख्यत: केलेला असतो. मुलांना आकर्षति करण्यासाठी स्ट्रॉबेरी, बबलगम या फ्लेवरचा उपयोग करतात. हे फ्लेवर आइसोअमाईल अ‍ॅसिटेट आणि इथाईल, मिथाईल, फिनाईल, ग्लाइसिडेट या रसायनांमुळे येतात. टूथपेस्टला असणारा गोडवा सोडियम सॅकरीन किंवा सॉरबिटॉल सॅकरीनमुळे येतो.  मीठ म्हणजेच सोडिअम क्लोराईडचा वापर जिवाणूरोधक म्हणून केला जातो.
अनघा वक्टे , मुंबई , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – ‘मुड मुडके ना देख..’
‘श्री ४२०’मधल्या गाण्याचे ‘मुड मुडके ना देख मुड मुडके’ हे बोल राज कपूरला उद्देशून नादिरा म्हणते. ते खरंय, पण ते ‘भाग मिल्खा भाग’मधील मिल्खा सिंगला ऐकवलेले आहेत असं वाटतं. म्हणजे ‘ये पैगाम तेरे लिए है, मिल्खाजनाब’ असं ‘पाकिजा’ स्टाइलमध्ये म्हटलंय असा भास होतो.
‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात म्हणजे प्रत्यक्ष धावपटू मिल्खाच्या आयुष्यात ऑलिम्पिक जिंकण्याचा रोमहर्षक क्षण कसा निसटून जातो, हे पाहाणं अतिशय मनोज्ञ आणि उत्कट अनुभव वाटतो.
प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मिल्खाच्या मनातली सूक्ष्म वादळं अचानक घोंघावतात आणि तो फक्त निमिषभर मागे वळून बघतो. आणि शर्यत हरतो. आपण कोण? कुठून येथवर आलो? ही शर्यत जिंकणं हेच आपलं अंतिम ध्येय आहे का? जीवनातल्या खच्चीकरण करणाऱ्या क्षणांवर सूड घ्यायची हीच वेळ का? असे विचार त्याच्या मनात आले असावेत. कदाचित आणखीही काही अस्वस्थ भावनांचे तरंग उमटले असतील. पण त्याने मागे वळून बघितलं आणि घडय़ाळाचा काटा सूक्ष्मपणे हलला, त्याची उद्दिष्टावरची नजर ढळली आणि पायाकडे जाणारा ऊर्जेचा ओघ अगदी क्षणार्धाकरता मंदावला. मनावरचा ताबा पलक झपकतेही छूट गया..
हा प्रसंग बघताना वारंवार जाणीव होत होती ती मनाच्या दृष्टिकोनाचा आपल्या परफॉर्मन्सवर होणाऱ्या परिणामांचा. शरीर सामथ्र्य, उत्तम प्रशिक्षण, तरबेज कौशल्य या सर्व जमेच्या बाजू केवळ दृष्टिकोनाच्या जोरावर यशाकडे खेचून घेऊन जातात. नकारात्मक दृष्टिकोन बाळगूनदेखील यश मिळतं, नाही असं नाही. पण त्या यशामुळे ना समाधान मिळत, ना त्यामुळे आत्मविश्वासात भर पडत.
याचा अर्थ असा नव्हे की केवळ होकारात्मक दृष्टिकोनामुळे यश संपादन करता येतं. सुदृढ शरीर, मेहनतीने मिळवलेले ज्ञान आणि माहिती, त्याचबरोबर सरावानं कमावलेलं कौशल्य या तीन गोष्टी असाव्याच लागतात!
आणि नेमके इथेच आपण गोता खातो. अचूक दृष्टिकोन म्हणजे वर्तमानावरची शंभर टक्के पकड. मिल्खा मागे वळून बघतो ते प्रतीकात्मक होतं. कारण त्या क्षणी आपलं मन भूतकाळात जातं, तिथलं शल्य पुन्हा जिवंत होतं आणि क्षणार्धात पुन्हा भविष्याकडे झेपावतं. भविष्यात काय घडणारे याची चिंता भेडसावते. चिंता, काळजी आणि शल्यवेदनेची ती जाणीव अगदी पुसट असते, निसटूनही जाते पण त्या क्षणापुरतं आपलं लक्ष वर्तमानावरून उडतं आणि एकदा मन विचलित झालं की शरीराचा तोल निसटतो. ऊर्जेची एकत्रीकरणाची, सुसूत्रीकरणाची प्रक्रिया मंदावते आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. मन आणि शरीर यांचं परस्पर नातं असं असतं याची आपल्याला जाणीव नसते. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. मानसशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र हे विभाजन फक्त अभ्यासापुरतं.
 आणि परीक्षेला जाणाऱ्या सर्व मुलांसाठी आता ‘मुड मुडके ना देख मुड मुडके.’ हा संदेश अगदी खास.
 डॉ.राजेंद्र बर्वे –   drrajendrabarve@gmail.com

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

प्रबोधन पर्व – आधुनिक मराठी गद्याचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर
इंग्रजी भाषेला ‘वाघिणीचे दूध’ संबोधणाऱ्या, तर स्वत:ला ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाला’ने एकोणिसाव्या शतकात ‘विचार व मराठी भाषा’ याविषयी असाधारण अशी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’ हे नियतकालिक २५ जानेवारी १८७४ रोजी सुरू केले. त्यातून चिपळूणकरांनी साहित्य, समाजस्थिती, राष्ट्रनिष्ठा, देशस्थिती, स्वातंत्र्य, शिक्षण, जातिभेद अशा अनेक विषयांवर निबंध लिहिले. ‘निबंधमाला’ला अफाट लोकप्रियता मिळाली; इतकी की, तिच्या प्रभावाने काही काळ तत्पूर्वीचे व समकालीन ग्रंथकार काहीसे बाजूला पडले. चिपळूणकरांचे चरित्रकार ग. त्र्यं. माडखोलकर लिहितात – ‘‘ चिपळूणकरांनी लेखणी हातात धरण्यापूर्वी मराठी भाषा पोरकी व परावलंबी होती, मराठी वाङ्मय पोरकट व परभृत होते.. मराठी भाषेचा प्रौढप्रताप निबंधमालाने नव्या सुशिक्षित वर्गाच्या प्रत्ययास आणून दिला.’’ तर डॉ. भा. ल. भोळे म्हणतात – ‘‘ त्यांनी (चिपळूणकरांनी) मराठी गद्याला अपूर्व नेमकेपणा, सुसंबद्धता आणि वाक्सौंदर्य दिले. मराठी भाषेच्या आविष्कारकक्षा विस्तारून तीव्र संतापापासून सूक्ष्म टवाळीपर्यंत आणि बिनतोड युक्तिवादांपासून खोचक कानउघाडणीपर्यंत हरप्रकारची अभिव्यक्ती करण्याची क्षमता तिला प्रदान केली. विद्वत्ताप्रचुर व शास्त्रीय लेखन इंग्रजीइतकेच परिणामकारकपणे मराठीतूनही करता येते हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध केले.’’ असे असले तरी, चिपळूणकर मोठय़ा प्रमाणात आत्मकेंद्री होते आणि सामाजिक सुधारणांबाबत पुराणमतवादीही. लोकहितवादी, महात्मा फुले यांच्या- विषयी त्यांनी अतिशय कडवट, औद्धत्यपूर्ण आणि उपहासात्मक लेखन केले. मात्र चिपळूणकरांच्या निबंधमालाने निद्रिस्त व संमोहित समाजमनाला खडबडून जागे केले आणि आधुनिक मराठी गद्याची मुहूर्तमेढ रोवली.