धान्य शेतातून कापणी केल्यानंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता कायम राखणे, हे एक आव्हान असते. शेतकरी धान्य साठविलेल्या बांबूच्या किंवा वेताच्या टोपलीला बाहेरून शेण किंवा मातीचा थर चढवतो. त्यामुळे टोपलीची छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किडय़ांपासून धान्याचे संरक्षण होते. अशा टोपल्या वरून प्लास्टिकचे आवरण घालून माळ्यावर किंवा एखाद्या खोलीत बंदिस्त करतात. खाली कडबा पसरवून धान्यातील आद्र्रता शोषून घेतात. अशा पद्धतीने सहा महिनेपर्यंत धान्य टिकवले जाते.
मोठय़ा प्रमाणात धान्य टिकवण्यासाठी कणगी, कोठी, संदूक, मोठे माठ किंवा िपप वापरतात. धान्यावर बोरिक पावडर, कडुिनबाचा पाला, चुन्याची निवळी, खडे मीठ यांचे थर रचतात. यामुळे किडे, मुंग्या यांपासून संरक्षण मिळते. बंद खोलीत थोडी हवा खेळती ठेवून त्यात एक पाण्याचे भांडे ठेवून तपमान व आद्र्रता नियंत्रित करता येते. यामुळे अन्नधान्य सहा ते आठ महिने सुरक्षित राहते.
यापेक्षा मोठय़ा प्रमाणात धान्य साठवायचे असेल, तर गोदामांचा वापर करतात. यात धातूचा किंवा काँक्रीटचा चौथरा बांधून एकावर एक धान्याच्या गोणी रचतात व त्यावर प्लास्टिकचे जाड आवरण घालतात. यावर अधून-मधून औषध फवारणीही करतात. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था अशी पद्धत सर्रास वापरते.             
गोदामामध्ये संपूर्ण इमारत धान्य कोठारे म्हणून संरक्षित करून स्टेट किंवा सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनतर्फे त्याचे नियंत्रण केले जाते. यात जवळजवळ वर्षभर धान्याचा साठा करता येतो. धान्य संरक्षणासाठी मॅलेथियॉन या कीटकनाशकाचा मारा करतात. तसेच अ‍ॅल्युमिनियम फॉस्फॉइडची धुरी दर तीन महिन्यांनी देतात.
 घराघरातल्या गृहिणी अजूनही पूर्वापार चालत आलेल्या पद्धती वापरतात. धान्य उन्हात तीन ते पाच दिवस वाळवून हवाबंद पत्र्याच्या डब्यात भरतात. त्यावर राख किंवा बोरिक पावडर किंवा कडुिनब अशा तीव्र वासाच्या पदार्थाचा थर लावतात. काही जण नीमतोड किंवा एरंडेल तेल धान्यावर चोळून डब्यात भरतात. पाऱ्याच्या गोळ्या मलमलच्या कापडात गुंडाळून डब्याच्या वेगवेगळ्या थरांत ठेवूनही धान्याचे किडय़ांपासून रक्षण करतात.
डॉ. सुधा राव
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १३ मार्च
१८८१ >  ‘चित्रमय जगत’ या नियतकालिकाचे संपादक, इतिहासावर विवेचक लिखाण करणारे तसेच ज्योतिर्गणित विषयाचे गाढे अभ्यासक दत्तात्रेय विष्णू आपटे यांचा जन्म. ‘शिवकालीन पत्रसारसंग्रह (दोन खंड), ‘इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी’ हे ग्रंथ त्यांनी न. चिं. केळकरांसह संपादित केले. सिद्धान्तशिरोमणी, लीलावती,  गणिताध्याय आदी ज्योतिर्गणितविषयक महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी सिद्ध केले होते.
१९२६  > रसिकाग्रणी ललितलेखक रवींद्र रामचंद्र पिंगे यांचा जन्म. ‘प्राजक्ताची फांदी’ व ‘सुखाचं फूल’ हे कथासंग्रह, ‘पश्चिमेचे पुत्र’, ‘पिंपळपान’, ‘हिरवीगार पानं’, हे पाश्चात्य साहित्याचा परिचय करून देणारे लेखसंग्रह, ‘शतपावली’, ‘देवाघरचा पाऊस’ आदी व्यक्तिचित्रांची ६ पुस्तके, ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी, आदी पुस्तके लिहिणारे पिंगे २००८ च्या ऑक्टोबरात निवर्तले.  
१९४३  > ‘गावकुसाबाहेरच्या कविता’ कार आणि ‘दलित साहित्य: स्वरूप व भूमिका’ लिहिणारे कवी वामन सुदामा निंबाळकर यांचा जन्म.
१९८२  > ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ हे नाटक आणि ‘सांगत्ये ऐका’ चित्रपटाची मूळ कथा लिहिणारे गोपाळ गणेश पारखी यांचे निधन. ते पुणे महापालिकेत इंजिनीअर होते.
संजय वझरेकर

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

वॉर अँड पीस : निद्रानाश भाग- ३
वायू व पित्त यामुळे झोप येत नाही का? हे ठरवण्याकरिता ओवा व दूध-तूप यांसारखे सोपे उपचार करून किंचित फरक पडतो का हे बघता येते. घोर वातविकार, मानसिक विकार यामुळे झोप नसल्यास डोळय़ांत, नाकात तूप टाकणे व पायास तूप चोळणे यावरून किंचित फरक पडतो का हे पाहावे, कफविकारात कमी जेवणवा लंघनाचा प्रयोग करून पाहावा.
१) मानसिक विकारांमुळे झोप येत नसल्यास निद्राकरवटी सहा गोळय़ा रात्री दुधाबरोबर घ्याव्यात. अधिक आवश्यकता असल्यास ब्राह्मीवटी ३ गोळय़ा, २ वेळा रिकाम्या पोटी, भोजनोत्तर चार चमचे सारस्वतारिष्ट घ्यावे. जटामांसी चूर्ण पाव चमचा दुप्पट साखरेबरोबर मिसळून एक कप दुधाबरोबर रात्री घ्यावे. २) अजीर्णामुळे झोप येत नसल्यास जेवणानंतर पाचक चूर्ण अर्धा चमचा किंवा शंखवटी तीन गोळय़ा किंवा पिप्पलादि काढा चार चमचे घ्यावा. वरील तीनही औषधे एकत्र घेतली तर जुनाट अजीर्णावर निश्चित उपयोग होतो.
३) वातविकारामुळे झोप येत नसल्यास डोळय़ांत तूप किंवा दुधाचे थेंब सोडावे. तळपायास काशाच्या वाटीने शतधौतघृत किंवा तूप चोळावे. कानात शतावरीसिद्ध तेलाचे चार थेंब टाकून ते काढून टाकावे. नाकात किंचित तूप टाकावे. कृश व्यक्तीने झोपताना एक कप गरम दुधाबरोबर एक चमचा तूप किंवा आस्कंद चूर्ण घ्यावे. स्थूल माणसाने वातविकारामुळे अनिद्रा असताना पाचक चूर्ण अर्धा चमचा घ्यावे. जटामांसी चूर्णाचा फांट झोपताना घेतल्यास अर्धागवाताच्या रोग्यांना झोप येते. खूप श्रम व थकव्यामुळे अल्पनिद्रा या त्रासाकरिता चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, शृंग भस्म प्र. ३ गोळय़ा २ वेळा, आस्कंद चूर्ण रात्री १ चमचा घ्यावे. तापाचे मान खूप वाढल्यास झोप येत नाही. त्याकरिता चंद्रकला, प्रवाळ प्रत्येकी तीन गोळय़ा किंचित मौक्तिक भस्माबरोबर घ्याव्या. कपाळ, हातपायांना चंदनगंध, शतधौतघृत लावावे.
सर्दी, पडसे असे कारण असल्यास वेखंड, सुंठ, जायफळ उगाळून तो लेप गरम करून नाक, कपाळावर लावावा. झोप येते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : उद्यम आणि तमाशा
पूर्वी संसार लाकडावर चालत. मग कोळशावर आणि आता तेल किंवा वायूवर चालतात. गाडय़ाही तेलावरच चालतात. अब्जावधी वर्षांत सूर्यकिरणांवर चालणारी झाडे जेव्हा गाडली गेली तेव्हा ती सूर्याची ऊर्जा घेऊनच खोलवर बुजली. त्यांचा पहिल्यांदा कोळसा झाला. मग हा कोळसा भरडला जाऊन त्यातून तेल निघाले. या तेलावरच हल्ली जग चालते. तुम्ही किती समृद्ध आहात ही गोष्ट देशात गाडय़ा किती यावर ठरते. हल्ली मुंबईत खरे तर डोक्यावर टोपली घेतता तशी गाडी डोक्यावर घेऊन फिरावे लागते, पण आमच्याकडे गाडी आहे हे दाखवावे लागते. हे तेल कमी पडू लागले म्हणून सरकारने विहिरी खोदल्या. मग सरकार मागणीपुढे नमले म्हणून त्यांनी जमंीन, नद्यांची खोरी आणि समुद्राचा तळ यांचा लिलाव केला आणि उद्यमशील समूहांशी हातमिळवणी केली. लिलावात पैसे मिळाले ते भ्रष्टाचारात फस्त झाले. मग करार झाले. तुम्ही तेल काढा, पण ही नैसर्गिक संपत्ती देशाची म्हणून ५०-५० टक्के फायदा वाटून घ्यायचे ठरले. तेल निघू लागले, पण नफ्याचा पत्ता नाही. तेव्हा कोणीतरी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा नफाच झाला नाही, असे उत्तर मिळाले. त्याचा शोध घेतल्यावर जो नफा झाला असे वाटत होते तो नफा पुढे नव्या विहिरीमध्ये गुंतवावा लागला. कारण वाटले होते त्यापेक्षा या विहिरी लवकर भाकड झाल्या, असे उत्तर मिळाले. मग कोर्टात प्रकरण गेले. त्यासाठी गलेलठ्ठ पगाराचे वकील नेमण्यात आले. मंत्रीगटांची नेमणूक झाली. या मंत्र्यांना निवडणुकाजिंकायच्या असतात. त्यासाठी पैसे लागतात. तेलवाले पैसे ओतू शकतात, हे तर स्वयंसिद्ध सत्य असते. यांना हिकमती लढविण्यासाठी हुशार माणसांची गरज असते. ते मॅनेजमेन्ट स्कूलमधून पास होत असतात. आमच्या मुलाला किंवा जावयाला दोन लाख रुपये दरमहा पगाराची नोकरी मिळाली, हे वाक्य या हिकमतबहादूरांबद्दल असते. ही मंडळी या उद्यमशील लोकांचे सेवक असतात आणि सरकारला कमीत कमी पैसे कसे मिळतील, याची योजना करण्यात गुंतलेले असतात. नाहीतरी सरकार पैसे वाया घालवते तेव्हा त्यांना कमी मिळालेलेच बरे, असा मोठा राष्ट्रप्रेमी विचार त्यामागे असतो. ही मंडळी देश-परदेशच्या वाऱ्या विमानाने करतात. त्यामुळे विमानतळाचे स्वरूप दादर स्टेशनसारखे होते. गाडी बाळगणे हा जन्मसिद्ध हक्क असतो. मग उड्डाणपूल बांधावे लागतात. तेही पुरत नाहीत म्हणून उड्डाणपुलावरून आणखी एक पूल बांधून त्यावर रेल्वे बांधण्याचे ठरते. प्रगती होतच राहते. माणसे जास्त सुखी होत जातात आणि हे सुख वाढावे म्हणून हे उद्यमशील समूह क्रिकेटच्या टीम्स विकत घेतात आणि त्यांच्या झुंजी लावतात त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते-   rlthatte@gmail.com