हायड्रोजनच्या केंद्रकात न्यूट्रॉनची संख्या दोन असते तेव्हा ते हायड्रोजन ३ (एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन) म्हणजे ट्रीशियम हे समस्थानिक असते. निसर्गात आढळणारे हे समस्थानिक अंतरिक्षातून येणाऱ्या विश्वकिरणांचा (कॉस्मिक लहरी) पृथ्वीवरील वातावरणातील वायूशी संयोग होऊन तयार होते आणि पाण्यात मिसळते. समुद्रातील पाण्यात दर १०१८ (एकावर अठरा शून्ये) हायड्रोजन अणूपाठी एक अणू ट्रीशियमचा असतो, इतके ते अत्यल्प प्रमाणात असते. अण्वस्त्रांची चाचणी घेतानाही ट्रीशियम तयार होते. अणुभट्टीमध्ये लिथियम ६, या लिथियमच्या समस्थानिकावर न्यूट्रॉनचा मारा केला असता ट्रीशियम तयार होते. १९३४ मध्ये भौतिक तज्ज्ञ अर्नेस्ट रूदरफोर्ड, एम.एल. ओलिफण्ट आणि पॉल हार्टेक या शास्त्रज्ञांनी डय़ुटेरिअमपासून कृत्रिमरीत्या ट्रीशियम हे समस्थानिक तयार केले.

ट्रीशियम हे समस्थानिक स्थिर नाही तर किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम ट्रीशियम हे बरोबर बारा वर्षे सहा महिन्यांनी किरणोत्सर्गामुळे घट होऊन अर्धे होईल आणि उरलेले अर्धे बीटा किरणांच्या उत्सर्जनामुळे हेलिअममध्ये रूपांतरित होईल. ट्रीशियमचा उपयोग भूगर्भातील पाण्याचे वयोमान शोधण्यासाठी केला जातो. समस्थानिकांच्या भूरसायनशास्त्रीय (आयसोटोप जीओकेमिकल) अभ्यासामध्ये ट्रीशियमचा उपयोग केला जातो. किरणोत्सारी असल्याने घडय़ाळे, आपत्कालीन बाहेर जाण्याच्या सूचनांचे फलक (इमर्जन्सी एक्झिट साइन बोर्ड) अशा स्वनियंत्रित प्रकाशसाधनांमध्ये ट्रीशियमचा उपयोग केला जातो.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Mental Stress These 2 pranayama routines control anxiety best
Mental Stress: मानसिक ताण कसा कमी करावा? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा स्ट्रेस फ्री
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?

अणुभट्टीमध्ये लिथियम ६ या लिथियमच्या समस्थानिकावर न्यूट्रॉनचा मारा केला असताही ट्रीशियम तयार होते. हायड्रोजन १(प्रोटियम), हायड्रोजन २ (डय़ुटेरियम) आणि हायड्रोजन ३ (ट्रिशियम) हे तिन्ही निसर्गात आढळणारे आहेत. याशिवाय हायड्रोजनची आणखी चार समस्थानिके; हायड्रोजन ४, हायड्रोजन ५, हायड्रोजन ६, हायड्रोजन ७ ही कृत्रिमरीत्या तयार केली जातात. अनुक्रमे तीन, चार, पाच आणि सहा न्यूट्रॉन असलेली ही समस्थानिके अस्थिर असतात. अणुकेंद्रकीय प्रक्रियेमध्ये ट्रीशियमचा वापर केला जातो. डय़ुटेरिअम आणि ट्रीशियमच्या केंद्रकीय संमीलनात तयार होणारी उष्णता ऊर्जा आण्विक शस्त्रांमध्ये वापरली जाते. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्रात कृत्रिम किरणोत्सार शोधक म्हणून ट्रीशियमचा उपयोग केला जातो.

डॉ. विद्यागौरी लेले    

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

रानटी, असंस्कृत कुषाणांचा भारत प्रवेश

मध्य आशियातून वायव्य भारतात येणाऱ्या रानटी, लुटारू टोळ्यांमध्ये सर्वात सामथ्र्यवान आणि भारतीय संस्कृतीत रमणारी, कुषाण ही जमात समजली जाते. कुषाणसुद्धा शकांप्रमाणेच उत्तर चीनमधील िझन्झियांग प्रांतामधील युह-ची टोळ्यांपैकीएका टोळीमधील जमात. या युह-ची टोळ्यांमध्ये आपआपसात भांडणे आणि संघर्ष ही नित्याचीच बाब होती. शक टोळ्यांशी झालेल्या संघर्षांनंतर कुषाणांनी शकांना चीनमधून हाकलले.

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पूर्वार्धात कुजूल कडफायसिस या कुषाण टोळी प्रमुखाने कुषाण युह-चींच्या पाच टोळ्या एकत्र करून विशाल सन्य जमा केले. या कुषाण टोळ्या प्रथम आल्या त्या कजाकस्तानात. त्यानंतर त्यांचे पहिले लक्ष्य ठरले ते इराणी साम्राज्य. इराणात मिळालेल्या अमाप लुटीनंतर काबूल, कंदहार ताब्यात घेऊन पुढे कडफायसिसचा मोर्चा भारताच्या वायव्य प्रदेशातल्या पहलव, इंडोग्रीक आणि शक यांच्याकडे वळला.

कडफायसिसने प्रथम इंडो-ग्रीकांशी सामना करून पाठोपाठ पहलव आणि शकांचा बंदोबस्त केला. या काळात, मौर्य सत्तेच्या अस्तानंतर मध्य आशिया आणि वायव्य भारतीय प्रदेशात बरीच राजकीय उलथापालथ झाली. अफगाणिस्तान आणि वायव्य भारतीय प्रदेशात कुजुल कडफायसिस याने आपले कुषाण राज्य स्थापन केले. त्याच्यानंतर कुषाण सत्तेच्या गादीवर बसलेल्या वेम कडफायसिस याच्या कारकीर्दीत कुषाण लोकांचे ‘भारतीयीकरण’ सुरू झाले. वेमने प्रथम वैदिक धर्माची दीक्षा घेतली. पुढे त्यांचे अनुकरण करून सर्व कुषाण लोकांनी वैदिक धर्माची दीक्षा घेतली.

वेम कडफायसिसनंतर सत्तेवर आलेल्या कुषाण राजांनी आणि इतर कुषाण समाजाने पूर्णपणे भारतीय आहार, पेहराव आणि जीवनशैलीचा स्वीकार करून ते भारतीय संस्कृतीत एकजीव झाले. त्यांची एक रानटी, असंस्कृत जमात अशी ओळख इतिहास जमा झाली! त्यांची नावेही कनिष्क, टुविष्क, वसुदेव अशी- पूर्णपणे भारतीय-  झाली! पुढे कुषाण राजा कनिष्क याने बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्याने बौद्ध तत्त्वज्ञान केवळ भारतीय प्रदेशातच नव्हे तर बाहेर, इतर देशांमध्येही पसरवलं.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com