आवर्त सारणीतील अठरावं कुटुंब हे सर्वात निष्क्रिय मूलद्रव्यांचा संच आहे;  असा समज रसायनशास्त्राच्या अभ्यासकांत अनेक वर्षे रूढ होता. या कुटुंबाचे वैशिष्टय़ म्हणजे किरणोत्सारी रेडॉन वगळता सर्व सदस्य नैसर्गिक अवस्थेत एक-आण्विय वायू (Mono-atomic Gases) रूपात आढळतात. संयुगातील रासायनिक बंधाच्या ऑक्टेट-सिद्धांतानुसार कोणत्याही सारख्या किंवा वेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी निगडित का होतात, तर त्यांना अठराव्या कुटुंबातील मूलद्रव्यांप्रमाणे इलेक्ट्रॉन्सची संरचना (ns2np6) हवी असते. ज्याअर्थी या कुटुंबातील सर्व सदस्य एकाणू रूपात राहतात त्या अर्थी अशी संरचना स्थिर असली पाहिजे; ही त्यामागील भूमिका (अर्थात या कुटुंबातील हेलिअमच्या बाबतीत ऑक्टेटऐवजी डुप्लेट सिद्धांत मानला जातो).

अणुक्रमांक ५४ असलेला झेनॉन पृथ्वीच्या वातावरणात दशलक्षातून एक (१ पीपीएम) इतक्या कमी प्रमाणात सापडतो. द्रवरूप हवेवरील संशोधनाच्या ओघात सर विल्यम रॅमझी यांना १८९८ साली झेनॉनचा शोध लागला. रसायनशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये असा ठाम समज होता की, झेनॉन व त्याचे बांधव संयुग तयार करू शकत नाहीत. क्वचित झाले तर एखाद्या द्रावणाच्या स्फटिकीकरणाच्या प्रक्रियेत अडकू शकतील; अशा पदार्थाना ‘क्लॅथरेट संयुगे’ असे संबोधले गेले. १९६२ मध्ये, नील बारटलेट याने मात्र चक्क झेनॉनची संयुगे बनवून दाखविली. झाले असे की, प्लॅटिनम हेक्झाफ्ल्योराइड [PtF6] व ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रिया अभ्यास करताना त्याला एक लाल रंगाचे संयुग मिळाले. यावर आणखी संशोधन करून त्याने ‘झेनॉन प्लॅटिनम हेक्झाफ्ल्योराइड’ असे अशक्य वाटणारे संयुग तयार केले. पुढे झेनॉन डायफ्ल्योराइड, टेट्रा फ्ल्योराइड व हेक्झाफ्ल्योराइड अशी संयुगे बनविली. आतापर्यंत जवळपास झेनॉनची १०० संयुगे तयार झाली आहेत.

Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
mumbai petrol pump crime marathi news, petrol pump employee dragged by car marathi news
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मोटरीसोबत फरफटत नेले
How sugar sakhar and chini get its name
Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video

तर असा हा आपल्याच कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच एक-आण्विय वायुरूपात राहूनदेखील आपली स्वत:ची वेगळीच ओळख करून देणारा झेनॉन. आपल्या सगळ्यांना तो केव्हा माहीत होतो? जेव्हा आपण प्रखर प्रकाश देणारे हेडलाइट्स बघतो, रात्रीच्या अंधारात झगमगणारे दिवे बघतो तेव्हा! अशा अनेक दिव्यांमध्ये झेनॉन वायू वापरला जातो. फोटो काढताना वापरण्यात येणाऱ्या फ्लॅशलाइटमध्ये झेनॉन वापरले जाते. उपग्रह ठरलेल्या कक्षेत राहावेत म्हणून झेनॉन-आयन प्रणाली वापरली जाते. काही अवकाशयानांतही झेनॉन वापरला जातो.